@dnyanada24 आदरणीय ताई तुमच्याबद्दल असणारा आदर आज द्विगुणित झाला.. सर्वसामान्य माणसाच्या असामान्य कामगिरीला तुमच्याकडून जी शाबासकी मिळते ही गोष्ट अनमोल आहे ताई.. खुप खुप धन्यवाद
आज��जी लाईव्ह आहेत @abpmajhatv वर. आईवडिलांकडून आज्जी ही कला शिकल्या. आजी म्हणतात "मला कष्टाची भाकरी हवी म्हणून मी मेहनत घेते आणि माझ्या लेकरांना खाऊ घालते"
पुस्त��:
You Become What You think
तुम्ही जसा विचार करता, तसेच तुम्ही बनता
लेखक : शुभम कुमार सिंग
हे पुस्तक विचारांचं आणि कृतीचं बळ कसं वापरावं आणि आयुष्यात दीर्घकालीन बदल कसे घडवून आणावं याबद्दल मार्गदर्शन करतं.
प्रत्येक अध्यायात असंख्य गोष्टी शिकायला मिळतात ज्यामुळं ��ुमच्या विचारांमध्ये आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात.
हे पुस्तक सुख, सजगता, सवयी, वैयक्तिक वाढ, तत्त्वज्ञान, मानसिक आरोग्य, नातेसंबंध आणि मानवी मनोविज्ञान यासारख्या अनेक विषयांवर चांगली माहिती देते. सर्व अध्याय खूपच मनोरंजक आहेत कारण त्यात वेगवेगळे उदाहरण आणि सुंदर कोट्स देखील आहेत!
मला हे पुस्तक त्यातील कोट्स मुळे खूप आवडले.
पुस्तकातून काही कोट्स
१. "माझ्या��ाठी सौंदर्य म्हणजे शांतता, सुख आणि आरोग्य. झोप पुरे न झाल्याशिवाय हे सगळं मिळणं अशक्य!"
- बियॉन्से
२. "सर्व विचारांना मनात येऊ द्या पण आपला वेळ आणि लक्ष कोणत्या विचारांवर देतोय हे महत्त्वाचं असतं. याचा आपल्या भावनांवर खूप परिणाम होतो."
- डॉ. ज्युली स्मिथ
३. "प्रेरणा तुम्हाला सुरुवात करायला लावते पण सवयी तुम्हाला पुढे चालू ठेवते."
- जिम रॉन
४. " रोजच्या आयुष्यात तुम्ही काय विचार करता आणि काय कृती करता त्यामुळं तुम्ही काय बनता हे ठरत."
- हेराक्लिटस
असे बरेच कोट्स आणि विचार तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील. नक्की वाचा.
Book Available on Kindle 👇
https://t.co/l3R0t8vkRi
#booktwt #readers
मेळघाटातील आश्रमशाळेतील मुला-मुलींना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून “मैत्री” एक उपक्रम चालवते.. त्याचं नाव आहे “मैत्री - शाळा - हसत खेळत विज्ञान शिक्षण”. ह्यावर्षी ज्यांनी ह्यात भाग घेतला अशा मित्रांचा एक स्नेह-म��ळावा पुण्यात शनिवारी, २ मार्च रोजी दुपारी ४ ते ७ ह्या वेळेत घेतला ��हे. ह्याच वेळी पुढच्या वर्षाचं नियोजनही होणार आहे.
तुम्हाला ह्या उपक्रमाविषयी जाणून घ्यायचं असेल तर “मैत्री” ला ९३०९९३००१० वर किंवा ह्या उपक्रमाचा नेता ओंकार ह्याला ९८२३३०३०६५ वर “फक्त संदेश” पाठवा..
जरूर सहभागी व्हा.. तिथल्या मुला-मुलींना शिकवता शिकवता स्वत:लाही शिकवा !
समाजातल्या समस्यांवर प्रत्यक्ष कामाची संधी !
#मेळघाट #सामाजिककार्य #मैत्री #शिक्षण #आश्रमशाळा
@Maitripune
दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडा���ी झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय.
थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिक��त घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.
प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता.
#झाडे_लावा_झाडे_जगवा.
🌱
छ्त्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अवघ्या भारतवर्षाला खुप खुप शुभेच्छा व छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
आज दिल्लीत कन्नड माणूस रस्त्यावर येतो आहे. त्या मोर्चाचं नेतृत्व कर्नाटकाचे मुख्यमंत्री स्वत: करत आहेत. विषय महत्वाचा आहे. आपल्याही म्हणजे महाराष्ट्राच्याही दृष्टीनं महत्वाचा आहे. मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना कदाचित ह्याबाबत वृत्त देणार नाहीत म्हणून मुद्दाम लक्ष वेधावंसं वाटलं, कारण ह्याचसारखा मुद्दा केरळनी उपस्थित केला आहे आणि तामीळनाडूनी त्याला पाठींबा दिला आहे.
कर्नाटकाचं म्हणणं असं आहे की दिल्लीतील संघराज्य सरकार म्हणजे दिल्ली सरकार त्या राज्यावर अत्याचार करत आहे. त्यांच्या हक्काचा महसूल त्यांना दिला जात नाहीय. असं म्हटलं आहे की गेल्या ५ वर्षात राज्याचे हक्काचे १,८७,००० कोटी रूपये दिल्लीनं दिलेले नाहीत. केरळाचंही असंच म्हणणं आहे. त्यांनी तर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.
आपली म्हणजे महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे मुख्यमंत्रीमहोदय? @CMOMaharashtra@CafeEconomics #MyTaxMyRight #वित्तआयोग #संघराज्यपध्दती
मतदारांनो मतदार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
मतदारांना व्होटिंग कार्ड PDF स्वरूपात ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध.
त्यासाठी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक.
नसेल तर तोही ऑनलाईन लिंक करण्याची सोय.
नवीन नोंदणी, दुरुस्ती, फोटो बदल सर्व सेवा ऑनलाईन.
https://t.co/xyV95fpoQ0
हा चाललेला सावळा गोंधळ कायमस्वरूपी थांबवायचा असेल तर काय केले पाहिजे हे मी दै लोकसत्तातील लेखात एक वर्षांपूर्वी उपाय सुचविला होता.
पण मतदार बघ्याच्या भूमिकेत आणि राजकीय व्यवस्था गोंधळली.
तो परिच्छेद पुन्हा द��त आहे:
“................जर यावर कायमस्वरूपी तोडगा काढावयाचा असेल(1)