दौंड तालुक्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्र इमारतींची जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडून पाहणी.
दिनांक 25 जून 2026 रोजी दौंड तालुक्यातील मौजे मलठण, मौजे खडकी व मौजे राजेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत सुविधा विकास कक्षा��ार्फत बांधण्यात आलेल्या नवीन उपकेंद्र इमारतींना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने या उपकेंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पाहणीदरम्यान इमारतींच्या सुरक्षितता, सुविधा व कार्यक्षम वापराच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
सदर उपकेंद्र इमारतींसाठी संरक्षणात्मक भिंत / चेनलिंक फेन्सिंग उभारण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच इमारतींमध्ये अखंड वीजपुरवठा राहावा यासाठी इलेक्ट्रिकल बॅकअप, इन्व्हर्टर व आवश्यक इन्व्हर्टर पॉईंट उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
याशिवाय पूर्णत्वास गेलेल्या उपकेंद्र इमारतींसाठी आवश्यक फर्निचर पुरवठ्याकरिता स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी स्थानिक ग्रामस्थ, कनिष्ठ अभियंता श्री. योगेश पवार, उपअभियंता श्रीमती पूनम गुजर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.
#PuneZillaParishad #Daund #RuralHealth #NationalHealthMission #HealthInfrastructure #PuneZP
निखिल ड��ंबाळे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या फेलोशिप उपक्रमासाठी अर्ज केला. या उपक्रमासाठी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून ग्रामीण विकास, ग्रामीण आरोग्य या क्षेत्रांमध्ये काम करत असताना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्याची, जनतेच्या हितासाठी त्यांची अंमलबजावणी करण्याचीही संधी त्यांना मिळाली.
पुणे जिल्हा परिषदेचा फेलोशिप उपक्रम त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी कसा फायदेशीर ठरला याचे वर्णन त्यांच्याच शब्दांत...
निर्धार नियमित योग साधन��चा,
मंत्र जपूया निरोगी आयुष्याचा !
शरीराला व मनाला अंतर्बाह��य निर्मळ करण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे "योग" !
भारताने संपूर्ण विश्वाला दिलेला योग साधनेचा मंत्र आपणही जपूया, आपले जीवन सुदृढ, संपन्न व आरोग्यमय करूया..
एल-निनो या जागतिक हवामानशास्त���रीय परिस्थितीमुळे भारतातील, महाराष्ट्रातील मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर्षी मानसून उशिरा व कमी प्रमाणात बरसेल असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात उत्तम व नियोजनबद्ध शेती कशी करावी याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत...
पुणे जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम २०२६-२०२७ !
प्रशासनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची, ग्रामीण विकासात योगदान देण्याची, नेतृत्व गुण विकसित करण्याची सुवर्णसंधी...
अर्ज करण्यासाठी शेवटचे ५ दिवस बाकी !
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिका��ी श्री. गजानन पाटील, कृषी सभापती श्री. अमोल नलावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, कृषी विकास अधिकारी श्री. अजित पिसाळ यांच्यासह कृषी समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी या ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले.
लोककल्याणकारी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना लोकाभिमुख न्यायाचा संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसा��ेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
रक्षा बाबासाहेब कदम.. इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या रक्षा कदम यांची पुणे जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ साठी निवड झाली. एका वर्षात १३ तालु���्यांमध्ये, २७६ ग्रामपंचायत सोबत प्रशासनात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ही संधी त्यांच्या व्यक्तिमत्वात कशी बदल घडवणारी ठरली याचे वर्णन त्यांच्याच शब्दांत !
पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा !
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राकडून (NQAS) झालेल्या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेची आरोग्य उपकेंद्रे गुणवत्ता व दर्जात महाराष्ट्रात अव्वल ठरली आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या टाकळकरवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास ९४.८०% तर रिहे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास ९३.२९% गुण मिळाले. या गुणवत्तेसह ही दोन्ही उपकेंद्रे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरली आहेत. पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून झालेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश आहे. या यशात बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन.
ओंकार गेंगजे... बी.टेक. ची पदवी पूर्ण केल्यानंतर "पुणे जिल्हा परिषद फेलोशिप २०२५-२६" या उपक्रमात त्यांची निवड झाली. ही संधी त्यांना अनेक अनुभव देणारी, व्यक्तिमत्व घडवणारी ठरली.
पुणे जिल्हा परिषद ��ेलोशिप कार्यक्रम तरुणाईसाठी कसा फायदेशीर आहे हे जाणून घेऊया... त्याच्याच शब्दांत
न��ीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आज पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांनी आलेगाव - धुमाळवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करून त्यांनी सर्वांचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन आपण देशाचे आदर्श नागरिक बनावे अशा शुभेच्छा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिल्या.
आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे (ता.मावळ) येथे "शाळा प्रवेशोत्सव २०२६" साजरा करण्यात आला.
माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच केंद्रप्रमुखांना टॅबचे वाटप करण्यात आले. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्तम शिक्षणासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद प्रशासनाच्��ा वतीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी आमदार श्री. सुनील शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@SunetraA_Pawar @gajananpatilIAS
महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा भव्य सोहळा असलेली आषाढी वारी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील आरोग्य व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी आज उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व सुविधांचा, उपलब्ध औषध साठ्याचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारां���ाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधून मिळणाऱ्या सेवेबद्दल त्यांचा अभिप्रायही जाणून घेतला.
@gajananpatilIAS
पुणे जिल्हा परिषद फेलोशिप २०२६ : ग्���ामीण विकासात योगदान देण्याची संधी !
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ५० फेलोजची निवड करून त्यांना पुणे जिल्हा परिषद प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच निवड झालेल्या फेलोजना ग्रामीण विकासामध्ये योगदान देण्याची व आपल्या नेतृत्वगुणांना व्यासपीठ देण्याची संधी मिळणार आहे.
जास्तीत जास्त युवकांनी / युवतीने या संधीचा लाभ घ्यावा !
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारी पुणे जिल्हा परिषद मॉडेल स्कूल !
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा व प्रचंड क्षमता आहे. त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्याच्या, क्षमतांना संधीची साथ देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने "पुणे मॉडेल स्कूल" ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे.
या माध्यमातून ग्रामीण भागातील, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना IISER, IIUCA अशा नामांकित संस्थांसोबत विज्ञान शिकण्याची, NASA/ISRO अशा जागतिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळत आहे.
आपल्याही पाल्याला ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आजच शाळेत प्रवेश निश्चित करा !
पुणे जिल्हा परिषदेच्या लोणीकंद येथील प्राथमिक शाळेच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. माया हंबीर लंघे... पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आल��ल्या नासा अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून त्यांनीही नासाला भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना आलेले वेगवेगळे अनुभव त्यांच्याच शब्दांत 👇
पुणे जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम २०२६ : तरुणाईला नेतृत्वाची सुवर्णसंधी !
"पुणे जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम २०२६" या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील युवक / युवतींना थेट जिल्हा परिषद प्रशासनासोबत ग्रामीण विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या कालावधीत आपल्याला तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल व आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचीही संधी मिळेल. ही संधी मिळवण्यासाठी आजच अर्ज करा !
आरोग्य सेवेला मिळणार पौष्टिक आरोग्याची जोड !
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित ८० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये "सावित्री कॅफे" हा मॉड्युलर कॅन्टीन उपक्रम राबवण्यात येणार आहे.
य��� "सावित्री कॅन्टीन"च्या माध्यमातून स्थानिक महिला बचत ग���ांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दैनंदिन पौष्टिक आहाराची सेवा मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासह रुग्णांना पौष्टिक आहाराचे दुहेरी उद्दिष्ट साध्य होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे व्यासपीठ... जिल्हा परिषद शाळा !
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना NASA/ISRO येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जातो. गेल्या शैक्षणिक वर्षात २५ विद्यार्थ्यांना NASA येथे, तर ५० विद्यार्थ्यांना ISRO येथे ���भ्यास दौऱ्यासाठी जाण्याची संधी मिळाली.
यावर्षी ही संधी आपल्या पाल्याला मिळू शकते...
म्हणूनच आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा !
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा !
पुणे जिल्हा परिषद प्रशासनात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या, ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापुर्ती आनंद सोहळा आज संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून सर्व स��वानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट सेवेबद्दल आभार व्यक्त केले. या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकही प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत खरात यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.