NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला मुंबईत देखील विद्यार्थी आंदोलन करून पाठींबा देत आहेत. हे आंदोलन काल चिरडण्याचा प्रयत्न सरकारने काल करून पाहिला. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला विरोध केला. आज याच विद्यार्थ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. मागे २०१६ ला जेंव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर NEET परीक्षेमुळे अन्याय होत होता तेंव्हा राजसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलून त्या विषयात तोडगा काढायला लावला होता. या आंदोलनात देखील राजसाहेबांनी तोडगा काढावा अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
#MNSAdhikrut
“आम्हाला संविधानाने रस्त्यावर शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. आमच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तरीही तुम्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेणार अस��ल, तर मीदेखील त्यांच्यासोबत गाडीत जाऊन बसेन.”
— सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या व्यवस्थेला खडे बोल सुनावले.
On Saturday, July 18, 2026, the central government forcibly admitted Sonam Wangchuk into hospital. They claim it was out of concern for his health. However, the way he was dragged away makes it evident that the government had no genuine concern for him. After witnessing the brutal lathi-charge against protesters yesterday, it appears that the government itself has become mentally unstable and needs to be hospitalized. Those in power seem obsessed with demonstrating to the world how they crush legitimate protests and take pleasure in showing it off to the other heads of state, even when you don’t share a common language, by flashing a booming, theatrical laugh for the cameras.
After all, who exactly is Dharmendra Pradhan that the government views his resignation as a personal failure? When Manipur was in flames, this same government shielded the then-Chief Minister, Biren Singh, in a similar fashion. The truth is, the two top leaders in power have absolutely no affection for individuals like him or others of his ilk. Their attitude is: No one tells us what to do. Not the opposition, and certainly not the public. After all, we do not get elected based on votes. Our victories rely on manipulating the entire administrative machinery, exploiting chaos in voter lists, and, of course, the power of EVMs. Who cares about the students?
Yesterday, the Prime Minister spoke about everything except the actual issue at hand. There is an English term called ‘Lame Duck President’. It refers to a leader in their final term who is relatively relaxed, tours the globe, and sees their influence wane while their successor handles the actual governance. It appears that Modi has currently reached a similar stage. Even if Modi harbored a genuine desire to act on these matters, the forces vying for succession likely compelled him to turn a blind eye. History will certainly remember that the students' protest was ruthlessly crushed during Modi's tenure as Prime Minister! If anyone desires such an image for him, and if Modi is willing to fall prey to it, then there is nothing more to be said.
I have a request for Prime Minister Narendra Modi: You hold events like 'Pariksha Pe Charcha' (Discussion on Exams), so why not engage in a dialogue with the students now? Their demands are legitimate. The outcry of the nation's students is far more important than the egos of Dharmendra Pradhan and the government.
The government must also realize that this protest is not merely about students or a single examination. There is deep-seated public anger against the establishment. Anger over how a single industrialist is being propped up and the entire nation is being handed over to him. How inflation has peaked. How forests are being razed to benefit contractors. How cities are suffocating under the guise of development. And how hospitals are overflowing. This outcry is against all these issues. Protesters are being brutally beaten on orders from the Home Ministry, yet the young men and women refuse to budge an inch. This courage stems not from anger over a single issue, but from the despair caused by the overall state of the country. Therefore, the government should abandon its ruthlessness and show some understanding.
It is certain that the power gained through the Lokpal Bill movement will be lost through this student protest! Since 2018-19, I had been telling the public that they might not grasp what I was saying about this government at the time, but the day injustice knocks on their doors, they would understand! Today, that moment has arrived!
ठाकरी बाणा! जशी खेळपट्टी, तशीच फलंदाजी! 🎯
अमित ठाकरेंनी दिल्लीच्या मैदानात उतरून तिथल्याच भाषेत संवाद साधला. त्यामुळे उगाच हिंदीवरून उपदेश करण्याचे कष्ट कोणी करू नये. 'जसा देश तसा वेश' पाळत त्यांनी दिल्लीत हिंदीचा वापर केल���, पण सोबतच इंग्रजी आणि मराठीतही तितक्याच प्रभावीपणे आपली बाजू मांडली आहे, हे लक्षात असू द्या!
हा बगळा, मंगल प्रभात लोढा कुठे सापडले का ?
मुंबई पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ह्यांनी लोढा ह्यांना BMCमुख्यालयात एक केबिन दिल�� होते. आज अमीत साटम ४ वर्षाच्या प्रशासनावर रडतोय.
मग हे लोढा त्या केबिन मध्ये बसून काय गोट्या खेळत होते का ? हे जबाबदार आहेत.
वादळं पण मराठीत पेला, ऊन अंगावर घ्यायचं आहे तर ते पण मराठीत घ्या... एका रंगमंचावरच्या सादरीकरणात सादरकर्त्यानी मराठी रसिकांना केलेलं कळकळीच आवाहन.. महाराष्ट्रात हेच आवाहन गेली २० वर्ष जीव तोडून श्री. राज ठाकरे करत आहेत. हे आवाहन करायची वेळ या प्रांतावर आली हे दुर्दैव पण हे आवाहन करण्याची पुन्हा पुन्हा उर्मी मिळते ती मात्र श्री. र���ज ठाकरे यांच्यामुळेच...
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
भारतातील अनेक मंदिरांची हीच कथा आहे ! आधी परकीयांनी हजारो वर्ष इथली मंदिरं लुटली आता त्याचा बदला म्हणून की काय हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का ? आणि तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही ? का अयोध्येत ऐवढा आटापिटा कर��न निवडणुकीच्या तोंडावर ( उद्घाटन ) करून देखील ना अयोध्येत ना देशात कुठेच फायदा झाला नाही म्हणून याकडे दुर्लक्ष ? अर्थात नेहमी प्रमाणे यांत पण शहा - काटशहा यांचं राजकारण सुरु आहेच ! उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील. मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल, झालंच तर त्यांचं काहीसं नुक��ान होईल आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षाना आपोआपच खीळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भारतीय जनता पक्षात 'पुढे कोण' यावरून जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात . अगदी खासदार, आमदार फोडाफोडी पासून ते मंदिरां पर्यंत ! देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधी पक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत म्हणून रामाच्या गृहात काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचे कारणच नाही !
लोकांच्या श्रद्धेला जो तडा गेला आहे त्याचा हिशोब हिंदू जनतेला मिळाला पाहिजे. हे सगळं होत असताना ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पंतप्रधानांचे हेतू किमान या बाबतीत अजून तरी स्वच्छ आहेत असं ��ी मानतो, पण फक्त हेतू स्वच्छ असून उपयोग नाही तर तुमच्याकडून कृतीची अपेक्षा आहे. अन्यथा तुम्ही आणि तुमच्या पक्षाने पुन्हा एकदा सिंहासनाच्या मोहापायी रामाला वनवासात आणि राम भक्तांना शरयू नदीत ढकललंत असंच म्हणावं लागेल.
राज ठाकरे ।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. अनेक वर्षांच्या परंपरा, अंधश्रद्धा आणि हजारो वर्षांची दास्य-गुलामगिरी नष्ट करण्याची ताकद ही ज्ञानातून आणि कमालीच्या तळमळीतून येते. आणि ह्या दोहोंचा संगम झा��ा की समाजपरिवर्तनाला सुरुवात होते. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. आ��ल्या धीरगंभीर आवाजात रंजल्या-गांजलेल्यांच्या दुःखावर फुंकर घालत, लोकांना त्यांच्यात बदल घडवून आणण्याची त्यांची शक्ती ही अद्वितीयच म्हणावी लागेल. ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
१८ वर्षांचा प्रवास खडतर होता पण प्रखर नेतृत्वाला कणखर निष्ठेची साथ मिळाली... अन् राजसाहेबांनी सर्वसामान्य घरातून ��ेणाऱ्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष उभा केला, नवा विचार मांडला आणि प्रस्थापितां��मोर तुल्यबळ आव्हान उभं केलं ! #मनसे_वर्धापनदिन
२ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे :
१) आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेले काही महिने पक्षातील पदाधिकारी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन महाराष्ट्र सैनिका��शी बोलत आहेत, त्या त्या मतदारसंघाची चाचपणी करत आहेत.. कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत ह्याचा आढावा घेत आहेत. आणि ही प्रक्रिया सर्व राजकीय पक्ष करत असतात. ह्यांच्याकडे केंद्र आणि राज्याची सत्ता आहे ते जर करत असतील तर आम्ही का करू नये?
२) अयोध्येला जाणार हे नक्की पण सध्या तिकडे प्रचंड गर्दी आहे. मी असं ऐकलं की रोज १० लाख लोकं भेट देत आहेत. तिकडचं सगळं सुस्थितीत आलं की जाईन. तोपर्यंत रामाचं दर्शन घ्यायचं असलं तर नाशिक���ं काळाराम मंदिर आहेच.
३) मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण महाराष्ट्रभर वाढतं आहे, त्यावर मागे शासनाला एक उपाय सुचवला होता की सेमी-इंग्रजी शाळा सुरु करा. कारण हल्ली पालकांना पण असं वाटत असतं की आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी यायला हवं, त्यासाठी त्यांचा अट्टहास हा इंग्रजी शाळेसाठी असतो. अशावेळेस जर शाळेत इंग्रजी आणि मराठी दोन्हीला योग्य महत्व देणारं शिक्षण मिळणार असेल तर पालक तो पर्याय नक्की निवडतील.
४) ईडीला हाताशी धरून सुडाचं राजकारण जे सुरु आहे, किंवा एकूणच सत्तेचा वापर करून जे राजकारण केलं जात आहे त्याचा फटका कधी ना कधी भाजपला पण बसणार आहेच ना. कारण भाजप पण काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. ते जेंव्हा सत्तेच्या बाहेर जातील तेंव्हा नवीन येणारे दामदुपटीने ह्यांचा हिशोब करतील. आज भाजपवाले म्हणतात की इंदिराजींच्या काळात पण नाही का सत्तेच��� दुरुपयोग झाला. पण म्हणून तुम्ही करायचा ह्याला काहीच अर्थ नाही.
५) आज भारतीय राजकारण जसं विस्कटलं आहे त्याला फक्त मतदारच फक्त वठणीवर आणूं शकतं. जर एखाद्या सरकारने एखादी गोष्ट बरी केली म्हणून तुम्ही त्यांच्या दहा चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार असाल तर परिस्थिती जशी आहे तशीच राहणार.
६) ईव्हीएमचा मुद्दा मी जेंव्हा घेतला तेंव्हा मला कोणीही साथ दिली नाही, आता इतर विरोधातील पक्ष बोंब���त आहेत. बसा बोंबलत.
७) मोठ्या प्रमाणावर मतदान तेव्हाच होतं जेव्हा मतदारांच्या मनात कशाच्या तरी विरोधातील राग खदखदत असतो. आता जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातून मतदान किती होतं हे बघावं लागेल. आजपर्यंत निवडणुका प्रश्नांवर झाल्या... उत्तरावर निवडणूक होण्याची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे राममंदिर झालं म्हणून मी खुश आहे पण मी भाजपचा मतदार आहे असं होत नाही. तेंव्हा काय होतं�� बघावं लागेल.
८) मराठा आरक्षणाच्या लढ्यात आरक्षणाच�� मागणी सोडून सगळ्या मागण्या मान्य झाल्या. जरांगे पाटील ह्यांना मी जेंव्हा भेटायला गेलो होतो तेंव्हा मी सांगितलं होतं की हा विषय तांत्रिक आहे, कायदेशीर अनेक अडचणी आहेत, त्यात केंद्र सरकारने काही निर्णय घ्यायला हवं. हे सगळं इतकं सोपं नाही. पण हे माझ्या मराठा बांधवांना कोणी सांगणार आहे का? तुम्ही मागच्या वेळेला मोर्चे काढलेत, ह्यावेळेला काढलेत, त्यातून हाताला काहीच लागलं नाही. आरक्षण खरंच मिळालं का ? कोणीतरी स्वतःच राजकारण साधण्यासाठी तुम्हाला भडकवणार असेल तर काय उपयोग? जरांगे पाटीलांनी त्या दिवशी वाशीत विजयोत्सव साजरा केला, कशाचा विजयोत्सव? आणि जर विजय मिळाला आहे मग आता परत उपोषणाला का बसताय ?
९) टोलला माझा विरोध नाही. माझी मागणी आधीपासून इतकीच आहे टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी जी आपल्याकडे नाही. जगभरात टोल असतोच पण आपल्याकडे नक्की किती टोल भरलाय ह्याचा हिशोब लोकां��ा दिला जात नाही ह्याचा मला राग आहे. उद्या मी मुख्य��ंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या समोर मध्यंतरी टोलनाक्यांवर जी आकडेवारी गोळा केली आहे ती सादर करणार आहे. लोकांच्या पैशानी जर टोलचा कंत्राटदार गब्बर होणार असेल किंवा राजकीय पक्षांच्या निधीत भर पडणार असेल तर माझा विरोध आहे. पत्रकारांना टोलच्या आंदोलनानंतर फुटलेल्या काचा तुम्हाला दिसतात पण तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत?
१०) महात्मा गांधी, गोडसे, नेहरू ह्यांच्यावर कितीवर्ष बोलण��र आहोत आपण. ही माणसं गेली, त्यांच्यावर बोलून काय होणार आहे? आज महागाईवर कोणी बोलणार नाही, शेतकऱ्यांवर कोणी बोलणार नाही. फक्त एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. बस करा आता हे सगळं आणि मूळ प्रश्नांकडे या.
भारतात ईडी किंवा इतर संस्थांकडून जे धाडसत्र सुरु आहे... असलं सुडाचं राजकारण भविष्यात 'भारतीय जनता पक्षा'लाही परवडणारं नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नसतं, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं !
। पत्रकार परिषद, नाशिक
#RajThackerayPressConference
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !