आपल्या सर्वांना सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की आज आपण आपले अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) सर्वांसाठी खुले करत आहोत. नक्की या संकेतस्थळाला भेट द्या आणि आपला अभिप्राय नोंदवा, धन्यवाद🙏🏽 https://t.co/iV0sHZtLWt
आज TET चा पेपर फुटला, 'कदाचित' पुढे हे कारण सांगून तो ऑनलाईन स्वरुपात घेतला जाईल...
मागे नीटचा पेपर फुटला, त्यानंतर पुढील वर्षापासुन ऑनलाईन पेपर घेण्याची घोषणा, यंदाचा पेपर घेण्याच्या अगोदर केली गेली.
या अंगाने देखील पेपरफुटीचा विचार आणि तपास केला पाहिजे...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ची तयारी करतांना आपल्याला 2025 च्या मुख्य परीक्षेचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सोबत जोडल���ला Video नक्की बघून घ्या...
https://t.co/Dk5MZeZsKv
MPSC मागील काही दिवसांपासून खूप चांगली गती पकडली आहे. त्��ात अंतिम उत्तरतालिका लवकर प्रसिद्ध करून निकाल लावणे, ही खूप दिलासादायक बाब होती. काल घेण्यात आलेले निर्णय देखील खूप चांगले आहेत, पण त्यात ऑनलाईन पूर्व परीक्षेने परीक्षार्थींच्या उत्साह मोडून काढला आहे. ऑनलाइन परीक्षांच्या संदर्भातील पूर्वीचा अनुभव वाईट असल्याने विद्यार्थ्यांच्या मध्ये या संदर्भात नकारात्मक भावना आहे. याचा सहानुभूती पूर्वक विचार राज्य लोकसेवा आयोगाने करावा.
@mpsc_office
पुढील वर्षापासुन वर्षात दोनदा राज्यसेवा आणि गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.
पण मुख्य परीक्षा मात्र एकदाच होणार आहे.
तसेच सर्व पूर्व परीक्षा CBT म्हणजेच संगणक आधारित प्रणालीवर पार पडणार आहेत.
Join @UPSCinMarathi
५. अंतिम कराराचा मार्ग (Roadmap to a Final Deal)
- ���० दिवसांची मुदत: कायमस्वरूपी करार अंतिम करण्यासाठी ६० दिवसांची कठोर मुदत (जी परस्पर संमतीने वाढवता येऊ शकते) निश्चित केली आहे.
- अटींवर आधारित वाटाघाटी: युद्धविराम, कोंडी उठवणे, सागरी मार्ग खुला करणे, तेलावरील सवलती आणि गोठवलेली संपत्ती खुली करणे या तात्काळ उचलण्याच्या पावलांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच अंतिम कराराच्या इतर मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू होतील.
- अंमलबजावणी ���णि देखरेख: कराराच्या पालनावर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त कार्यकारी यंत्रणा स्थापन केली जाईल. सरतेशेवटी, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) कायदेशीर बंधनकारक ठरावाद्वारे या करारावर शिक्कामोर्तब केले जाईल.
(2/2)
अमेरि��ा-इराण यांच्यातील ऐतिहासिक कराराचा (ज्याला काही अभ्यासक 'इस्लामाबाद सामंजस्य करार' देखील म्हणत आहेत) सारांश:
वाशिंग्टन आणि तेहरानने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षऱ्या केलेला हा करार एक अंतरिम आराखडा (interim framework) आहे. ज्याचा मुख्य उद्देश युद्ध तात्काळ थांबवणे, मध्यपूर्वेत स्थैर्य आणणे आणि अंतिम व सर्वसमावेशक करारासाठी ६० दिवसांची मुदत निश्चित करणे हा आहे.
कराराचे मुख्य स्तंभ (Pillars) खालील��्रमाणे आहेत:
१. तात्काळ युद्धविराम आणि प्रादेशिक तणाव कमी करणे (Immediate Ceasefire and Regional De-escalation)
- लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवणे: अमेरिका, इराण आणि त्यांचे सर्व मित्र राष्ट्र सर्व आघाड्यांवर "सध्याचे युद्ध" तात्काळ आणि कायमस्वरूपी संपवण्यास सहमत आहेत.
- लेबनॉनबाबतची अट (The Lebanon Clause): हा करार लेबनॉनमधील लष्करी कारवाया थांबवणे अन���वार्य करतो आणि लेबनॉनची प्रादेशिक अखंडता (territorial integrity) आणि सार्वभौमत्वाची (sovereignty) हमी देतो. विश्लेषकांच्या मते, यामुळे इराणला हिजबुल्लाह (Hezbollah) सारख्या आपल्या संलग्न अतिरेकी गटांना आवर घालणे भाग पडेल.
- परस्पर अनाक्रमण: दोन्ही देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यास, बळाचा वापर किंवा धमकी टाळण्यास आणि एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्यास बांधील आहेत.
२. सागरी वाहतूक आणि ��ष्करी माघार (Maritime Navigation and Military Drawdown)
- अमेरिकेची सागरी कोंडी उठवणे: अमेरिका इराणवरील आपली सागरी कोंडी (naval blockade) तात्काळ उठवण्यास सुरुवात करेल आणि ३० दिवसांच्या आत ती पूर्णपणे काढून टाकेल, ज्यामुळे जहाज वाहतूक युद्धपूर्व स्थितीत येऊ शकेल.
- होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे: इराण पर्शियन आखात आणि ओमा��च्या समुद्रातून व्यावसायिक जहाजांना पुढील ६० दिवसांसाठी मोफत आणि सुरक्षित मार्ग देण्यास वचनबद्ध आहे. इराण ३० दिवसांच्या आत सागरी माइन्स (naval mines) आणि तांत्रिक अडथळे देखील दूर करेल.
- भविष्यातील प्रशासन: आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या भविष्यातील प्रशासनाला औपचारिक रूप देण्यासाठी इराण ओमान सल्तनत आणि इतर आखाती देशांशी चर्चा करेल.
- अमेरिकन सैन्याची माघार: अंत��म करार झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत अमेरिका आपले सैन्य इराणच्या लगतच्या भागातून काढून घेण्यास सहमत आहे.
३. तात्काळ आर्थिक दिलासा आणि दीर्घकालीन पुनर्रचना (Immediate Economic Relief and Long-Term Reconstruction)
- गोठवलेली संपत्ती खुली करणे: अमेरिका इराणचा गोठवलेला जागतिक निधी तात्काळ मुक्त करेल, ज्यामुळे तो निधी इराणची मध्यवर्ती बँक आणि त्यांनी नियुक्त केलेल्या लाभार्थ्यांना वापरण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध होईल.
- तेल आणि बँकिंग सवलती: अमेरिकेचे अर्थ खाते (US Treasury) तात्काळ सवलती (waivers) देईल, ज्यामुळे इराणला कच्चे तेल, ��ेट्रोलियम उत्पादने यांची निर्यात पुन्हा सुरू करता येईल आणि संबंधित जागतिक बँकिंग, विमा आणि वाहतूक सेवांचा वापर करता येईल.
- निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणे: अंतिम कराराचा एक भाग म्हणून संयुक्त राष्ट्र (UN), आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) आणि अमेरिकेचे सर्व एकतर्फी निर्बंध (प्राथमिक आणि दुय्यम) पूर्णपणे संपुष्टात आणण्याची पायाभरणी या करारात केली आहे.
- $३०० अब्ज डॉलर्सचा पुनर्रचना नि���ी: अमेरिका आणि त्याचे प्रादेशिक मित्र देश इराणच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचना आणि विकासासाठी परस्पर संमतीने किमान ३०० अब्ज डॉलर्सची आर्थिक योजना तयार करतील.
४. आण्विक तडजोड (The Nuclear Compromise)
- अण्वस्त्रे नाहीत: आपण अण्वस्त्रे कधीही मिळवणार नाही किंवा विकसित करणार नाही, या वचनबद्धतेचा इराणने स्पष्टपणे पुनरुच्चार केला आहे.
- यथास्थिती (Status Quo) आणि डाउन-ब्लेंडिंग: अंतिम करार होईपर्यंत, इराणचा आ��्विक कार्यक्रम सद्यस्थितीत गोठवला जाईल. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, इराणच्या उच्च-संवर्धित युरेनियमच्या (highly enriched uranium) साठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तो साठा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) कडक निगराणीखाली इराणच्याच भूमीवर 'डाउन-ब्लेंड' (कमी संवर्धित) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने यापूर्वी युरेनियम देशाबाहेर पाठवण्याची मागणी केली होती, त्यामुळे अभ्यासकांच्या मते ही एक मोठी तडजोड आहे.
- भविष्यातील युरेनियम संवर्धन: अंतिम करारा��� इराणच्या नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम संवर्धनाच्या गरजांसंदर्भात एक दीर्घकालीन, परस्पर समाधानकारक आराखडा (framework) प्रस्थापित केला जाईल.
(1/2)
परीक्षा झाल्यावर 18 दिवसांच्या आत MPSC ने अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निकाल देखील लवकरात लवकर लागेल अशी अपेक्षा, धन्यवाद!
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तर��ालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://t.co/sj0mXfYPif
GS-2 (आंतरराष्ट्रीय संबंध)
GS-3 (आर्थिक, तंत्रज्ञानात्मक स्वायत्तता)
जागतिक राजकारणातील स्वायत्तता आणि भौतिक क्षमता यांचा सहसंबंध उलगडून सांगणारी नोट सोबत जोडली आहे. यातील काही मुद्दे आपल्याला GS-2 आणि GS-3 उत्तरलेखनात फायद्याचे ठरतील.
https://t.co/RlsVAbnrBy
#SSP2026
काल झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर लगेच आलेल्या विश्लेषणाच्या भाऊगर्दीत माझ्या या किंचित उशिराच्या समिधा... मुद्दाम काल यावर काही बोललो नाही, कारण तुम्ही परीक्षा देऊन आलेला असता, तुमच्या परीने केलेल्या अभ्यासाला परीक्षा कक्षात दोन तासात न्याय देऊन आले असता, त्यानंतर लगेच आम्ही लोकांनी तुणतुणे वाजवणे टाळले पाहिजे, असे नेहमी वाटते. त्यामुळे बाजार नियमांनुसार उशिराचे विश्लेष��/निरीक्षणे...
➡️ पेपर पॅटर्न बदलला आहे, यावर काल ज्यांनी पेपर दिला आणि जे बाहेरून त्याकडे बघतायता या दोन्ही गटांची जवळपास एकवाक्यता आहे. (ज्यांना असे वाटत नसेल त्यांनी जास्त अभ्यास करणे गरजेचे आहे)
➡️ काठिण्य पातळी बद्दल बोलायचे झाले तर नक्कीच काहींना तो मध्यम पातळीचा तर काहींना तो अवघड वाटू शकतो. माझ्या मते देखील पेपर मध्यम ते काठिण्य याच स्पेक्ट्रम मध्ये होता.
➡️ पेपर नीट बघितला तर बर्यापैकी तो UPSC च्या 2015 आणि 2017 च्या पूर्व परीक्षेच्या पेपर सारखा वाटू शकतो. (अर्थात अजून काही काळ हाच पॅटर्न राहील अशी अपेक्षा आहे.)
➡️ सरसकट उत्तर असे असते, योग्य विधाने सुरवातीला असतात, असे आयोगाच्या पेपर सेट करणार्यांना गृहीत धरून उत्तर काढणार्यांना मात्र यावेळी आयोगाने पेपर सेट करणार्यांना लक्षात घेतलेले दिसते. त्यामुळे इथून पुढे राज्यसेवा काढ���्याचा शॉर्ट कट नसेल, हे उमेदवारांना लक्षात घेतले पाहिजे.
➡️ पुन्हा अधिकृत अभ्यास साहित्याकडे वळा हा गर्भित इशारा यंदाच्या पेपर ने दिला आहे. त्यामुळे स्टेट बोर्ड, NCERT आणि पारंपरिक रेफरन्स पुस्तके (निवडक वाचन) यावर लक्ष दिले पाहिजे.
➡️ पेपर मध्ये योग्य उत्तर काढण्यासाठी तुमची फॅक्टवर पकड असणे आवश्यक आहे आणि अर्थात त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळा revision करावी लागेल यात शंका नाही.
➡️ एकंदरीत ��हिला पेपर बघितल्या वर आणि CSAT बर्यापैकी सोप्पा असल्याने, तसेच जागा वाढण्याची शक्यता असल्याने कट ऑफ़ नक्कीच मागील वर्षापेक्षा कमी होईल यात शंका नाही. तो किती कमी होईल या बद्दल आता तरी सांगणे कठीण आहे.
➡️ बाकी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागण्याच्या अगोदर 3-4 दिवस आराम करा, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी वेळ द्या.
➡️ मुख्य परीक्षेच्या संदर्भात 1-2 दिवसांत आपण सविस्तर बोलुयाच, त्यासाठी तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला @upscinmarathihelp या टेलिग्राम ID वर पाठवून ठेवा.
✍️ ज्ञानेश्वर जाधव
Join @UPSCinMarathi
अखिल भारतीय सेवांतील 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या रिक्त जागा.
IAS - 1300
IPS - 505
IFS - 1029
कॅडर प्रमाणे कोणत्या राज्यात किती पदे भरण्यात आली आहेत आणि त्याची कॅटेगरी मध्ये कशी विभागणी आहे. त्याची लिस्ट पुढील लिंक वर मिळेल - https://t.co/72ERl88iNP
Join @UPSCinMarathi
अमेरिकेचे लहरी नेतृत्व आणि जागतिक नव व्यवस्था!
इतर देशांच्या का���देमंडळांना अशाप्रकारे टार्गेट करण्याची नवीन पद्धत अमेरिकन हेजीमनी आणि वेस्टफालिया कराराला सुरुंग लावल्या शिवाय राहणार नाही.
येणार्या काळात वर्ल्�� ऑर्डर मध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता या सर्व घडामोडींमुळे बळावत जाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय राजकारणातील विश्वासार्हता रसातळाला जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
धोरणात्मक सातत्याचा अभाव हा जागतिक व्यवस्थेत कोणत्याही राष्ट्र-राज्याच्या संदर्भात संदिग्धता निर्माण करणारे ठरते, अमेरिका काय त्यातून सुटलेली नाहिये.
Join us on telegram - https://t.co/tSmPW7pGNs