जागतिकअंमलीपदार्थ विरोधी दिन निमित्ताने साकीनाका पोलीस ठाणेच्या वतीने ‘नशामुक्त पंधरवडा’ अभियान अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये अधिकारी,अंमलदार यांचेसह सेंट पॉल पब्लिकस्कूलचे ७० विद्यार्थी,६ शिक्षक सहभागी होते.@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DcpZone10Mumbai
मा.महोदय,
मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुभहस्ते ड्रग्समु��्त मुंबई हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकारी,अंमलदार तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी, नागरिक यांनी हजर राहून शपथ घेतली.@CPMumbaiPolice @AddlCPWestMum @DcpZone10Mumbai
मा.महोदय,
आज रोजी 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियाना अंतर्गत *साकीनाका पोलीस ठाणे ��द्दीतील विविध रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालकां* शी संवाद साधून नशा केल्याचे दुष्परिणाम या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना नशा मुक्ती बाबत शपथ देण्यात आली आहे.@CPMumbaiPolice
@JanahitaJ22660@CPMumbaiPolice@MumbaiPolice सदर घटनेबाबत घाटकोपर पोलीस ठाणे ने 00 ने गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी साकीनाका पोलीस ठाण्यास वर्ग केला आहे. पुढील तपास चालू आहे...
मा.महोदय,
इसम श्री वासा रमय्या राहणार बेंगलोर हे साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत एका रिक्षामध्ये लॅपटॉप विसरले होते. UPI transaction द्वारे माहिती काढून सायबर व डिटेक्शन यांनी त्यांचा लॅपटॉप परत देण्यात आला आहे .@mumbaicp @mumbaipolice @AddlCPwestmum@dcpzone10
मा.महोदय,
तक्रारदार श्रीमती नीलम चेतन बागगर,वय 32 वर्ष यांचे दि.15/07/26 रोजी क्रेडिट कार्ड मधून 1,64,900/- रु. डेबिट झाले होते. तक्रारी बाबत साकीनाका पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी व स्टाफ यांनी तात्काळ संबंधित NSDL बँकेला तक्रारदार यांची डेबिट झालेली रक्कम
🔸Girls abducted from the Bandra area safely rescued from Uttarakhand; accused arrested!
A complaint was lodged at BKC Police Station regarding the abduction of two girls who were playing in the courtyard outside their home in the Bandra area.
Despite having no initial leads, the BKC Police launched an investigation, tracing the girls first to Nalasopara and subsequently to Uttarakhand. Under the guidance of their superiors and using technical expertise along with relentless efforts, the police safely rescued the girls and arrested the accused.
#MumbaiCaseFiles
🔸वांद्रे परिसरातून अपहृत झालेल्या मुलींची उत्तराखंड येथून सुरक्षित सुटका व आरोपीला अटक!
वांद्रे परिसरात घराबाहेर अंगणात खेळत असणाऱ्या दोन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार @BKC_PS येथे दाखल करण्यात आली.
सदर प्रकरणाबाबत कोणतेही धागेदुवे नसताना��ी बी. के. सी. पोलिसांनी प्रथम नालासोपारा येथे व वरिष्ठांच्या आदेशानुसार राज्याबाहेर उत्तराखंड येथे तपास केला. तांत्रिक कौशल्य आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर मुलींची सुरक्षित सुटका करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
#MumbaiCaseFiles
🔸DCP Zone 02 | Recovering Property. Restoring Trust.
Under the guidance of Hon. @CPMumbaiPolice , Shri Deven Bharti, DCP Zone 02 Smt. Ragasudha R. led a special recovery drive in which teams from L.T. Marg, Paydhuni, V.P. Marg, D.B. Marg, Gaondevi and Malabar Hill Police Stations, along with the South Zone 02 Cyber Squad, recovered 317 missing mobile phones from Mumbai, Maharashtra and other states.
Additionally, cash, gold and silver seized in various cases were returned to their rightful owners.
At a special handover ceremony held today, property worth over ₹73 lakh was restored to their respective owners.
🔸हरवलेली मालमत्ता तक्रारदारांना परत!
मा. @CPMumbaiPolice श्री. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२ (दक्षिण विभाग) सौ. रागसुधा आर. यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एल. टी. मार्ग, पायधुनी, व्ही. पी. मार्ग, डी. बी. मार्ग, गावदेवी, मलबार हिल पोलीस ठाणे आणि दक्षिण विभाग-२ सायबर पथकाने समन्वयाने ३१७ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले.
तसेच, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली रोख रक्कम, सोने-चांदीसह ₹ ७३ लाखांहून अधिक किंमतीची मालमत्ता संबंधित हक्कदारांना परत करण्यात आली.
नागरिकांचा विश्वास जपत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध आहेत.
#MumbaiPolice4All
🔹Congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and outstanding service.
At the Monthly Crime Review Conference held on July 11th, 2026, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their excellence in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and exceptional performance in the line of duty.
🔹सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांच्या उत्कृष्ट समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
११ जुलै २०२६ रोजी आयोजित 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना गुन्हे प्रकटीकरण, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी याबद्दल 'प्रशस्तीपत्र' देऊन सन्मानित करण्यात आले.
#ExcellenceInPolicing
🔸Fake Doctor Exposed After 28 Years of Fraudulent Practice!
Acting on confidential intelligence, Mumbai Police Crime Branch arrested a 50-year-old man who allegedly posed as a doctor for nearly 28 years using forged identity documents and credentials.
Preliminary investigation revealed a multi-state fraud involving misuse of CSR funds through multiple bank accounts, with embezzlement exceeding ₹10 crore over the last three years. Fake identity cards, certificates, medical supplies, and other incriminating documents were recovered during the search.
A case has been registered under relevant provisions of the BNS, the Medical Profession Act, and the National Medical Commission Act. Further investigation is underway.
🔸२८ वर्षांपासून बोगस प्रॅक्टिस करणाऱ्या बनावट डॉक्टराचा पर्दाफाश!
गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका ५० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सदर व्यक्ती बनावट ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रांचा वापर करून तब्बल २८ वर्षे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होती.
प्राथमिक तपासात यामागे एक आंतरराज्यीय घोटाळा उघडकीस आला असून, विविध बँक खात्यांद्वारे 'सीएसआर' निधीचा गैरवापर करून गेल्या तीन वर्षांत १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार करण्यात आला आहे.
झडतीदरम्यान आरोपीकडून बनावट ओळखपत्रे, प्रमाणपत्रे, वैद्यकीय साहित्य आणि इतर गुन्हेगारी दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), वैद्यकीय व्��ावसायिक कायदा आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#MumbaiCaseFiles
#MumbaiPolice4All
#MumbaiCrimeBranch
🔸Dear Mumbaikars,
You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances.
No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issues is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात माझी भेट घेऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे मांडू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸As part of the #DrugsFreeMumbai campaign, Mumbai Police’s Anti-Narcotics Cell conducted a large-scale awareness initiative across 100+ municipal schools simultaneously, reaching thousands of students through online session.
Students were sensitized about the physical, mental, social, and legal consequences of drug abuse.
Mumbai Police remains committed to reducing both the supply and demand of narcotics through strict enforcement and continuous public awareness. Mumbaikars are urged to report any information related to the sale, trafficking, or consumption of drugs.
🔸बृहन्मुंबई आयुक्तलय अंतर्गत महानगरपालिकेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये #DrugsFreeMumbai अभियान राबविण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेचा विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे हा सदर अभियानाचा मुख्य हेतू होता.
सदर उपक्रमात अंमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अशाप्रकारे मुंबई पोलीस दल हे अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून, ड्रग्स पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रग्स तस्करांवर कारवाई करत आहेत. तसेच मुंबईकरांना अंमली पदार्थांचे सेवन टाळून "ड्रग्ज फ्री मुंबई" साठी ड्रग्ज खरेदी/विक्री/तस्करी/सेवनाबाबत पोलीसांना त्वरित माहिती देवून मदत करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.
#HoshMaiAaoMumbai
#SayNoToDrugsYesToLife
🔸As the monsoon brings its share of challenges, we continue to ensure safety, support and swift assistance across the city.
For any emergency: Dial 100 / 112 / 103.
🔸मुंबईकरांची सुरक्षितता हेच आमचे प्राधान्य. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, मदतीसाठी आणि त्वरित प्रतिसादासाठी मुंबई पोलीस सदैव सज्ज आहेत.
आपत्कालीन मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क करा : १०० / ११२ / १०३
#RedAlert
#OnDutyForMumbai
#MumbaiPolice4All
🔸Swift Investigation Leads to Arrest in Murder-for-Robbery Case
@MalbarHillPS has arrested the accused in connection with a murder-for-robbery case in Simlanagar, Malabar Hill, where a 55-year-old woman was found strangled to death at her residence. Gold and silver ornaments, mobile phones, and other valuables worth approximately ₹9 lakh were stolen from the house.
Acting on a complaint lodged by the victim’s daughter, a case was registered at the Malabar Hill Police Station. Through extensive technical analysis and intelligence gathering, police teams successfully identified and apprehended the accused. Further investigation is underway.
🔸मलबार हिल येथील खून व चोरीच्या गुन्ह्याची उकल, आरोपीला अटक
@MalbarHillPS च्या हद्दीतील सिमलानगर परिसरात एका ५५ वर्षीय महिलेचा त्यांच्या राहत्या घरी गळा आवळून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर घरातील सुमारे ₹९ लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता.
महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला शोधून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
#MumbaiCaseFiles
🔸Dear Mumbaikars,
You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday to share your queries, concerns, and grievances.
No prior appointment is required. Our top priority is to address your concerns and take appropriate action.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात माझी भेट घेऊन तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्यासमोर मांडू शकता.
या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. तुमच्या समस्यां��र प्रभावी कार्यवाही करणे आमचे कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
Wrong side. Serious consequences.
On 5 July, a car with tinted windows was reportedly driven at high speed on the wrong side of the road and struck two pedestrians near Inorbit Mall.
A case has been registered at @BangurNagarPS under BNS sections 281, 125, 115(2), 126(2), 351(2), and 352, along with sections 184, 177, and 194(b)(1) of the Motor Vehicles Act. Further investigation is underway.
चुकीच्या दिशेने प्रवास म्हणजे अपघाताला आमंत्रण!
दि. ५ जुलै रोजी इनऑर्बिट मॉलजवळ टिंटेड काचा असलेली एक गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या चुकीच्या दिशेने येऊन दोन पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना घडली.
सदर प्रकरणाबाबत @BangurNagarPS येथे भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५, ११५(२), १२६(२), ३५१(२), ३५२ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १७७ आणि १९४(ब)(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्��ात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#MumbaiPolice4All
🔸On-ground personnel from @KharPS assisting Mumbaikars and ensuring public safety during the ongoing red alert.
🔸मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी @KharPS चे पोलीस अधिक���री व अंमलदार रेड अलर्टदरम्यान रस्त्यावर उतरून नागरिकांच्या मदतीसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत.
#RedAlert
#OnDutyForMumbai
#MumbaiPolice4All
🔸“Always Alert, Always Helpful”
Rain or shine, our personnel stand committed to keeping the city safe and moving.
Thank you Mumbai.
🔸”सदैव तत्पर, सदैव मदतीस”
संततधार पावसात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक कौतुक. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी दाखवलेल्या तत्परतेस सलाम.
#OnDutyForMumbai
#MumbaiPolice4All
🔸As per IMD Mumbai, intense rain with gusty winds (50–60 kmph) are likely to occur at isolated places in Mumbai, Thane and Raigad over the next 3 hours.
Step outdoors only if absolutely necessary. In case of any emergency, dial 112 /100/ 103 for assistance.
🔸हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन तास मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी मुसळधार पावसासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने अनावश्यक प्रवास टाळा. मदतीची गरज भासल्यास ११२/ १०० /१०३ वर संपर्क साधा.
#RainAlert
#OnDutyForMumbai
#MumbaiPolice4All