तमाम तरुण-तरुणीचं मनापासून अभिनंदन. तुमच्यामुळे हे मुजोर सरकार झुकलं. तुम्ही आणि तुमच्या पालकांनी जे काही गेल्या ३६ दिवसात सोसलं आहे त्याची कल्पना करणं कठीण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी होती आणि कायम राहील.
तुम्ही जे साध्य केलंत त्याचा जल्लोष साजरा करायला उद्या ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क येथे भेटूया. तुमच्या घरच्यांना घेऊन या. हा विजयी जल्लोष आहे, देशभरातील तुमच्या सारख्या करोडो 'जेन झी'चं अभिनंदन करण्यासाठी या. वाट बघतोय !
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
आषाढी एकादशीची वारी म्हणजे भक्ती आणि आत्म आनंदाचा अथांग सोहळा. हातात टाळ-मृदंग, मुखात ज्ञानोबा-तुकोबांचा गजर आणि हृदयात फक्त आणि फक्त विठुरायाचं नामस्मरण करत, निघणाऱ्या वारकऱ्यांचा हा जनसागर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो. जात-पात आणि भेदभाव विसरून पंढरीच्या दिशेनं हे प्रत्येक पाऊल पडतं ते विठूरायाचं सावळं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि त्याच्या चरणी लीन होण्यासाठी आणि जेव्हा चंद्रभागेच्या तीरी, विटेवर उभ्या असलेल्या विठूरायाचं ते गोजिरं रूप दिसलं कि आत्मा पूर्णपणे विठ्ठलमय होऊन जातो.
आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
खुर्च्यांवर बसून हुकूमशाही करणाऱ्यांनो कान उघडून ऐका, हा आजचा जागा झालेला 'GenZ' तरुण आहे !
स्वतःला सत्तेच्या नशेत अमर समजणाऱ्या व्यवस्थेला जंतर-मंतरवर तरुणांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. दडपशाहीच्या आणि दडपशाही करणाऱ्यांच्या छाताडावर पाय देऊन आपले हक्क कसे हिसकावून घ्यायचे, हे या पिढीला चांगलंच ठाऊक आहे.
शिक्षणमंत्र्यांपासून ते थेट सरकारपर्यंत सर्वांची झोप उडवणाऱ्या आणि व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या प्रत्येक जहाल आंदोलक तरुणाला कडक सलाम! हा तर फक्त ट्रेलर आहे, चित्रपट अजून बाकी आहे !
#GenZRevolution #HukumshahiBand #JantarMantarProtest
उद्धव ठाकरेंनाही सलाम. पहिल्या दिवसापासून ते अभिजीत आणि सोनम यांच्या पाठीशी उभे राहिले. पाठोपाठ राज ठाकरे आले. त्यांनी पोलिसांना हग्या दम दिला.
#cjp_पार्टी
CJP’s Demand Rooster Has Been Updated:
1. Dharmedra Pradhan must resign - ✅
2. Rs 1 Cr to the families of all students who died by suicide - Pending
3. No action against any of the student protesters - Pending
4. Public Apology From RAF & Delhi Police - Pending
Jantar Mantar & Entire Country Is Still Waiting On The Rest Of The Demands.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना
सस्नेह जय महाराष्ट्र,
येत्या २६ जुलैला NEET परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण 'तिरंगा मार्च' काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच.
हा 'तिरंगा मार्च' हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत याचा निषेध करण्यासाठी आहे. तसंच हा मोर्चा जे विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे.
हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.
बाकी मोर्च्याला गालबोट लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात. ते आले आणि काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तिथे आलेल्या पालकांना
( खासकरून महिलांना आणि मुलींना ) जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना, जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पोलीस जिथे नसतील, तिथे अशांचा 'पाहुणचार' कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच.
बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच. पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या, त्यांची मोर्च्यात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहित नाही पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांच्यासमोर पण मुलाबाळांच्या आयुष्याचा पण प्रश्न आ वासून उभा आहे.
बाकी कुठे भेटायचं किती वाजता भेटायचं याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेंव्हा २६ जुलैला 'तिरंगा मार्च' ला भेटूया. सर्वांनी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या जवळ जमायचं आहे ! आम्ही आपली , विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय ! जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मोर्चाने दिल्लीश्वरांना दाखवून देऊया !
आपला नम्र
राज ठाकरे ।
तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे!
विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे!
आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे.
हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार!
येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया!
विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!
Mumbai ❤️ for the 🇮🇳
@abhijeet_dipke we stand with you, and for the youth of India!
This is just one click of one lane. 2 lanes running parallel to Shivaji Park were full of patriots.
मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जात आहे. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एकवेळ ठीक, पण हा म्हणजे कुठलातरी सूड उगवल्यासारखा केला जात आहे. जे व्हिडीओज समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही .
मुळात आंदोलन का झालं? तर NEET परीक्षेत गोंधळ झाले ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं ? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी ? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसाना पण नाही. पण तरीही हे का केलं गेलं ?
पूर्वी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सर्रास मारायचे ( त्यांचे प्रसाद मलाही अनेकदा मिळालेले आहेत ) जिच्यावर पुढे बंधनं आली कारण न्यायव्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मग हाच न्याय पोलिसांना का नाही ? मी अनेकदा सांगत आलो आहे आणि आजदेखील हेच म्हणेन, महाराष्ट्रातले पोलीस असोत की इतर कुठलेही त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणे याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कोणी अधिकार दिले ? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का ?
युनायटेड नेशन्सचे काही महत्वाचे नियम आहेत जे ऍम्नेस्टी इंटरनॅशनल पण पाळते. ते म्हणजे, जेंव्हा केंव्हा बळ वापरायची वेळ येईल त्यासाठी केली जाणारी कृती संविधानिक असली पाहिजे- आवश्यक असेल तरच झाली पाहिजे- ती प्रमाणात असली पाहिजे -त्याचं उत्तरदायित्व हवं.
आज नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, न्यूझीलँड या देशांमध्ये अशा पद्धतीने पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते. आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे पण व्हायला हवं.
हे कोण करेल असा प्रश्न आहे. पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या मुलांना झुरळ म्हणणार आणि मग हेच देशातील सर्वोच्च न्यायालय आम्हाला सध्या तरी हे मारहाणीचे व्हिडीओज बघायला वेळ नाही सांगणार. हे अजब आहे. त्यांना नक्की कशासाठी वेळ आहे मग हा प्रश्नच आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत म्हणून तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरावं लागत आहे. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसायटीने करायला हवा. यावर चर्चा व्हायला हवी. खासदारांनी संसदेत यावर चर्चेचा आग्रह धरला पाहिजे.
प्रश्न राज्याकडे नागरिकांवर बळ वापरण्याचा अधिकार आहे की नाही, हा नाहीच आहे. तो अधिकार जवळपास प्रत्येक राज्याकडे असतो. खरा प्रश्न असा आहे की, घटनात्मक लोकशाही स्वतःच्या अधिकारावर संयम ठेवण्याची क्षमता दाखवते का? लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही; तर विरोधाचा आवाज कसा संयमाने आणि पुढच्या परिणामांचा विचार करत हाताळते हा आहे !
राज ठाकरे ।