आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीदरम्यान माझ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिक, प्रवासी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या प्रश्नांकडे माननीय पंतप्रधानांचे लक्ष वेधले आणि खालील प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले:
🔹. टोरेंट पॉवर कंपनी भिवंडीतून हटवणे:
भिवंडी शहरातील ग्राहक, व्यावसायिक व व्यापाऱ्यांना टोरेंट पॉवरकडून होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन, भिवंडीतून टोरेंट पॉवरची सेवा तात्काळ रद्द करून ती हटवण्यात यावी.
🔹. कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करणे:
मुरबाड व परिसरातील दळणवळण सुलभ करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी.
🔹. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील' यांचे नाव देणे:
स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्मितेचा व भावनांचा आदर करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.
🔹. भिवंडी लोकल सेवा सुरू करणे:
भिवंडीतील हजारो चाकरमाणी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी भिवंडी लोकल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी.
🔹. बदलापूर रेल्वे स्थानकाची दुरावस्था व सुधारणा:
बदलापूर रेल्वे स्थानकातील बिकट अवस्था, अपुऱ्या सुविधा व प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेता, स्थानकाचे नूतनीकरण करून तेथे अद्ययावत नागरी सुविधा तातडीने पुरवण्यात याव्यात.
भिवंडी लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर माननीय पंतप्रधानांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी आग्रही विनंती केली.
@narendramodi
📍 दिल्ली जंतरमंतर
नवी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज आम्ही खासदार निलेश लंके यांच्यासह प्रत्यक्षात भेट देऊन आमचा सक्रिय पाठिंबा दर्शविला. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी आम्ही सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या विविध समस्या व रास्त मागण्या समजून घेतल्या.
आमचा ठाम विश्वास आहे की, देशाच्या उज्ज्वल भविष्याची आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाला पूर्ण न्याय मिळायलाच पाहिजे. त्यांची पिळवणूक किंवा त्यांच्या न्याय्य हक्कांची पायमल्ली कधीही खपवून घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर केंद्र सरकारने तत्काळ आणि सकारात्मक पावले उचलावीत, हीच आमची भूमिका आहे.
विद्यार्थ्यांचा हा लढा लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांची मागणी करणारा संघर्ष आहे. आम्ही दोघेही या लढ्यात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे राहू!
राज्याचे स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना प्रथम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि लोकहितासाठीची अखंड बांधिलकी सदैव स्मरणात राहील.
#AjitDadaPawar
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातला खरा दादा हरपला
पवार कुटुंबीयांशी माझे जिव्हाळ्याचे नाते असून, त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली !
येत्या १४ सप्टेंबर रोजी स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भिवंडीकरांच्या वतीने व धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक भव्य फोर व्हीलर रॅली आयोजित केली आहे. ही रॅली भिवंडी वरून ठाणे–नवी मुंबई मार्गे विमानतळाचा फेरा मारून जासई गावात पोहोचणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून आपण स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांना अभिवादन करणार असून, सरकारला पुन्हा एकदा भूमिपुत्रांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्याच्या मागणीची आठवण करून देणार आहोत.
मी सर्व भूमिपुत्रांना आवाहन करतो की आपण या रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. ही रॅली केवळ एक स्मृती रॅली नाही, तर आपल्या समाजाची ताकद, एकता आणि निर्धार दाखवणारा ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही ठाम आहोत की विमानतळाचे नामकरण स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच व्हावे आणि या मागणीसाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवणे अत्यावश्यक आहे.