वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना!
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा���ार्फत राबविण्यात येणारी शेततळे अस्तरीकरण योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या योजनेअंतर्गत शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांना ५०% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
महिला शेतकरी प्रमाणपत्राची नोंदणी सुरु
शेतीच्या कामात महिलांचा मोठा वाटा आहे.त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळत नव्हती.हीच अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६ केला. कायद्याअंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्राची नोंदणी सुरू झाली आहे.
📍 सह्याद्री अतिथिगृ��, मुंबई | दि. २१ ऑगस्ट २०२६
शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्या��ा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, शौर्य, स्वाभिमान आणि न्यायाचे संस्कार रुजविणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समता, न्याय व मानवतेचे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार, कार्य आणि मूल्ये हीच आपल्या राष्ट्र��िर्मितीची खरी प्रेरणा आहेत.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #BabasahebAmbedkar #महापरिनिर्वाणदिन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० आणि महाराष्ट्र एआय धोरण २०२५–२०२९” अंतर्गत कॉल फॉर प्रपोझल आणि कॉल फॉर प्रपोझल पोर्टलचं उद्घाटन…
📍मंत्रालय, मुंबई | २८ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.०’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचं तसेच महाराष्ट्र एआय धोरण २०२५–२०२९” अंतर्गत कॉल फॉर प्रपोझल आणि कॉल फॉर प्रपोझल पोर्टलचं उद्घाटन आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आलं.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पा महाराष्ट्रातील शेतीला शाश्वत, सक्षम आणि हवामान-संवेदनशील बनविण्यासाठीचा टर्निंग पॉईंट आहे. तर, कॉल फ��र प्रपोझल उपक्रमाद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT), ड्रोन तंत्रज्ञान, आणि डेटा-आधारित उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक साधनांच्या वापराला चालना मिळणार आहे. तसेच, कॉल फॉर प्रपोझल पोर्टलमुळे राज्यभरातील स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि संशोधन संस्थांकडून आपल्या तंत्रज्ञानाधारित कल्पना सादर करून शाश्वत शेतीसाठी नवे उपाय सादर करण्यात येतील.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विकास चंद्र रस्तोगी (अपर मुख्य सच��व, कृषी), परिमल सिंह (प्रकल्प संचालक), कृषी विभागातील अधिकारी, प्रकल्प संचालक मंडळ, जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @mahancpspeaks
इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण!
📍इंदापूर, पुणे | 22 ऑक्टोबर 2025
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५१ अनुदानित ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित ८ यंत्र व औजारांचे व���तरण केलं. तालुक्यातील एकूण २३,५९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड या योजनेत करण्यात आली आहे. त्याप��की, ९,८२१ लाभार्थी ट्रॅक्टरसाठी निवडले गेले असून १,००३ लाभार्थ्यांनी ट्रॅक्टरसाठी कागदपत्रे अपलोड केले होते. त्यातून ३२६ लाभार्थ्यांना पूर्व संमती दिली असून त्यापैकी आज ५१ लाभार्थ्यांना अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तर, एकूण १३,७७६ लाभार्थ्यांची ट्रॅक्टरचलीत यंत्र व औजारांसाठी पात्र असून आज ट्रॅक्टरचलित ८ औजारांचे वितरण करण्यात आले. प्रथम टप्प्यातील लाभार्थ्यांना ट्रॅ���्टर व यंत्र आणि औजारे वितरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या वेळेनुसार व टप्प्याटप्प्याने ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्र आणि औजारांचे वाटप करण्यात येईल.
या वितरण सोहळ्यात तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, लाभार्थी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते.
ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष उभारून मनामनांत स्वराज्यासाठी लढण्याची मशाल प्रज्वलित करणारे आद्यक्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#umajinaik
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक!
📍मंत्रालय!
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्याबाबत आज महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी होती. कामगारांच्या मागणी संदर्भात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री महोदय यांनी सांगितले. या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील,श्री. वसंतराव मोहोळकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री.सु���ास डोंबाळे, श्री.विष्णू माने, श्री.हर्षवर्धन गायकवाड, महसूल विभागाचे अधिकारी, VC पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, शेती महामंडळाच्या MD महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे सरचिटणीस श्री. सुभाष कुलकर्णी, श्री.भालचंद्र शिंदे,श्री.ॲड. संजय चंदनशिवे, श्री. सागर मिसाळ, श्री. अतुल सावंत, श्री.सुभाष गुरव, श्री. शेखर काटे,श्री आकाश पवार श्री.भिकन शिंदे, श्री.राहुल अर्जुन, श्री.राज पाट��ल, श्री.योगेश खरात व श्री.विश्वनाथ गायकवाड व राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
@MahaDGIPR @mahancpspeaks
काळजी घ्या, सुरक्षित रहा!
संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस सुरू आहे. या काळात सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची, गुरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी.
प्रशासनाला सहकार्य करा, सतर्क रहा, सुरक्षित रहा कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधा.
सरकार तुमच्या सोबत आहे, तुमची साथ हाच आमचा विश्वास!
#स��रक्षित_रहा #शेतकरीबंधू #पाऊस
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा – मदतीसाठी तत्पर!
📍रिसोड जि.वाशिम
राज्यात १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कृषी मंत्री या नात्याने सातत्याने राज्यातील नुकसानग्रस्त भागाची व शेतकरी बांधवांची माहिती घेत आहे. आज सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या नांदेड व वाशिम जिल्ह्याच्या पाहणी दौ-यावर असून शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गावागावांत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.
📌 पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश
📌 तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना
📌 शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रत्ये�� लाभ वेळेत पोहोचवण्याचा निर्धार
शेतकऱ्यांची काळजी हीच खरी जबाबदारी!
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
@MahaDGIPR
#शेतकरी_साथी
मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आज सकाळी भिगवण (ता. इंदापूर) येथे भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल���. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या संकटसमयी प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदतीचा ल��भ मिळू शकेल.
मागील दोन दिवसांपासून इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, घरे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज थोडीशी उघडीक मिळाल्यानंतर मी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
याच दरम्यान, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांना धीर दिला.
राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी ठाम उभं आहे. प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे.
या संकटाच्या काळात प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी प���रशासन आणि सरकार पूर्णपणे ��टिबद्ध आहे.
राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात ���ला. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे तसंच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणं शक्य होणार आहे.
कृषी महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रिया नियमांमध्ये बदल करताना ते विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक सोयीचे असतील तसंच राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळेल, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीनं राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटीका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.