काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे ठिकाण “अपवित्र” झाले, म्हणून उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून गंगाजलाने शुद्धीकरण करणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि भयानक कृती आहे. खरगे साहेब दलित समाजाचे आहेत म्हणून इतकी घृणा?
हजारो वर्षांच्या इतिहासात एकलव्यापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्ती या देशात जन्मल्या. मात्र, त्यांच्या अनेक पिढ्यांना मनुवाद्यांनी संधीच मिळू दिली नाही. त्यांच्या क्षमता आणि कर्तृत्वाची हत्या केली गेली. हीच मनुवादी विचारसरणी हिंदुत्ववादाचा खरा चेहरा आह��, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज तमाम मागासवर्गीयांना समान संधीची किमान अपेक्षा करता येते. याच संविधानामुळे लहानपणी आई आणि बहिणीची जाळून हत्या झालेली पाहिलेल्या, मिल वर्कर वडि��ांच्या दलित कुटुंबातील अतिशय गरीब मुलाचे पुत्र असलेले मल्लिकार्जुन खरगे जी आज देशाच्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनू शकले.
ज्या मनुवादी विचारांविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला आणि ज्या विचारांचा विरोध करत दलित समाजाला समानतेचा अधिकार मिळावा यासाठी महात्मा गांधींनी संघर्ष केला म्हणून त्यांच्या हत्येचे अनेक वेळा प्रयत्न केले , त्��ाच विचारांचे प्रतिबिंब आज भाजप, आरएसएस आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये दिसून येते. याच जातिवादी विचारांमुळे बाबासाहेबांना सनातन धर्माचा त्याग करावा लागला.
हिंदुत्ववादाचे आता सनातनवादात झालेले रूपांतर समजून घ्यायचे असेल, तर आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीकडे पाहावे लागेल. या विचारांविरोधातील लढा अधिक निकराने लढावा लागेल, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, ही मंडळी देशाला पुन्हा अठराव्या शतकात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
जाहीर निषेध!
��ुण्यातली गर्दी कमी होणं गरजेचं आहे...
Non- Punekar ला जरा वाईट वाटेल पण सध्या परिस्थिती हाताबाहेर गेली आहे...
सरकारने नवे गृहप्रकल्पावर आळा आणण्याची गरज आहे...
अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे तर आपण वारंवार पाहतोच. पण जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले रूपाली चाकणकरांसारखे लोकच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक होते.
अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर आलेल्या सेक्स स्कँडलच्या पार्श्वभूमीवर अ��ेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. तथाकथित “बुवा” संस्कृती, श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि त्यात अडकणाऱ्या महिलांची वेदना – हे वास्तव नाकारता येत नाही.
अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. परंतु ज्या वेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात आणि कुणाच्या तरी “बुवाचे” पाय धुतात, तेव्हा हा विरोधाभास अधिक ठळकपणे समोर येतो.
आज गरज आहे ती अंधश्रद्धेच्या मुळावर प्रहार करण्याची. समाज जागृत झाला, तरच अशा घटनांना आळा बसेल.
#अंधश्रद्धा #महिलासुरक्षा #सामाजिकजागरूकता
#महाराष्ट्रएपस्टीनफाइल्स #SexScandal #अशोकखरात #रुपालीपाटीलचाकणकर #सत्ताआणिअत्याचार
या संपादकीय वर आज दिवसभर वेगवेगळी चर्चा झाली. त्यांच्या लेखात misogyny आहे असे मला नाही वाटले. मुद्दा इतकाच होता की जर कर्मकांडानी अंत्यविधी केले तर त्यात सुतक पाळणे ही येते इतकेच म्हणणे होते संपादकाचे. ���्यामुळे हे नीट वाचले तर मुद्दा कळून येईल.