नंदुरबार जिल्ह्यातील हेंद्रापाडा या आदिवासी गावातील तीव्र पाणीटंचाईची बातमी महाराष��ट्र टाइम्सने ९ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली. ती वाचून पुण्यातील सहयोगी संस्थेने गावात टँकर पोहोचवला. प्रशासनालाही जाग आली असून, रस्ता तयार करून येथे ३० एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.