इंजि. सुनील जनार्धन सानप ( BE Civil ) -
( सिव्हिल इंजिनीअर & गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर )
जिल्हाअध्यक्ष नाशिक, वंजारी महासंघ तथा जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ति.
जबाबदार माध्यमांना आणि माध्यमकर्मींना कळकळीची विनंती...
मागील दोन दिवसांपासून विशेष करून समाज माध्यमावर सुरू असलेल्या काही बातम्या पाहून व्यथित झालो, वाईट वाटले. ठराविक माध्यमांना माझे कळकळीचे आवाहन आहे, कृपया कोणतेही वृत्त प्रसारित करताना शहानिशा करण्याची थोडी तसदी घ्या.
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीत पार पडली, तिथे माझा आणि विरोधी पक्षातील एका लोकप्रतिनिधींचा कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असतीलही मात्र सौहार्द आणि संवाद असतोच, त्याला कुणीच अपवाद नाही. बैठकीतील प्रत्यक्षदर्शींकडून याची खात्री करता आली असती, मात्र अशा प्रकारच्य��� बातम्या चालवून काहींना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवून टाकायचा आहे!
दुसरा विषय, आदरणीय सुनेत्रा वहिनी या महिला आहेत, आधीच कौटुंबिक दुःखात आणि त्यात स्व. अजितदादांच्या माघारी प्रथमच बीड शहरात आल्या हो��्या. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी काही नागरिक मोठमोठ्याने बोलत असल्याने सर्वांचे म्हणणे नेमके कळणार नाही या दृष्टीने मी आपले प्रश्न शांतपणे मांडा, हळू बोला अशी विनंती केली असता त्याचेही रुपांतर धनंजय मुंडे याने शेतकऱ्यांना दम दिला, असे केले जात आहे, याचे सध्याच्या काळात मला आश्चर्य वाटत नाही; कारण ठराविक माध्यम प्रतिनिधींनी तसा अजेंडा राबवण्याचा घाट घातलेला आहे.
बीड जिल्ह्यातील ९०% पेक��षा अधिक पत्रकार हे अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करतात. त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मी कायम आदर करतो. मात्र काही पत्रकारांच्या बाबतीत आर्थिक गैरव्यवहार सहित अनेक तक्रारी माझ्याकडे पूर्वीच आलेल्या आहेत. परंतु कुणाचे तारुण्यात नुकसान नको, म्हणून मी वरिष्ठांना तक्रार करण्याऐवजी दुर्लक्ष ��ेले. कुणाच्याही आर्थिक लाभ किंवा समृद्धीच्या आड मी येऊ इच्छित नाही.
जिल्ह्यात बिघडलेला सामाजिक सौहार्द हळूहळू स्थिर होत आहे, कृपया चुकीच्या बातम्या पेरून वातावरण बिघडवू नका, ही कळकळीची विनंती...!
#Beed
#Media
#MediaTrial
#FakeNews
सर्वांना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐
मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि मनापासून जपलेलं नातं.
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मैत्री आनंद, प्रेम आणि सुखाने फुलत राह��.🌹🙏
#मैत्रीदिन #HappyFriendshipDay #मैत्री #मैत्रीचेनात #friendship