आज दादरच्या श्री हनुमान मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात रामरक्षा महाआरती करण्यात आली. "जोपर्यंत या चोरीचा नि:पक्षपातीपणे निकाल लागत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही," असा कडक इशारा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिला. तसेच तमाम हिंदूंना या चोरांपासून सावध व जागे राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी आणि असंख्य रामभक्त-शिवसैनिक उपस्थित होते.
#ShivSena#UddhavThackeray#AadityaThackeray#JusticeForRamMandir
श्रीराम मंदिर लुटीविरोधात
रामरक्षा महाआरती
दिनांक - ५ जुलै २०२६, रविवार
वेळ - दुपारी ४.०० वाजता
स्थळ - श्री हनुमान मंदिर, गोल देऊळ, विसावा हॉटेल समोर, एन. सी. केळकर मार्ग, दादर (प.), मुंबई-२८
#shivsenaubt#ramrakshamahaarti#maharashtra#pratikjadhav
आज १ जुलै अर्थात राष्ट्रीय डॉक्टर दिन ! रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर वर्ग आणि मेडिकल स्टाफचा सन्मान करणारा आजचा दिवस. डॉक्टर म्हणजे माणसातील देव, या माणसातल्या देवाला विनम्र अभिवादन !
#DoctorsDay#NationalDoctorsDay #IndianNationalDoctorsDay #PratikJadhav
या आंतरराष्ट्रीय योग द���नानिमित्त, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प करूया.
सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#InternationalYogaDay #YogaForLife #HealthyLifestyle #PratikJadhav
शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या निष्ठेचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा जाज्वल्य इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन उभी राहिलेली ही संघटना आजही त्याच ताकदीने जनतेसाठी लढत आहे.
सायनच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या ६० व्या शिवसे���ा वर्धापन दिन सोहळ्यात शिवसैनिकांचा उत्साह, पक्षावरील प्रेम आणि नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकत राहील, हा निर्धार प्रत्येकाच्या मनात दृढ झाला.
निष्ठा आमची ओळख, संघर्ष आमची परंपरा आणि शिवसेना आमचा अभिमान! 🚩
#VardhapanDin #ShivsenaUBT #Maharashtra #PratikJadhav
निष्ठा, आत्मविश्वास आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सातत्याने लढणाऱ्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करूया. बाळासाहेबांच्या विचारांचा दीप असाच तेजाने प्रज्वलित राहो. सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ShivSena#ShivSenaUBT#FoundationDay #VardhapanDin #PratikJadhav
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख तथा आमदार मा. श्री. आदित्य साहेब ठाकरे यांची आज सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या ��त्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
#HappyBirthdayAdityaThackeray #AdityaThackeray #ShivsenaUBT #PratikJadhav
भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका सौ. नमिता प्रितेश पवार यांचा वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य v उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
#HappyBirthday#CommunityConnect#Greetings#PratikJadhav
युवासेनाप्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त य���वासेनेतर्फे राज्यव्यापी 'सडेतोड वक्तृत्व स्पर्धा आज पार पडली.या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले.युवकांना आपले विचार मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळावी हा या उपक्रमा मागचा उद्देश होता.