महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. अजय जी जामवाल यांची सदिच्छा भेट..
आज 📍 ज्ञानेश्वरी निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री (संघटन) आदरणीय श्री. अजयजी जामवाल यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिमा देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी, सहकार आणि औद्योगिक क्रांतीची भक्कम पायाभरणी करणारे दूरदृष्टीचे लोकनेते, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण, यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचावी यासाठी त्यांनी सहकार चळवळ, पंचायत राज व्यवस्था आणि जलसिंचन प्रकल्पांना मोठी चालना दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसोबतच मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
या थोर लोकनेत्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
#YashwantraoChavan #FirstCMofMaharashtra #Maharashtra #RamShinde
📍बळसोंड (हिंगोली)
स्व. खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्व. डॉ. रामराव वडकुते यांनी आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, राज्य शेळी-मेंढी विकास महामं��ळाचे अध्य��्ष तसेच राज्यसभा खासदार म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी, वंचित घटकांच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.
त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
स्व. रामराव वडकुते यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या ���ुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
ॐ शांती!
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदी डॉ. बाळासाहेब हरपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या संघटनात्मक नियुक्तीमध्ये डॉ. सचिन उमेरकर यांच्यासह चार प्रदेश सहसंयोजक, तीन प्रदेश समन्वयक, एक मीडिया संयोजक आणि सहा विभाग संयोजकांचीही नियुक्ती करण���यात आली आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
BJP Maharashtra
#BJP #BJPMaharashtra #वैद्यकीयप्रकोष्ठ #संघटनात्मकनियुक्ती #RamShinde
मानवतेचे रक्षण, सत्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शिखांचे नववे गुरु, 'हिंद दी चादर' गुरु तेग बहादूर जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
आज संपूर्ण कुटुंबासोबत चिरंजीव अजिंक्य याचा वाढदिवस साजरा केला.
अजिंक्य, तुझ्य�� कष्टाला, प्रामाणिकपणाला आणि कर्तृत्वाला सदैव यशाची जोड मिळो. तुझ्या पुढील प्रत्येक वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि भरभरून आशीर्वाद!
तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#AjinkyaShinde #Family #Birthday #RamShinde
📍 चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय राठोड साहेब यांनी आज चोंडी येथे भेट दिली.
यावेळी त्यांनी अहिल्येश्वर मंदिरात अभिषेक करून दर्शन घेतले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वाड्याची पाहणी केली आणि लोकमातेच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी त्यांचे स्वागत व सन्मान केला.
#चोंडी #पुण्यश्लोक_अहिल्���ादेवी_होळकर #SanjayRathod #RamShinde
तुकाई उपसा सिंचन योजनेचा कार्यारंभ..!
📍 वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
दहा वर्षांच्या संघर्षाला आज विकासाच्या कृतीतून उत्तर मिळाले! कर्जतच्या जलक्रांतीची नवी पहाट ठरणाऱ्या ‘तुकाई उपसा सिंचन योजनेचा’ ऐतिहासिक शुभारंभ सोहळा मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय दुलिचंद राठोड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार झाला.
६६ कोटी ८३ लाख रुपयांच्या या प्रकल्पातून कुकडी डाव्या कालव्याचे पाणी उचलून तालुक्यातील १९ दुष्काळी गावांतील २७ जलसाठे भरले जाणार असून, ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतशिवारात हिरवाई फुलण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. योजनेचे पाणी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाइपलाइनच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन केले.
२०१४ मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेली तुकाई चारीची मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन जलसंधारण मंत्री म्हणून विभागाच्या पुनर्रचनेतून सिंचन क्षेत्राची मर्यादा ६०० हेक्टरपर्यंत वाढवली. या निकषांतर्गत मंजुरी मिळालेली महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे तुकाई उपसा सिंचन योजना आहे. या प्रवासात तत्कालीन जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी बोलताना संजय राठोड साहेब यांनी या योजनेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत��नांचा आणि पाठपुराव्याचा आवर्जून उल्लेख करत गौरवोद्गार काढले.
या योजनेसाठी पहिल्या दिवसापासून भक्कम पाठबळ देणारे आणि निधी कमी पडू न देणारे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे कर्जतच्या शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार!
याप्रसंगी राज्य मृद व जलसंधारण विभाग सचिव श्री. जितेंद्र पापळकर, मा. जि.प. सदस्य ॲड. कैलास अण्णा शेवाळे, मा. जि.प. सदस्य श्री. मधुकर आबा राळेभात, मा. जि.��. सदस्य श्री. शांतीलाल कोपनर, मा. जि.प. सदस्य श्री. अशोक खेडकर, मा. उपसभापती कृ.उ.बा.स. कर्जत श्री. प्रकाश शिंदे, जामखेड जिल्हा बँक संचालक श्री. सचिननाना घुमरे, मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व माता-भगिनी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी जमीन दिलेले शिंदे येथील श्री. सदाशिव घालमे, श्रीमती ताराबाई घालमे, श्री. मोहन घालमे तसेच वालवड येथील श्री. दादा राऊत यांचे मनःपूर्वक आभार! तसेच जलक्रांतीसाठी ‘जलदूत’ म्हणून योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन!
तुकाईच्��ा पाण्याने कर्जतचे शिवार असेच फुलत राहो, हीच सदिच्छा!
📍 वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
तुकाई उपसा सिंचन योजना, पंपगृहाचा शुभारंभ..!
तुकाई उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांच्या समवेत कळ यंत्र दाबून केला. यानंतर योजनेच्या कामाची पाहणी केली आणि विधिवत पूजा करण्यात आली.
याप्रसंगी राज्य मृद व जलसंधारण विभाग सचिव श्री. जितेंद्र पापळकर, मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग छत्रपती स��भाजीनगर श्री. हरिभाऊ कारभारी गिते, अहिल्यानगर कार्यकारी अभियंता श्री.पांडुरंग गायसमुद्रे यांच्यासह लाभधारक शेतकरी, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
#तुकाई_उपसा_सिंचन_योजना #जलस्वप्न #karjat #Ahilyangar #RamShinde
चि. अजिंक्य राम शिंदे याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आयुष्यातील प्रत्येक पाऊल आ��्मविश्वासाने टाकत, आपल्या कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाची साथ सदैव लाभो, हीच मनापासून सदिच्छा!
खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा!
#HappyBirthday #AjinkyaRamShinde #birthdaywishes
वनस्पतींनाही संवेदना असतात हे जगासमोर सिद्ध करणारे थोर भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
संसदीय लोकशाहीची मूल्ये अधिक दृढ करणारे आणि आपल्या संयमी, कुशल नेतृत्वाने सभागृहाचे कामकाज यशस्वीरीत्या चालवणारे लोकसभेचे माननीय अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
📍 चापडगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालिका सौ. ज्योती प्रकाश शिंदे यांचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. सौ. ज्योती प्रकाश शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#Chapadgaon #Karjat #Ahilyanagar #DCCBank #ramshinde
📍 अहिल्यानगर
भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओ’ या अभियानांतर्गत आज अहिल्यानगर शहरा�� पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप दिल्लीगेट येथे झालेल्या जाहीर सभेने झाला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना लोकशाही, संविधान आणि लोकशाही संस्थांच्या रक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत अभ्यासू, संयमी आणि तळागाळातील सामान्य माणसाशी नाळ जोडलेले ज्येष्ठ नेतृत्व, राज्यसभा खासदार डॉ. रामरावजी सखाराम वडकुते यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती!
#RamraoWadkute
कर्जतच्या जलक्रांतीचा ऐतिहासिक सोहळा!
सस्नेह निमंत्रण :
“तुकाई उपसा सिंचन योजना”
मौजे वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील पंपगृहाच्या कामाचा उद्घाटन सोहळा..!
वेळ : सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६, सकाळी ९.३० वाजता
ठिकाण : मौजे शिंदे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
तुकाई उपसा सिंचन योजनेतून कर्जत तालुक्यातील १९ गावे व २७ तलावांना जलसंजीवनी मिळणार!
सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी भव्य उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा.
📍 मौजे वालवड, कर्जत
#TukaiLiftIrrigation#Karjat#RamShinde