महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व, अक्कलकुवा येथील जामिया इशाअत उलमचे प्रमुख, दारुल उलूम देवबंदचे शूरा सदस्य हजरत मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी (नूरुल्लाह मर्कदहू) यांच्या निधनानं मुस्लिम बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारं आश्वासक नेतृत्व हरपलं आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची सोय करून त्यांनी समाजाच्या विकासासाठी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांचे सुपुत्र मौलाना हुजैफा वस्तानवी आणि कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.