शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज आदरणीय पंतप्रधा�� मा. ना. श्री. नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांंबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा भव्य दुर्गांना मिळालेला हा दर्जा म्हणजे आपल्या वैभवशाली वारशाचे जतन करण्याच्या दृढ बांधिलकीचे द्योतक आहे. यावेळी आदरणीय मोदीजींनी हे सांगितले की, मराठा साम्राज्य हे 'सुशासन, लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याण' यांचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा देत स्वराज्य स्थापन केले. या लढ्यातून आजही संपूर्ण देश प्रेरणा घेतो. यातूनच प्रेरणा घेत पंतप्रधान महोदयांनी २०१४ साली निवडणुकांच्या आधी रायगडावर जाऊन महाराजांचा आशीर्वाद ही घेतला होता. याची आठवण यावेळी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी आवर्जून सांगितली.
मा. पंतप्रधानांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राची अद्वितीय शौर्यगाथा, लष्करी कुशलता आणि समृद्ध संस्कृती आता जागतिक पातळीवर पिढ्यान्पिढ्या उजळून निघणार आहे. यावेळी आम्हाला पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व पारंपरिक मराठा पगडी त्यांना भेट स्वरूपात दिली. महाराजांची ही मूर्ती आणि पारंपरिक मराठा पगडी हे महाराष्ट्राच्या अस्सल मऱ्हाटमोळ्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. मराठा साम्राज्याचा वारसा सदैव उज्ज्वल राहण्यासाठी मा. पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आम्ही सदैव ऋणी आहोत.
यावेळी मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रविंद्र वायकर, मिलिंद देवरा, नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.
@narendramodi
#Shivsena #DrShrikantEknathShinde
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णनजी यांना नुकतीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथील जीएमसी बालयोगी सभागृहात देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या मुख्य ���पस्थितीत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी आदरणीय राज्यपाल महोदयांना उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर झालेल्या उमेदवारीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाची सुरुवात, त्यानंतर सैन्यदलात उल्लेखनीय सेवा, इंडियन ऑईलमधील दीर्घकाळची नोकरी आणि त्यानंतर पूर्णवेळ कलाक्षेत्राकडे वळलेले त्यांचे जीवन विलक्षण प्रेरणादायी आहे.
पंडित सत्यदेव दुबे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांसारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांसोबत रंगभूमीवर काम करताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'तेजाब', 'परिंदा', 'अंगार', 'रंगीला', 'राजू बन गया जंटलमन' अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या संस्मरणीय भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटवून गेल्या. 'थ्री इडियट्स'मधील त्यांची लहानशी पण प्रभावी भूमिका आजही प्रेक्षकांच्या ���्मरणात आहे.
शिस्त, सौजन्य आणि अभिनयातील साधेपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
अच्युत पोतदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो.
First spread fake news on Maharashtra elections… then quietly delete it with a silent apology.
Is this how conspiracies are hatched against a democratically elected government?
आवडलेलं❤️
ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या वतीने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनु���ार मुंबई महानगर व परिसरात पुढील ३-४ तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व मुंबईकरांना कळकळीची विनंती, आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १९१६ या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा.
#MumbaiRains #Mumbai