आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची हा नाही, तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे हाच आमचा अजेंडा असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. आज लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी मला इथे आमंत्रित केले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी २५ हजार महिलांच्या बचत गटाचे जाळ��� निर्माण केले आहे. खरे म्हणजे लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३२ आमदार निवडून देत एक इतिहास घडवलेला आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल मिळाला, तो या लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाला. रक्षाबंधन लांब असले तरीही मुरजी काकाने सर्व लाडक्या बहिणींना आज एकप्रकारे रक्षाबंधनाची ही ओवाळणी दिलेली आहे.
यासोबतच आज या विभागातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्त�� यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले. विद्यार्थांना शिक्षणासाठी लागणाऱ्या लॅबटॉपचे वाटप देखील याप्रसंगी करण्यात आले आहे. ज्यांना यश मिळाले त्यांचे अभिनंदन, आपल्या आयुष्यातील ही यशाची पहिली पायरी आहे, अजून संपूर्ण आकाश जिंकणे बाकी आहे असेही याप्रसंगी नमूद केले.
आज जगाला युद्धाची चाहूल लागली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मात्र अशा परिस्थितीतही देश भक्कमपणे उभा आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला आवाहन केले, त्याची आपण अंमलबजावणी करतो आहे. पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन जेवढी शक्य तेवढी इंधन कपात करणे गरजेचे आहे. याबाबत जाहीर केलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे आणि इंधन बचत करावी असे आवाहन यावेळी केले.
एक वर्षापूर्वी #OperationSindoor निमित्ताने भारताने आपल्या सशस्त्र दलांचे अद्वितीय शौर्य, अचूकता आणि अढळ निर्धार अनुभवला.
देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या वीर जवानांनी धैर्य आणि दृढनिश्चयाच्या बळावर भारताच्या जनतेकडे आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाकडे वाकडी नजर टाकणाऱ्यांना चोख आणि ठाम प्रत्युत्तर दिले.
त्यांचा पराक्रम हा केवळ लष्करी सामर्थ्य नव्हता, तर भारत प्रत्येक संकटासमोर एकजुटीने आणि निर्भयपणे उभा आहे, याची जगाला दिलेली ठाम जाणीव होती.
आज #OperationSindoor ला एक वर्ष पूर्ण होत असताना, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च समर्पण दाखवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती संपूर्ण ��ेश कृतज्ञ आहे.
त्यांचे शौर्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करत राहील. भारतीय सशस्त्र दलांच्या जिद्दीला, पराक्रमाला आणि राष्ट्र सुरक्षेच्या भावनेला सलाम.🇮🇳
One year ago, during #OperationSindoor, India witnessed the unmatched courage, precision, and determination of our Armed Forces.
Under the leadership of Hon’ble Prime Minister Narendra Modi ji, our brave soldiers, with unwavering resolve, gave a fitting and firm response to those who dared to threaten our people and the sovereignty of our nation.
Their valour was not just a display of military strength, but a powerful reminder that India stands united and fearless against every challenge.
Today, as we mark one year of #OperationSindoor, the entire nation bows in respect and gratitude to the heroes who protect our borders with supreme dedication.
Their bravery continues to inspire every Indian and strengthens the spirit of patriotism across the nation.
Salute to the spirit, sacrifice, and unwavering commitment of the Indian Armed Forces the true guardians of our nation. 🇮🇳
#Shivsena #DrShrikantEknathShinde #OprationSindoor
समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या चि.सौ.कां. ज्ञानेश्वरी देशमुख आणि जुन्नर तालुक्यातील चि. साहिल चिलप यांचा विवाह सोहळा गुंजाळवाडी, संगमनेर येथे आज पार पडला. या मंगलप्रसंगी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
#Shivsena #EknathShinde #indurikar #maharashtra
📍 #मुंबई |
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ.नीलमताई गोऱ्हे आणि प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री म��. बच्चू कडू यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी #शिवसेना पक्षाच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मुरजी पटेल तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Eknathshinde
आज मोटेवाडी गावचे आमचे मार्गदर्शक असलेले मा. सरपंच श्री. सुरेशभाऊ कोल्हे यांच्या द्राक्ष बागेला भेट देण्याचा योग आला,समवेत गावचे ��पसरपंच श्री.जिवनभाऊ जासुद उपस्थित होते.
#शेतकरी
आज पुणे येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली. गानसम्राज्ञी आशा ताईंचे नुकतेच निधन झाले. सर्वप्रथम त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायती, महानगरपालिका निवडणुकांमधील पक्षाची कामगिरी सरस होती. विधानसभेपासून शेवटच्या निवडणुकांपर्यंत शिवसेनेचा विजयाचा स्ट्राइक रेट सर्वोत्तम होता. त्यामुळे तशाच रीतीने आणि त्यापेक्षा जोमाने पक्ष बांधणीसाठी सज्ज होण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना ��िल्या.
शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात सर्वसामान्य कार्यकर्ताही सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेकदा दाखवून दिले आहे, हेही उपस्थितांना सांगितले. यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे म्हणणे यावेळी जाणून घेतले. राज्याचे उपमुख्यम��त्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका, पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असेही यावेळी स्पष्ट केले. येत्या काळात निवडणुका नाहीत, पण शिवसेना पक्ष सदैव सक्रिय राहतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही यावेळी आवर्जून सांगितले.
सध्या राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR)सुरू आहे. या संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएलओ यांना सहकार्य करावे, पक्षाचे बीएलए नेमावेत, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, संपर्क प्रमुख किरण लांडगे, सह संपर्क प्रमुख हनुमंत जगदाळे, शिवसेना पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, आबा बागुल, युवासेना ���चिव किरण साळी, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, लोकसभेतील सर्व उपनेते, विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, लोकसभा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, संघटक, सर्व विभागाचे प्रमुख, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
शिक्षण, समानता आणि सत्यासाठी दिलेला त्यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी आहे ✨
“शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य” — हा त्यांचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया 📚
#mahatmaphule#shivsena#socialreform#equality
📍 दक्षिण मुंबई लोकसभा आढावा बैठक - चर्चगेट
शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार राज्यभर विविध लोकसभा मतदारसं���ांत संघटनात्मक आढावा बैठकींचा धडाका सुरू असून, त्याच अनुषंगाने आज चर्चगेट येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी दरम्यान पक्षसंघटना अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक स्तरावर जोमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनात्मक ताकद वाढवणे, जनसंपर्क अधिक प्रभावी करणे आणि स्थानिक पातळीवर पक्षाची उपस्थिती दृढ करणे, या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
भारतीय निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार याद्या अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून, त्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, याची जाणीव सर्वांना करून देण्यात आली. या अनुषंगाने प्रत्येक भागात तातडीने ‘बीएलए’ (Booth Level Agent) नियुक्त करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच या संपूर्ण प्रक्रियेविषयी अधिक तांत्रिक आणि सखोल माहिती देण्यासाठी तज्ज्ञांकडून उपस्थित प्रतिनिधींना ��ार्गदर्शन करण्यात आले. मतदार नोंदणी, नावांतील दुरुस्त्या, नवीन मतदारांची नोंदणी तसेच वगळण्यात आलेल्या नावांच्या पुनर्स्थापनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष काम करताना अधिक सक्षमपणे योगदान देता येईल. बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पक्षाच्या कार्याला अधिक वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार निलेश राणे, मनीषा कायंदे, उपनेते यशवंत जाधव, अनिल पडवळ, मीनाताई कांबळी, प्रवक्त्या शायना एन सी, शितल म्हात्रे, यामिनी जाधव, सचिव सुशांत शेलार यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #Eknathshinde
उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही.
#Shivsena#EknathShinde#maharashtra