राजे एकांतात देवीचे ध्यान करीत बसले असता, एकाएकी दिव्य प्रकाश पडला. श्री जगदंबा प्रत्यक्ष स्वरूपे उभी राहिली. राजाने लोटांगण घातले. तेव्हा माता बोलली, "उठ बाळा, हा शत्रू तुझ काही करू शकणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. हे दैवी शस्त्र घे आणि म्लेंच्छांचा संहार कर !" असे म्हणून देवीने एक लखलखती तलवार राजांच्या स्वाधीन केली आणि ती अंतर्धान पावली.
संदर्भ :- शिवदिग्विजय बखर
#आदिशक्ती #तुळजाभवानी #राजा_शिवछत्रपती
नामचि तारक तरले भवसिंधु
हरिनाम छंद मंत्रसार ||
मुक्ताई चिंत��� हरिप्रेम पोटी
नित्य नाम घोटी अमृत सदा ||
संत मुक्ताबाई या महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक महत्त्वपूर्ण संत-कवयित्री, तत्त्वचिंतक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होत्या. आपल्या अभंगरचनांतून त्यांनी भक्ती, आत्मज्ञान, क्षमाशीलता, समत्व आणि अहंकारत्याग यांचा संदेश दिला. संत मुक्ताबाईंचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे आश्विन शुद्ध प्रतिपदा अ��्थात घटस्थापनेच्या दिवशी झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई होत. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव हे त्यांचे तीन थोरले भाऊ होते. या चारही भावंडांनी प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञान, भक्ती आणि अध्यात्म यांची साधना केली आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेला समृद्ध केले. विठ्ठलपंतांनी संन्यास स्वीकारल्यानंतर गृहस्थाश्रमात पुनरागमन केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तत्कालीन ���ूढीवादी समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या सामाजिक विरोधाचा परिणाम चारही भावंडांच्या जीवनावर झाला. त्यांना बहिष्कार आणि अनेक संकटे सहन करावी लागली. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी ही भावंडे पैठण येथे गेली. मातापित्यांच्या निधनानंतर मुक्ताबाईंवर आपल्या भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी आली. लहान वयातच आलेल्या या अनुभवांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला गंभीरता, सहनशीलता आणि ��ैचारिक प्रगल्भता प्राप्त झाली. प्रतिकूल परिस्थितीमुळे खचून न जाता त्यांनी आध्यात्मिक साधनेचा मार्ग स्वीकारला.
संत मुक्ताबाईंच्या आध्यात्मिक विचारांवर नाथसंप्रदायाचा प्रभाव होता. त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तिनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य होते. निवृत्तिनाथांकडून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले. नाथसंप्रदायातील योगसाधना, आत्मस्वरूपाचे ज्ञान आणि अंतर्मुख चिंतन यांचा प्रभाव मुक्ताबाईंच्या विचारांत दिसून येतो. त्यांच्या शिकवणीत केवळ कर्मकांड किंवा बाह्य आचारांपेक्षा अंतःकरणाची शुद्धता, अहंकाराचा त्याग आणि सर्व परिस्थितींमध्ये मनाचे संतुलन राखण्याला महत्त्व आहे. चांगदेव हे दीर्घकाळ तपश्चर्या करणारे सिद्धयोगी होते. मात्र त्यांच्यात अहंकार शिल्लक होता. संत ज्ञानेश्वरांनी त्यांना पाठविलेल्या "चांगदेव पासष्टी" या तत्त��वज्ञानप्रधान रचनेचा अर्थ मुक्ताबाईंनी चांगदेवांना समजावून सांगितला. या मार्गदर्शनातून चांगदेवांना आत्मज्ञानाची जाणीव झाली आणि त्यांनी मुक्ताबाईंना आध्यात्मिक गुरू मानले. या प्रसंगातून मुक्ताबाईंच्या आध्यात्मिक प्रगल्भतेचे आणि ज्ञानाला वयापेक्षा अधिक महत्त्व देणाऱ्या संतविचारांचे दर्शन घडते. एकदा ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंना मांडे बनविण्यास सांगितले असता त्यासाठी मातीचे खापर आणण्याकरिता त्या कुंभारवाड्यात गेल्या. मात्र विसोबा चाटी यांच्या विरोधामुळे त्यांना खापर मिळाले नाही. मुक्ताबाई रिकाम्या हाताने परतल्यावर ज्ञानेश्वरांनी योगसामर्थ्याने स्वत���ची पाठ तापवून त्यावर मांडे भाजण्यास सांगितले. हा प्रसंग पाहून विसोबा प्रभावित झाले आणि त्यांनी या भावंडांचा विरोध सोडून त्यांना शरण गेले. पुढे ते "विसोबा खेचर" या नावाने प्रसिद्ध झाले.
संत मुक्ताबाईंच्या साहित्यामध्ये "ताटीचे अभंग" विशेष प्रसिद्ध आहेत. या रचनांमध्ये आत्मक्लेशामुळे ताटी लावून बसलेल्या संत ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईंनी ताटी उघडण्याची विनंती केल्याचे वर्णन आहे. या प���रसंगातून मुक्ताबाईंचे बंधुप्रेम, समंजसपणा आणि आध्यात्मिक प्रगल्भता व्यक्त होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना नाथसंप्रदायाच्या शिकवणीची आठवण करून देत क्षमाशीलता, शांतता आणि समत्व यांचे महत्त्व पटवून दिले. मुक्ताबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच�� साधी, स्पष्ट आणि अर्थगर्भ भाषा. त्या गहन आध्यात्मिक तत्त्वज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा उदाहरणांतून स्पष्ट करतात. त्यांच्या विचारांमध्ये बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्मनातील वृत्तीला अधिक महत्त्व दिलेले दिसते. व्यक्तीने स्वतःच्या अहंकाराचे परीक्षण करावे, मान-अपमानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांशी सहिष्णुतेने वागावे असा संदेश त्यांच्या रचनांतून मिळतो. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतल्यानंतर निवृत्तिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रेला गेले. या प्रवासादरम्यान तापी नदीच्या परिसरात वीज कडाडली आणि मुक्ताबाई त्या दिव्य प्रकाशात अदृश्य झाल्या. संत मुक्ताबाईंचे संपूर्ण जीवन ज्ञान, वैराग्य, आत्मस्वातंत्र्य आणि ईश्वरनिष्ठेचा प्रेरणादायी वारसा आहे. थोर संत-कवयित्री, तत्त्वचिंतक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक संत मुक्ताबाईंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩
#आदिशक्ती #संत_मुक्ताबाई #रामकृष्णहरी
नभी वावरे जा अणुरेणु काही
रिता ठाव या राघवेवीण नाही ||
तया पाहता पाहता तोचि जाले
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ||
समर्थ रामदासांच्या या ओवीत श्रीरामाचे सर्वव्यापी आणि अद्वैत स्वरूप अत्यंत सुंदरपणे व्यक्त झाले आहे. समर्थांच्या दृष्टीने राम म्हणजे केवळ अयोध्येचा राजा किंवा दशरथपुत्र श्रीराम एवढ्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्यापून असलेले परमचैतन्य आहे. आकाशामध्ये विहरणाऱ्या प्रत्येक अणुरेणूपासून सृष्टीतील प्रत्���ेक घटकापर्यंत रामाचे अस्तित्व व्यापलेले आहे. त्यामुळे रामापासून रिक्त असे या विश्वात कोणतेही स्थान नाही. या अभंगात पुढे रामाच्या अखंड चिंतनातून साधकाला प्राप्त होणाऱ्या आत्मानुभूतीचे वर्णन ��ेते. रामाचे सतत ध्यान, स्मरण आणि चिंतन करता करता साधकाच्या मनातील "मी" पणाची भावना क्षीण होत जाते. सुरुवातीला भक्ताला स्वतःपेक्षा राम वेगळा वाटतो, परंतु रामाचे अखंड चिंतन करता करता "मी" आणि "राम" यांच्यातील भेदभाव नाहीसा होऊन साधक अंतःकरणाने राममय होतो. येथे "राम होणे" याचा अर्थ बाह्य रूपाने रामासारखे होणे नसून स्वतःमध्ये आणि सर्वत्र असलेल्या त्याच परमचैतन्याचा अनुभव घेणे असा आहे.
शे��टच्या चरणात समर्थ या अनुभूतीची अधिक गूढ अवस्था सांगतात. रामतत्त्वाचा साक्षात्कार झाल्यावर दृश्य-अदृश्य, ज्ञात-अज्ञात, सगुण-निर्गुण आणि जीव-परमात्मा असे सर्व भेद लय पावतात. "मी" आणि "तो" अशी द्वैताची जाणीव उरत नाही. पाहणारा, पाहिले जाणारे आणि ज्याचे दर्शन घेतले जाते यांच्यातील भेदही नाहीसा होतो. हीच अद्वैताची अनुभूती आहे. म्हणून या अभंगाचा मुख्य आशय असा की राम सर्वत्र आहे हे केवळ बौद्धिक ज्ञान न राहता त्याचा प्रत्यक्ष अनुभव साधकाला आला पाहिजे. त्या अनुभवासाठी अखंड रामस्मरण आणि चिंतन आवश्यक आहे. रामाचे चिंतन करता करता अहंकाराचा लय होतो आणि अखेरीस सर्व चराचरात एकच रामतत्त्व व्यापून असल्याची अनुभूती प्राप्त होते.
#जयश्रीराम #श्रीरामसमर्थ #समर्थ_रामदास_स्वामी
AFZAL KHAN CAME TO TULJAPUR.
He smashed the idol of Tulja Bhavani, kuladevi of the Bhonsles. Sri Bhavani was broken into pieces, thrown into a hand-mill and pounded into dust. A cow was slaughtered in front of the temple.
He was dead within weeks at Pratapgad.
THE TEMPLE WAS RESTORED.
Shivprabhat 🙏🏽
देशाच्या पंतप्रधानापासून गरिबातल्या गरीब घरात जे 'सूर आणि शब्द ' गेले काही दिवस भक्तिभावाने म्हणले जात आहेत त्याचे जनक -
'नारायण सूर्याजीपंत ठोसर '
#जयजयरघुवीरसमर्थ#ग���पतीबाप्पामोरया
ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥ 1 ॥
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु । मकार महेश जाणियेला ॥ 2 ॥
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न । तो हा गजानन मायबाप ॥ 3 ॥
तुका ह्मणे ऐसी आहे वेदवाणी । पहावी पुराणे व्यासाचिया ॥ 4 ॥
🙏🕉️🛕🪔📿🌟✨💐😇
भूमिभार उतरावया | जन्म धरिला श्रीपादराया |
दत्तात्रेय अवधूतरायें | वेष धरि��ा नरदेहीं ||
श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान श्रीदत्तात्रेयांचे आद्य पूर्णावतार मानले जातात. त्यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या पोटी झाला. सुमारे तीस वर्षांच्या अवतारकाळात त्यांनी धर्म, भक्ती, ज्ञान, सदाचार आणि गुरुतत्त्वाचा संदेश दिला. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकात्म तत्त्वाचे स्वरूप असून कलियुगातील जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी दत्ततत्त्वाने विविध अवतार धारण केले. या परंपरेत श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांना प्रमुख दत्तावतार मानले जाते.
पिठापूर येथे अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी हे धार्मिक दांपत्य राहत होते. महालय अमावस्येच्या दिवशी त्यांच्या घरी भिक्षेसाठी आलेल्या अवधूताचा सुमती महाराणींनी श्रद्धेने सत्कार केला. ते अवधूत भगवान दत्तात्रेय होते. त्यांच्या आशीर्वादाने भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. बालपणापासूनच श्र��पादांची असामान्य बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक प्रतिभा दिसून आली. वयाच्या सातव्या वर्षी मुंज झाल्यानंतर त्यांनी वेद, मीमांसा, तर्क आणि वेदान्त यांचे अध्ययन केले आणि अल्पवयातच विद्वत्ता प्राप्त केली. अप्पलराज शर्मा, बापनाचार्युलु आणि श्रीपाद यांच्यात धर्म, सत्य व कर्तव्य यांवर शास्त्रचर्चा होत असे. वेंकट सुब्बया श्रेष्ठी आणि बापनाचार्युलु यांच्या प्रसंगातून वचनपालनाचे महत्त्व स्पष्ट होते. महालय पक्षात दिलेल्या वचनाचा त्यांना विसर पडला असता श्रीपादांनी त्याची आठवण करून दिली आणि वचन पाळणे हे धर्माचरणाचा भाग असल्याचे सांगितले. याच प���रसंगातून त्यांनी कर्म, कर्मफल तसेच भौतिक काळ आणि योगकाळ यांचे सूक्ष्म विवेचन केले. श्रीपादांच्या शिकवणीत तीर्थाचे महत्त्व केवळ बाह्य वास्तव्यापेक्षा अंतःकरणातील भावनेत आहे. काशीमध्ये राहूनही आचरण शुद्ध नसेल तर काशीवासाचे फल मिळत नाही. त्याचप्रमाणे पिठापूरमध्ये राहून श्रीपादांचे दर्शन घेतले तरी मन भक्तीने जोडलेले नसेल तर त्याचा पूर्ण आध्यात्मिक लाभ होत नाही.
कुरवपूर हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रातील प्रमुख क्षेत्र मानले जाते. कृष्णा नदीकाठचे हे स्थान त्यांच्या तपोभूमी, साधनाभूमी आणि सत्संगभूमी म्हणून दत्तपरंपरेत प्रसिद्ध आहे. ते ब्रह्मचारी वेषात राहून स्नान, गायत्री जप आणि सूर्योपासना करीत. कुरवपूरमध्ये नियमित सत्संग होत असून त्यात योगविद्या, पुराणे, उपनिषदे, वेद, गुरुतत्त्व, श्रीविद्या आणि शिवोपासना यांवर मार्गदर्शन केले जात असे. सत्संगानंतर ते भक्तांच्या वैयक्तिक अडचणी ऐकून त्यांना मार्गदर्शन करीत. गुरुवारचा विशेष सत्संग आणि अन्नदान महत्त्वाचे मानले जात असे. भक्त धान्य व भाजीपाला आणत आणि स��्वांना प्रसादरूपाने भोजन दिले जाई. श्रीपाद स्वतः भक्तांना वाढत असत. श्रीपाद पंचदेव पहाडावर सत्संगासाठी कृष्णा नदी पाण्यावरून चालत पार करीत आणि त्यांच्या चरणांखाली कमळे उमलत अशी अद्भुत लीला सांगितली जाते. शुक्रवारी विवाहेच्छुक कन्यांना आशीर्वाद व हळकुंडाचा प्रसाद देत असत. भक्तांशी ते मातेसमान, पित्यासमान आणि आपुलकीच्या संबोधनांनी संवाद साधत. दत्तानंद स्वामींच्या बालपणी त्यांना ��ाणीची अडचण आणि व्याधी होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना पिठापूर येथे आणले असता बाल श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा करून व्याधी दूर होण्याचा आणि ज्ञानप्राप्तीचा आशीर्वाद दिला.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिकवणीत धर्माचरण, कर्म, नामस्मरण, अन्नदान, सद्गुरूभक्ती, वैराग्य, सदाचार, अहंकारत्याग आणि आत्मज्ञान यांना विशेष महत्त्व आहे. विहित कर्म करावे त्याचे कर्तेपण अहंकाराने घेऊ नये आणि भगवंताचे नामस्मरण करीत सत्कर्माचा मार्ग स्वीकारावा हा त्यांच्या शिकवणीचा गाभा मानला जातो. श्रीपादांच्या बारा अभयवचनांत भक्तरक्षण, नामस्मरण, ध्यान, अन्नदान, ��ुद्ध भक्ती आणि सद्गुरुकृपा यांचा संदेश आहे. कोणत्याही देवतेची किंवा सद्गुरूची श्रद्धेने केलेली उपासना दत्ततत्त्वापर्यंत पोहोचते तसेच सद्गुरू भक्ताला धर्म आणि कर्ममार्गावर टिकवून ठेवतात अशी या वचनांची भक्तीय मांडणी आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनंतर श्रीनृसिंह सरस्वती आणि पुढे स्वामी समर्थ यांना प्रमुख दत्तावतार मानले जाते. श्रीपादांच्या अवतारकार्याची समाप्ती आश्विन कृष्ण द्वादशीला कुरवपूर येथे झाली या घटनेला गुरुद्वादशी किंवा निजानंदगमन असे संबोधले जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#श्रीगुरुदेवदत्त #श्रीपाद_श्रीवल्लभ #अवधूत_चिंतन
कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः ||
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ||
दहन्तु पापं सर्वं मे गृह��णन्त्वर्घ्यं नमो नमः ||
ऋषी पंचमी हे भाद्रपद शुक्ल पंचमीला आचरले जाणारे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या या पंचमीला सप्तर्षींचे पूजन, व्रत, स्नान, आचारसंयम आणि विशिष्ट आहारपरंपरा यांना महत्त्व दिले जाते. "ऋषी" ही संकल्पना भारतीय धार्मिक परंपरेत अत्यंत प्राचीन आहे. ऋग्वेदातील अनेक सूक्ते विशिष्ट ऋषिकुलांशी संबंधित मानली जातात. वैदिक परंपरेत ऋषी हे केवळ तपस्वी किंवा वनवासी साधू नसून मंत्रद्रष्टे, ज्ञानाचे साधक आणि वैदिक परंपरेचे संवाहक मानले गेले आहेत. त्यामुळे ऋषींच्या स्मरणामागे भारतीय संस्कृतीतील ज्ञानपरंपरेबद्दल आदराची भावना फार प्राचीन आहे. सप्तर्षींच्या संकल्पनेचा अधिक स्पष्ट उल्लेख उत्तरवैदिक साहित्यात आढळतो. बृहदारण्यक उपनिषदात गौतम, भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी, वसिष्ठ, कश्यप आणि अत्रि या सात ऋषींचा उल्लेख आढळतो.
पुराणकालात सप्तर्षींची संकल्पना अधिक व्यापक झाली. विविध मन्वंतरांसाठी वेगवेगळे सप्तर्षी सांगितले असले तरी वैवस्वत मन्वंतरातील कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी मानले जातात. वसिष्ठांची पत्नी अरुंधतीलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले. ऋषी पंचमीला या सप्तर्षींसह अरुंधतीचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात सात ऋषींसाठी सात व अरुंधती���ाठी एक अशा आठ सुपाऱ्या मांडून षोडशोपचार पूजा करण्याची परंपरा आहे. ऋषी पंचमीचे स्वतंत्र व्रतस्वरूप वैदिक संहितांपेक्षा पुढील पुराणिक व धर्मशास्त्रीय परंपरेत स्पष्ट झाले. व्रतकथांमध्ये उत्तंकाची कथा, दोषपरिहार आणि प्रायश्चित्त यांचा उल्लेख येतो. प्राचीन काळात रजस्वला अवस्थेशी संबंधित धार्मिक शुचितेच्या कल्पनाही या व्रताशी जोडल्या गेल्या. ऋषी पंचमीच्या व्रतात विशिष्ट आहारपद्धत��ला महत्त्व आहे. महाराष्ट्रातील काही परंपरांमध्ये या दिवशी बैलांच्या श्रमाने उत्पन्न झालेले धान्य टाळून फलाहार सेवन केले जाते. चातुर्मासातील या व्रतात स्नान, शुद्धी, अर्घ्यदान आणि ऋषीपूजन यांना महत्त्व आहे. काही परंपरांमध्ये आघाड्याने दंतधावन, तीर्थस्नान व पंचगव्यप्राशन यांचाही उल्लेख आढळतो.
महाराष्ट्रात ऋषी पंचमीची परंपरा किमान अठराव्या शतकातील हस्तलिखित धार्मिक साहित्यात आढळते. ठाणे परिसरातील नोंदींमध्ये इ.स. १७३६ पासून पुढील काळातील ऋषी पंचमी पूजा-कथांच्या हस्तलिखित प्रती सापडतात. कोकणातील विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या लोकपरंपरेत दगडांना सप्तर्षींचे प्रतीक मानून पूजा, स्नान, दंतधावन आणि फलाहार करण्याची प्रथा नोंदली आहे. ऋषी पंचमी महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून नेपाळमध्येही सप्तर्षीपूजा, प्रायश्चित्त आणि स्त्रियांच्या धार्मिक सहभागाशी संबंधित व्रतपरंपरा आढळते. गणेश चतुर्थीनंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी येत असल्याने दोन्ही तिथींचा कालानुक्रमिक संबंध आहे. काही ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन पंचमीला केले जाते. ऋषी पंचमी ही वैदिक ऋषीपरंपरा, पुराणिक सप्तर्षी संकल्पना, धर्मश��स्त्रीय व्रतपरंपरा आणि महाराष्ट्रातील लोकाचार यांच्या दीर्घ विकासातून घडलेली परंपरा आहे.
#सप्तर्षी #ऋषिपंचमी #गणेशोत्सव #धार्मिक_परंपरा
समर्थांनी सुंदरमठी गणपती केला 🙏🚩
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात अनेक दशकांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नक्की हा सण केव्हा सुरू झाला हे सांगणे कठीण आहे, परंतु शिवकाळ आणि पेशव्यांच्या काळातील पत्रे तसेच समकालीन ग्रंथांतून गणेशोत्सवाबाबत अनेक पुरावे आपल्याला आढळतात. त्यातील एक पुरावा म्हणजे शिवछत्रपतींच्या स्वराज्यात समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेला श्रीगणेशोत्सव.
गिरीधरस्वामीकृत समर्थप्रताप या ग्रंथात "समर्थ��ंनी सुंदरमठी गणपती केला" असा उल्लेख मिळतो. उपलब्ध पुराव्यानुसार, शिवराज्याभिषेकानंतर साधारण इ.स. १६७५ ते १६७७ च्या दरम्यान समर्थांनी शिवथरघळीत म्हणजेच सुंदरमठी गणपतीची मूर्ती स्थापन करून गणेशोत्सव सुरू केला. त्यांनी तेथे दोन पुरुष उंचीची गणपतीची सुंदर मूर्ती घडवली आणि भाद्रपद महिन्यात त्या संपूर्ण प्रांतात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे "अकरा मुठी धान्य" मागितले. हे ऐकून महाराजांना काहीसे आश्चर्य वाटले. मात्र त्यांनी समर्थांना एकशे एकवीस खंडी धान्य पाठवून दिले. समर्थ हे हनुमानाचे अवतार मानले जात. हनुमानाची मूठ प्रचंड मोठी मानली जाते त्याप्रमाणे हनुमानाची एक मूठ ��्हणजे अकरा खंडी धान्य, आणि अकरा मुठी म्हणजे एकशे एकवीस खंडी धान्य. महाराजांनी तेवढेच धान्य अर्पण केले. (या एकशे एकवीस खंडी धान्याची सनद समर्थ संप्रदायाच्या कागदपत्रांत उपलब्ध आहे.)
संदर्भ :- समर्थ, कौस्तुभ कस्तुरे
#शिवथरघळ #समर्थ_रामदास_स्वामी #गणेशोत्सव
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया ||
गणेश चतुर्थी हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला साजरा होणारा महत्त्वाचा हिंदू उत्सव असून त्याला विनायकी चतुर्थी असेही म्हणतात. गणेशांना विघ्नहर्ता, बुद्धी-विवेकाचे अधिष्ठाता आणि मंगल���ार्याचे देवता मानले जाते. वैदिक साहित्यातील "गणपति" संकल्पना पुढे स्वतंत्र देवतारूपात विकसित झाली आणि पुराणांमध्ये गणेशाचे परिचित स्वरूप स्पष्ट झाले. गणेशपुराण व मुद्गलपुराणाने गणपत्य परंपरेला धार्मिक-तात्त्विक अधिष्ठान दिले. गणेश पुराणानुसार चार युगांत गणेशाची रूपे महोट्कट, मयूरेश्वर, गजानन आणि धूम्रकेतु अशी वर्णिली आहेत. मुद्गलपुराणात गणेशाचे वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लं��ोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण हे अष्टावतार वर्णिले आहेत. गणेशपुराणातील मयूरेश्वर रूपाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व असून मोरगाव हे अष्टविनायकांपैकी प्रमुख क्षेत्र आहे. गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून षोडशोपचारांनी पूजा, दुर्वा, शमीपत्र, मोदक, आरती व अथर्वशीर्ष पठण केले जाते. कुलाचारानुसार दीड ते दहा दिवसांनी उत्तरपूजा करून विसर्जन केले जाते. सार्वजनिक उत्सवाचा समारोप साधारण अनंत चतुर्दशीला होतो. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानण्याची पुराणपरंपरा असून चुकून चंद्रदर्शन झाल्यास स्यमंतक मण्याची कथा श्रवण करण्याची प्रथा आहे.
गणेशोपासनेचा विस्तार मध्ययुगात घरगुती पूजेपलीकडे झाला आणि गणेशाची स्वतंत्र मंदिरे, शिल्प��� व तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाराष्ट्रातील अनेक शैव मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर गणेशाचे ललाटबिंब आढळते. शिलालेखीय व स्थापत्यपरंपरेतून दहाव्या शतकापर्यंत गणेशाला मंगलकार्यांशी संबंधित लोकप्रिय देवतेचे स्थान प्राप्त झाल्याचे संकेत मिळतात. मुंबईजवळील घारापुरी लेण्यांमध्येही गणेशाचे शिल्प आढळते ज्यातून शैव स्थापत्यपरंपरेतील त्यांचे स्थान स्पष्ट होते. तेराव्या शतकातील गणेशाच्या शिल्पांमध्ये मूषकवाहन, मोदकपात्र, सर्पालंकार व यज्ञोपवीत यांसारखी प्रतिमाशास्त्रीय वैशिष्ट्ये दिसतात. महाराष्ट्रातील लेण्याद्रीचे गिरिजात्मज ��णेशक्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. प्राचीन बौद्ध लेण्यांच्या समूहात असलेले हे अष्टविनायकांतील प्रमुख गुहास्थित गणेशक्षेत्र असून येथे प्राचीन गुहा-वास्तुशिल्प, शिल्पपरंपरा आणि पुढील गणेशतीर्थपरंपरेचा संगम दिसून येतो.
विदर्भातही गणेशोपासनेची प्राचीन केंद्रे आढळतात. कळंब, अडासा आणि आमगाव-गणेशटोला यांचा उल्लेख येतो. अडासाचे गणेश मंदिर तेराव्या शतकातील व हेमाडपंती परंपरेशी संबंधित मानले जाते. मध्ययुगात गणपत्य संप्रदायामुळे गणेशोपासनेला तात्त्विक स्वरूप प्राप्त झाले. गणेशपुराण व मुद्गलपुराणाने या परंपरेला धार्मिक अधिष्ठान दिले. मोरया गोसावींच्या परंपरेमुळे मोरगाव, चिंचवड व पुणे परिसरातील गणेशभक्ती अधिक व्यापक झाली. पेशवेकाळात गणेशोपासनेला मोठा राजाश्रय मिळाला. शनिवारवाडा व पेशव्यांच्या दरबारातील गणेशोत्सव तसेच मंदिरांना दिलेल्या देणग्या व जमिनी यांमुळे गणेशभक्तीला धार्मिकासोबतच सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.
पेशवाईनंतर ब्रिटिश काळात धार्मिक-सांस्कृतिक उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम ठरले. १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात ��ेली तर पुढे लोकमान्य टिळकांनी १८९० च्या दशकात या उत्सवाला व्यापक लोकसहभाग, संघटन आणि राष्ट्रजागृतीचे स्वरूप दिले. टिळकांच्या काळात व्याख्याने, कीर्तने, पोवाडे, नाटके व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजप्रबोधन, राष्ट्रभावना आणि सार्वजनिक संघटन यांना चालना मिळाली. पुढे गणेश मंडळे सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांची केंद्रे बनली. कालांतराने गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर भ���रतातील विविध राज्यांत आणि परदेशातही पोहोचला. आज गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबतच महाराष्ट्राची कला, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि सार्वजनिक सहभाग यांचे प्रतिनिधित्व करणारा व्यापक उत्सव बनला आहे. काळानुसार गणेशोत्सवाने धार्मिकतेसोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप धारण केले. विविध मंडळे समाजोपयोगी उपक्रम राबवू लागली तर पर्यावरणपूरक मूर्ती व विसर्जनाला प्रोत्साहन म��ळाले. २०२५ पासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला "राज्य महोत्सव" म्हणून मान्यता दिली. त्यामुळे गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोपा यांचा अविभाज्य भाग बनला आहे.
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
#��िघ्नहर्ता #गणपती_बाप्पा_मोरया #गणेशोत्सव
देखिली तुळजामाता | निवालो अंतरी सुखे |
तुटली सर्वही चिंता | थोर आधार वाटला ||
संसार पाहता मागे | पाळिले सर्वही कुळा |
प्रस्तुत प्रत्ययो आला | रक्षिते बहुतापरी ||
पूर्विती कामना सर्वे | इच्छा पूर्ण मनोगते |
धन्य हा देव लोभाळू | सांभाळ करितो सदा ||
आघात संकटे वारी | निवारी दुष्ट दुर्जना |
संकटी भर्वसा मोठा | तत्काळ काम होतसे ||
लालची चुकती वेडे | कृपाळू जननी ��री |
लक्ष की कोटी अन्याये | बहुत क्षमिले खरे ||
वन्ही हो सर्प हो विंचू | बाळकू घेतसे बरे |
सर्वही चुकावी माता | पोर लाबाड नेणते ||
लोभाळू बायका माया | त्यामध्ये मुख्य जननी |
बाळका वाढवी माता | मातेला मुख्य जननी ||
सर्वही बाळके जीची | त्रैलोक्य जननी पाहा |
साक्षिणी सर्व लोभाळू | मर्यादा कोण रे करी ||
अनंतरूपिणी माया | काया रक्षी परोपरी |
विचित्र महिमा आहे | कळला न वाचे कदा ||
सर्वांचे मूळ हे माया | मूळमाया म्हणोनिया |
सृष्टीची आदिशक्ती हे | आदिशक्ती ���्हणोनिया ||
राम उपासना आहे | हे रामवरदायिनी |
सख्य चालते सर्वै | प्रवृत्तीनिवृत्तीकडे ||
-- समर्थ रामदास स्वामी
#कुलस्वामिनी #तुळजाभवानी #रामवरदायिनी
आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या आतां शेंदूराले घोटा ||
आतां बांधा रे तोरनं सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदुर ||
-- बहिणाबाई चौधरी
महाराष्ट्राच्या कृषिप्रधान संस्कृतीत बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. पोळा म्हणजे केवळ बैलांची पूजा नव्हे तर वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्याला विश्रांती देणे, आंघोळ घालणे, सजवणे, पूजा करणे आणि मान देणे ही या सणाची मध्यवर्ती भावना आहे. महाराष्ट्रात पोळा श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा होतो.
वैदिक साहित्यात शेती, नांगरणी आण�� बैलांच्या उपयोगाचे प्राचीन संदर्भ आढळतात. ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५७ व्या सूक्तात नांगरणी व कृषिसमृद्धीचा उल्लेख आहे. तर अथर्ववेदातील कृषिसूक्तात नांगराला जुंपलेले बैल आणि भूमीची मशागत यांचे संदर्भ आहेत. प्राचीन बौद्ध साहित्यामधील जातकनिदानमध्ये कपिलवस्तूतील नांगरणीच्या उत्सवाचे वर्णन येते. या उत्सवात नगर सजवले जात असे, बैल व नांगर अलंकृत केले जात आणि राजा स्वतः नांगरणीच्य�� विधीत सहभागी होत असे. पुराणिक काळात बैलाला आणखी एक धार्मिक आयाम प्राप्त झाला. नंदी हा शिवाचा वाहन आणि शैव परंपरेतील पवित्र बैल म्हणून प्रतिष्ठित झाला. पुराणिक साहित्यात नंदीशी संबंधित धार्मिक कल्पना विकसित झाल्या आणि त्यामुळे बैलाला केवळ कृषीतील श्रम करणारा प्राणी न मानता धार्मिक-सांस्कृतिक प्रतीकाचे स्थानही प्राप्त झाले. पोळ्याचे ऐतिहासिक स्वरूप समजून घेण्यासाठी ग्रामीण कृषिजीवनातील बैलांचे स्थान आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रात पोळ्याचा ठोस सामाजिक आणि प्रशासकीय संदर्भ अठराव्या शतकात आढळतो. १७७६–७७ च्या परगणा पारनेरशी संबंधित कागदपत्रात गावच्या पहारेकऱ्याने आपल्या पारंपरिक हक्कांमध्ये दसरा आणि बैलपोळ्याच्या दिवशी नैवेद्याचा हक्क असल्याचा दावा केल्याची नोंद आहे.
पोळ्याची सुरुवात अनेक ठिकाणी आदल्या दिवसापासून "आवतण" देऊन होते. "आज आवतण घ्या, उद्या जेवायला या" असे म्हणत बैलांना मानाचा पाहुणा मानले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदी, ओढा किंवा तलावावर नेऊन अंघोळ घातली जाते आणि त्यांची नि��ा राखली जाते. त्यानंतर झूल, गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, बाशिंग, घुंगरांच्या माळा, नवी वेसण-कासरा अशा प्रकारे साजशृंगार केला जातो. खांद्याला हळद-तूप किंवा तेल लावून मळण्याची अथवा शेकण्याची प्रथाही काही भागांत आहे. यानंतर बैलांची पूजा व औक्षण करून त्यांना गोडधोड, पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला जातो. काही ठिकाणी बैलांची सेवा करणाऱ्या बैलकरीलाही नवीन कपडे देतात. गावातील सजवलेल्या बैलजोड्यांची सनई, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. मानाची व्यक्ती तोरण तोडते ज्याला काही भागांत "पोळा फुटणे" म्हणतात.
१८८२ मधील Bombay High Court मध्ये पोळ्याच्या दिवशी बैलांची मिरवणूक काढण्याच्या हक्काचा प्रश्न न्यायालयासमोर आला. यावरून एकोणिसाव्या शतकात पोळ्याची मिरवणूक ही स्थानिक सामाजिक परंपरेचा भाग बनली होती असे दिसते. पुढे १९१६ मध्ये R.V. Russell यांनी कुणबी समाजातील पोळ्याचे वर्��न करताना बैलांची मिरवणूक, मखर, तोरण आणि पारंपरिक क्रम यांची नोंद केली. त्यामुळे पोळा हा विकसित विधी आणि सामाजिक संकेत असलेला लोकउत्सव होता हे स्पष्ट होते. विदर्भातील तान्हा पोळा या परंपरेत मुले मातीचे किंवा लाकडी बैल सजवून घरोघरी नेतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कर्नाटकी बेंदूरसारख्या संबंधित परंपराही आढळतात. आज शेती यांत्रिकीकरणामुळे बैलांवरील अवलंबित्व कमी झाले असले तरी पोळा श्रम, पशुधन आणि कृषिसंस्कृतीबद्दलची कृतज्ञता जपतो.
#पोळा #बैलपोळा #कृषिप्रधान_संस्कृती #महाराष्ट्र
भैय्यांच्या वोटबँकेसाठी इतकी लाचारी की हा सरळ सरळ भोजपुरी बोलतोय आता, वरून महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य असेल जिथे हिंदी भाषी महासंकल्प सभा आयोजली जातीये, महाराष्ट्राच्या इतिहासातील बिमारू भैय्या मुख्यमंत्री, मी याचा एकेकाळी समर्थक होतो याची मला लाजच नाही तर अपराधीपणा वाटतोय आता.
अनादि अंबिका भगवती | बोध पर���ी घेउनी हाती ||
पोत ज्ञानाचा पाजळती | उदो उदो भक्त नाचती ||
गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे ||
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी | नाचताती सोहंमेळीं ||
द्वैतभाव विसरूनी बळी | खेळती अंबे तुझे गोंधळी ||
मुगुटमणी पुंडलीक | तेहतीस कोटी देव नायक ||
गोंधळ घालतील कौतुक | एका जनार्दनी नाचे देख ||
-- संत एकनाथ महाराज
संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या या अभंगात जगदंबेच्या दिव्य स्वरूपाचे, ज्ञानमयी शक्तीचे आणि भक्ती���य गोंधळाचे अत्यंत सुंदर आध्यात्मिक वर्णन केले आहे. या अभंगात शक्ती-उपासना, अद्वैत वेदांत आणि भक्तिमार्ग यांचा अ��्रतिम संगम दिसून येतो. जगदंबा ही संपूर्ण विश्वाची आदिशक्ती असून तीच जीवाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी आणि आत्मबोध देणारी परमशक्ती आहे असा या अभंगाचा मूलभूत संदेश आहे.
संत एकनाथ महाराज सांगतात की आदिशक्ती अंबिका ही अनादि, अनंत आणि संपूर्ण सृष्टीची जननी आहे. तिच्या हातातील बोधाची परडी हे अत्यंत गूढ प्रतीक आहे. परडीचा उपयोग गोंधळाच्या विधीत केला जातो. परंतु येथे तिचा अर्थ आत्मज्ञान, व���वेक आणि आत्मबोध असा आहे. जगदंबा भक्तांना धन, वैभव किंवा भौतिक सुख न देता ज्ञानरूपी अमूल्य संपत्ती प्रदान करते. तिच्या कृपेने अज्ञानरूपी अंधार दूर होतो आणि आत्मस्वरूपाचा प्रकाश प्रकट होतो. ज्ञानाचा पोत म्हणजे ज्ञानाचा दिवा किंवा मशाल. देवी हा ज्ञानदीप प्रज्वलित करून जीवाच्या अंतःकरणातील अज्ञान, भ्रम आणि मोह नाहीसे करते. सदर अभंगात गोंधळ हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला आहे. लोकपरंपरेत गोंधळ म्हणजे देवीसमोर सादर केला जाणारा धार्मिक विधी. परंतु संत एकनाथ महाराजांच्या दृष्टीने खरा गोंधळ म्हणजे परमचैतन्याचा, भक्तीचा आणि आत्मानंदाचा उत्सव आहे. जीवाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर त्याच्या अंतःकरणात जो दिव्य आनंद प्रकट होतो तोच खरा गोंधळ आहे.
संत एकनाथ महाराज व्यास, वसिष्ठ आणि शुक यांसारख्या महान ऋषींचा उल्लेख करून सांगतात की वेदवेत्ते, तपस्वी आणि ज्ञानी पुरुषही अखेरीस देवीच्या चरणी नम्र होतात. विद्वत्ता, तपस्या आणि शास्त्रज्ञान यांचे अंतिम फल भक्ती आणि आत्मानुभव हेच आहे. या अवस्थेत ते सोऽहम् या अद्वैत अनुभूतीत मग्न होतात. या अनुभूतीमुळे जीव आणि शिव, भक्त आणि परमेश्वर यांतील भेद पूर्णपणे नाहीसा होतो. अभंगाच्या शेवटच्या भागात भक्तश्रेष्ठ पुंडलिक आणि तेहतीस कोटी देवतांचा उल्लेख येतो. पुंडलिक हा निःस्वार्थ सेवा, मातृपितृभक्ती आणि अखंड भक्तीचे प्रतीक आहे. संत एकनाथ महाराज सूचित करतात की देवीची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग सेवा, नम्रता आणि भक्त�� हाच आहे. तेहतीस कोटी देवतांचा उल्लेख हा संख्येचा नसून सर्व दैवी शक्तींचे मूळ एकच आदिशक्ती आहे हा संदेश देणारा आहे. विविध देवता तिच्याच विविध रूपांचे प्रतीक आहेत. शेवटी संत एकनाथ महाराज स्वतःलाही या भ��्तिरंगात सहभागी करून देवीकृपेने प्राप्त झालेला आत्मानंद व्यक्त करतात.
संत एकनाथ महाराज सांगतात की जगदंबेची खरी उपासना ही केवळ बाह्य विधींमध्ये नसून शुद्ध भक्ती, आत्मज्ञान आणि अहंकाराच्या त्यागात आहे. तिच्या कृपेने अज्ञान व भेदभाव नाहीसे होऊन जीवाला आत्मस्वरूपाची जाणीव होते आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा अद्वैत अनुभव प्राप्त होतो.
#आदिशक्ती #तुळजाभवानी #संत_एकनाथ_महाराज
आमुच�� कुळींचे दैवत | श्रीगुरुदत्तराज समर्थ ||
तोचि आमुचा मायबाप | नाशी सकळ संताप ||
हेंचि आमुचें व्रत तप | मुखी दत्तनाम जप ||
तयाविण हे सुटिका | नाहीं नाहीं आम्हां देखा ||
एका शरण जनार्दनीं | दत्त वसे तनमनीं ||
-- शांती��्रम्ह एकनाथ महाराज
संत एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात की श्रीगुरुदेवदत्त हेच आमच्या कुळाचे आराध्य दैवत आहेत. तेच आमच्यासाठी आई-वडिलांप्रमाणे प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि संकटसमयी आधार देणारे आहेत. त्यांच्या कृपेने मनातील दुःख, भय, चिंता आणि सर्व संताप दूर होतो. म्हणूनच दत्तभक्तासाठी सर्वांत मोठे व्रत, तप आणि साधना म्हणजे अखंड दत्तनामाचे स्मरण होय. बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतःकरणात���ल श्रद्धा आणि नामजप यांनाच अधिक महत्त्व आहे. पुढे महाराज सांगतात की श्रीदत्तांच्या कृपेशिवाय संसारबंधनातून मुक्ती मिळणे अशक्य आहे. म्हणून भक्ताने पूर्ण श्रद्धेने आणि अहंकाराचा त्याग करून श्रीदत्तांच्या चरणी शरण जावे. जेव्हा मन, बुद्धी आणि शरीर सर्वस्वी दत्तमय होते, तेव्हा भक्ताला अंतःशांती, आत्मज्ञान आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग सहज खुला होतो.
#अवधूत_चिंतन #श्रीगुरुदेवदत्त #गुरुमाऊली
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे
वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ||
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा
नमस्कार माझा स���्गुरू रामदासा ||
#गुरुपौर्णिमा #श्रीशिवसमर्थ #हिंदवी_स्वराज्य