@PMCPune सर्व सार्वजनिक मिरवणुकांमध्ये Confetti Poppers आणि Party Poppers वापरावर बंदी घालण्यात यावी.प्लास्टिक आणि मेटॅलिक कन्फेटी व स्ट्रीमर्समुळे होणारे प्रदूषण,अस्वच्छता आणि अचानक मोठ्या आवाजामुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
@PMCPune इचलकरंजी महानगर पालिकेने जे केले किवा इंदौर महानगर पालिकेने जे कचरा टाकणारे शोधले व दंड वसुली केली तसे तुम्हाला का करता येत नाही, आज जिकडे तिकडे कचरा टाकला जातो आणि अश्या नागरिकांकडून कारवाई म्हणून साफसफाई करवुन घेऊन जबर दंड वसूल केला गेला पाहिजे
@PMCPune आता मी पार कोसळलोय,गेली १ वर्ष मी तुमच्या प्रतिक्षेत खुप वाईट स्थितीत तग धरून उभा होतो,निवडणूक झाल्या,सगळ्यांनी रस्ते पालथे घातले पण माझी अवस्था कुणालाच दिसलीनाही.तक्रारी केल्या,तुम्ही कंप्यूटर मध्येरिक्वेस्ट बंद केल्या.दुरुस्ती च्या प्रतीक्षेत-लेन बी३०/३१ चा बोर्ड,धायरी
@prasadpanseMT ह्या वर्षीच्या स्पर्धे च्या निमित्ताने चांगले केलेले रस्ते अजून ३ महिने पण होत नाहीत तो पर्यंत संबंधित यंत्रणांनी खोदायला घेतले खालील फोटो गोळीबार मैदान येथील आहे. बरेच वर्ष हा रोड खराब होता आणि जानेवारी २६ मध्ये हा रस्ता चांगल्या पद्धतीने बांधला गेला होता. पैशाचा अपव्यय
@PMCPune कंप्लेंट नंबर PC31550 ही ३१ जानेवारी पासून ओपन आहे अजून ही कोणती एक्शन घेतली गेली नाह��� अजूनही सीमेंट, काँक्रिट पडून रस्ता धोकादायक ⚠️ झालेला आहे
@PMCPune धायरी फाटा ते नांदेड सिटी कडे जाणारा सर्विस रस्ता/ उड्डाणपुल-येथे प्रचंड प्रमाणात माती रिलायंस डिजिटल पर्यंत रस्त्याच्या बाजूला साठलेली आहे,तसेच सीमेंट रस्ता वर चिखल व सीमेंट मुळे छोटी खळगी झालेली आहेत,इंजीनियर नी ह्या वरून २व्हीलर चालवून रस्ता सुरक्षित आहे का हे पाहावे
@PMCPune लेन बी ३०,३१ , गणेशनगर धायरी चा बोर्ड , गणपती मध्ये कसले ही सामाजिक भान नसलेल्या व डॉल्बी कार्यकर्त्यांनी रथा ला अडथळा होत होता म्हणून मुळात साइड ला असलेला बोर्ड मोडुन काढला,आज तो लोकांच्या डोक्यात पडेल अशी अवस्था. हा बोर्ड तात्काळ दुरूस्त / नवीन करून बसवावा
@PMCPune २० ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या ग्रैंड सायकल स्पर्धेसाठी बरेच वर्ष अत्यंत दुरावस्था झालेला सोलापुर बाजार ते गोळीबार मैदान चा रोड उत्कृष्ट दर्ज्याचा बनवण्यात आला होता. पण बरोबर ४४ दिवसानी अखेर हा रस्ता पुन्हा एकदा खोदायला घेतला. #सरकारीकाम
@PuneCityTraffic परीक्षे च्या काळात सकाळी जड वाहनांना बंदी असून सुद्धा आज धायरी उंबर्या गणपती चौकात ट्रक टँकर हायवा फिरत होते सकाळी ९:१५ पासूनच पूर्ण या चौकातले रस्ते जाम झाले होते. @PMCPune ह्या चौकातील रुंदीकरण का थांबले आहे? जागा रिकामी आहे तिथे पार्किंग झाले आहे
@PMCPune स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, नांदेड सिटी च्या समोर असलेला हा बोर्ड,इमरजेंसी साठी असलेला कैमरा पब्लिक एड्रेस सिस्टम सगळे बंद अवस्थेत आहेत,खांबांचा उपयोगपहा @PMOIndia smart city was a good
initiative but the usage and its usefulness,maintenance never accounted before spending
@SangliSmkc ३० वर्षे महानगरपालिका स्थापन होऊन सुद्धा विश्रामबाग मधील १ रस्ता जो प्रभाग १७ आणि १९ ची हद्द आहे (गणपती मंदिर ते सिद्धिविनायक पुरम) हा तुम्ही करू शकत नाही, लाखो रुपये पॅच वर्क वर खर्च केले. ड्रेनेज लाइन जोडल्या गेलेल्या नाहीत, नक्की कसला आणि कुणाचा विकास केला गेला?
@PMCPune पुणे ग्रैंड टूर २०२६ च्या निमित्ताने काही रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जा चे केले गेले जेणे करून सायकल नीट पळू शकेल,पण कित्येक वर्ष ह्याच रस्त्यांवरून काय बैलगाड्या जात होत्या काय? ७८ वर्षे स्वतंत्र मिळुन अजूनही नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी का वाट पहावी लागते ?
@PMCPune याचे काय झाले ? कोणी बघितले काय का कोणी मोठ्या अधिकारी त्यांचे नातेवाईक किवा नेते इ मंडळी येथे पडल्यावर लक्ष देणार का? हे तरी सांगावे रोज सामान्य माणूस जीव धोक्यात घालून गाड्या चालवत आहे
@PMCPune उमेदवारांचे फॉर्म भरून घेण��यासाठी सिंहगड क्षेत्रीय कार्यालय इतर सर्व कामांसाठी पुढील ३ दिवस कोणती ही सुचना न देता (नागरिकांशी संबंधित कामांसाठी बंद ठेवले आहे) असे सिक्युरिटी गार्ड्स नी सांगितले, हे कितपत योग्य आहे? तसे बोर्ड्स ही लावलेले नाहीत
@DrPramodPSawant Ji, Recently visited Goa old secretariat building and museum, this building is Goa’s Heritage building built in 15th century This is in very bad condition (interior and external condition) request your personal attention for this heritage and architectural site
@OfficeOfNG@nitin_gadkari Ji upgradation of 4 lane NH166H peth naka-Sangli is completed (excellent work) except 800 Meters which is in very bad condition. land issue may be there but please ask @NHAI_Official to build at least tar road of single lane as before until it’s sorted
पुण्यात फु��पाथ मोहीम जोरात सुरू आहे असे पेपर मध्ये वाचले , तरी पण आरामात उभा असलेला आणि फूटपाथ काबीज केलेला हा बोर्ड मला दिसला
@PMCPune तुम्हाला दिसला का हो? स्थळ नांदेड सिटी बसस्टॉप ,बघा दिसला तर
@SangliSmkc रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे, आपल्या अधिकाऱ्याना किमान ��ठवड्यातुन एकदा तरी नेमून दिलेल्या भागात पाठवा. येथे पाइपलाइन लीकेज आहे, फोटो पहा
एसटी कॉलनी रोड स्वा सावरकर मार्ग क्र १;सांगली मिरज मेन रोड मार्टिन्स वाइन शॉप समोर; स्फूर्ती चौक ते एमएसईबी रोड