आदरणीय सचिन भाऊ,
भक्त असावं तर देवाचं असावं; कोणत्याही व्यक्तीचं अंधभक्त होऊ नये. कारण प्रश्न पक्षाचा नाही, तर आपल्या भारत देशातील नागरिका��च्या जीवाचा आहे.
सर्वप्रथम, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. मी फक्त एक जागरूक भारतीय नागरिक आहे.
तुम्ही AI फोटोचा उल्लेख केला. पण स्पष्ट सांगू इच्छितो की, मी २ जुलै २०२६ रोजी त्या ठिकाणचे प्रत्यक्ष GPS लोकेशनसह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तारीख, वेळ आणि ठिकाण स्पष्ट नमूद आहे. हे कोणतेही AI Generated फोटो नव्हते, तर घटनास्थळी जाऊन काढलेले वास्तविक फोटो होते.
तुमची इ��्छा आणि गैरसमज दूर करण्या साठी पूर्ण व्हिडिओ पण दाखवतोय थोडी तसदी घ्या आणि बघा.
त्यानंतर ३ जुलैला २०२६ त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली अशी प्राथमिक माहित�� मिळाली म्हणजे समस्या प्रत्यक्ष अस्तित्वात होती, हेच त्यावरून स्पष्ट होते.
माझा उद्देश कोणाची दिशाभूल करणे नाही आणि लाईक्स मिळवणे तर अजिबात नाही त्याने माझा पोट नाही भरत माझा वेळ ऊर्जा खर्च होते . उलट, समस्या समोर आणल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, हीच अपेक्षा आहे. काम झाले तर त्याचेही मी मनापासून स्वागत करतो.ही आपली खासियत आहे.
आज सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे बदलत राहते.#पक्षांतरबाजार पण मी कोणत्याही पक्षासाठी नाही, तर माझ्या देशवासीयांच्या सुरक्षिततेसाठी उभा आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकाही निष्पाप नागरिकाचा जीव जाऊ नये, यासाठी मी रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहे. आत्ता पर्यंत बऱ्याच नागरिकाचे जीव वाचवलेत म्हणून मला रायगड पोलीस दला कडून जीवनदूत पुरस्कार देखील प्रदान करण्यात आल होत .
असो !
तुम्ही म्हणता कोलाडपर्यंत रस्ता चांगला आहे. स्वागत आहे. पण एकदा प्रत्यक्ष संपूर्ण मुंबई–गोवा महामार्गावर उतरून पाहणी करा. रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांशी आणि वाहनचालकांशी बोला. वास्तव स्वतः समोर येईल.
कोणाची गुलामगिरी करायची नाही. आपण स्वराज्याची राजधानी रायगडचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे आहोत. जिथे चूक असेल तिथे चूक म्हणणार आण�� जिथे चांगले काम असेल तिथे त्याचेही मनापासून कौतुक करणार. माझा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, तर नागरिकांच्या जीवासाठी आहे.
आणि शेवटी एकच नम्र विनंती…
मला रोज व्हिडिओ बनवण्याची किंवा खड्डे दाखवण्याची हौस नाही. मी आधीच ४९० किलोमीटरचा २९ दिवसांचा पाय रस्ता सत्याग्रह करून, रक्ताचं पाणी करत संबंधितांना कायमस्वरूपी उपाययोजनांचा अह��ाल दिला आहे. त्या उपायांवर प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली, तर मला पुन्हा असे व्हिडिओ करण्याची गरजच पडणार नाही.
हात जोडून विनंती आहे—कृपया कायमस्वरूपी काम करा. आम्ही टीका करण्यासाठी नाही, तर चांगलं काम झालं तर सर्वप्रथम त्याचं मनापासून कौतुक करण्यासाठी तयार आहोत. कारण आमचा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. 🙏
आपला
कु.चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण ���ागरिक
मा. नितीन गडकरी साहेब (केंद्री��� रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार )
@nitin_gadkari , एक नम्र विनंती…सर
मला एकदा तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये बसवा. तिकीटाचे जे काही पैसे असतील ते मी आनंदाने देईन.
फक्त मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाची तुमच्यासोबत हेलिकॉप्टरमधून पाहणी करू द्या.
कारण मी पूर्ण रस्ता पायी चालत गेलोय या महामार्गावरील प्रत्येक छोटा -मोठा खड्डा मला इतका तोंडपाठ झाला आहे की, हेलिकॉप्टरमध्ये बसूनही मी तुम्हाला खाली बोट दाखवत सांगू शकतो—“साहेब, इथे खड्डा आहे… पुढे अजून एक आहे… आणि थोड्याच अंतरावर पुन्हा एक मोठा खड्डा आहे.”
ही अतिशयोक्ती नाही, तर या महामार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची वेदना आहे. कोणी ���ोलो वा ना बोलो आम्हाला कोकणकरांचे जीव वाचवायचे आहेत जीव .
@rashtrapatibhvn @CMOMaharashtra @SunilTatkare @Shivendraraje11 @PratapSarnaik @mieknathshinde @sardesairajdeep @ravish_journo @piyushtewarii @Chiragpaswan555 @CJP_for_India @IndianGems_ @htTweets @maha_governor @timesofindia
२ जुलै २०२६. सर
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
पेण- रायगड
#latepost #mumbaigoahighway #accident #preventionisbetterthancure #tollcollection #citizen #india
हा आहे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचा “नवीन” रस्ता!
आजचा GPS फोटो स्वतःच सत्य सांगत आहे.
काही ठिकाणी रस्ता चांगला झाला आहे, पण अनेक ठिकाणी अजूनही मोठमोठे खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबलेला नाही.
रस्ता पूर्ण नाही… गुणवत्ता समाधानकारक नाही… मग टोल कशासाठी?
हा प्रश्न फक्त आमचा नाही, तर प्रत्येक कर भरणाऱ्या नागरिकाचा आहे.
आजचे लक्षवेधी आंदोलन शांततेत पार पडले. मात्र आंदोलन आटोपून घरी परतताना पुन्हा त्याच खड्ड्यांतून प्रवास करावा लागला. या खड्ड्यांनी आमचा केवळ प्रवासच खडतर केला नाही, तर आमच्या आयुष्यातील अमूल्य वेळही हिरावून घेतला.
मा. नितीन गडकरी साहेब @nitin_gadkari , एक नम्र विनंती…
मला एकदा तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये बसवा. तिकीटाचे जे काही पैसे असतील ते मी आनंदाने देईन.
फक्त मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाची तुमच्यासोबत हेलिकॉप्टरमधून पाहणी करू द्या.
कारण या महामार्गावरील प्रत्येक मोठा खड्डा मला इतका तोंडपाठ झाला आहे की, हेलिकॉप्टरमध्ये बसूनही मी तुम्हाला खाली बोट दाखवत सांगू शकतो—“साहेब, इथे खड्डा आहे… पुढे अजून एक आहे… आणि थोड्याच अंतरावर पुन्हा एक मोठा खड्डा आहे.”
ही अतिशयोक्ती नाही, तर या महामार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची वेदना आहे.
@nhairo_mumbai रस्ता सुरक्षित आणि दर्जेदार होईपर्यंत हा आवाज थांबणार नाही.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
पेण- रायगड
#mumbaigoahighway #nh66 #todays #reality #road #roadcondition #accident #preventionisbetterthancure #chaitanyaushalaxmanpatil #raigad #maharashtra #india