Breaking: कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात आले नसल्यामुळे सुनावणी उशीराने सुरू होत आहे.
दुपारी २ वाजता सुनावणी सुरू होणार होती
परंतु उद्धव ठाकरेंचे वकील कोर्टात आले नसल्यामुळे सुनावणीस उशीर झाला
📍 #ठाणे |
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक पार पडली. या बैठकीला दृक्श्राव्य माध्यमातून सहभागी होत या प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले.
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनीच एकत्र येऊन नागरिकांच्या मनातील शंका दूर करायला पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यासोबतच नागरिकांच्या मनातील आक्षेप दूर करण्यासाठी महामेट्रो प्राधिकरणाच्या माध्यमातून जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. सर्वांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पातील अडचणी दूर करत तो पूर्ण केला जाईल असे याप्रसंगी स्पष्ट केले.
ठाणे शहरातील नागरिकांना लवकरात लवकर जुन्या आणि प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकाला पोहोचता यावे, त्यांचा प्रवास अधिक गतिमान व्हावा यासाठी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, लाखो ठाणेकरांना या प्रकल्पाचा लाभ होणार असल्याचे यावेळी नमूद केले. त्यामुळेच काळाची गरज समजून घेत या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार ऍड.माधवी नाईक, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण हर्डीकर तसेच शहरातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#Thane #Metro #EknathShinde #Maharashtra
@PratapSarnaik@nareshmhaske@niranjandtweets@iravindraphatak
ब्रेकींगः सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात ३ मुद्द्यांवर सुनावणी..
१) केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू राहणार का ?
२) सुप्रीम कोर्ट वारंवार निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकतं का?
३) विधानसभा पोटनिवडणूक / स्था.स्व. संस्था निवडणूका असल्यानं पक्ष चिन्हावर निर्णय..