काँग्रेसच्या मगरीच्या आसवांना बळीराज�� कधीही भुलणार नाही !
युपीए सरकारच्या काळात कांद्याला अवघा ८-१० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारी काँग्रेसच होती. मोदी सरकारने जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा दरवाढीचे निर्णय घेतले, तेव्हा त्याला विरोध करण्याचे नीच राजकारण याच काँग्रेसने केले. तरीही आज काँग्रेस निर्लज्जपणे कांदाप्रश्नावर आंदोलन करत आहे, यालाच म्हणतात 'निर्लज्जम सदासुखी'!
काँग्रेसने शेतकरी हिताचं कितीही ढोंग केलं, तरीही शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारा भाजपा हाच एकमेव पक्ष आहे. आज देशात १५ रुपये भावाने कांदा खरेदी होत आहे. कांद्याची देशाच्या इतिहासातील सर्वाधिक आणि विक्रमी खरेदी केवळ मोदी सरकारच्या काळातच झाली. मात्र याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करत चाललेली काँग्रेसच्या नेत्यांची ही धडपड केवळ फुटेज मि��वण्यासाठीची चढाओढ आहे.
सपकाळजी, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तेव्हा निदान तुम्हीतरी 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करण्याआधी थोडा अभ्यास करा ! लक्षात ठेवा, पोकळ घोषणांनी गळे काढणाऱ्यांपेक्षा, शेतकऱ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणारेच बळीराजाच्या मनात कायम राहतात !