आज विधानसभेत शिवसेनेचे 2 हिंदुत्ववादी वाघ महाराष्ट्राने पाहिले.
एकाने वाघाने राम मंदिर दानपेटीतील"चोरांना"उघडे पाडले..
दुसऱ्याने वाघाने "पुरावा" देऊन सत्ताधाऱ्यांची बोलती बंद केली.
राम मंदिराच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांनो,
आता महाराष्ट्र जागा आहे.
जय श्रीराम 🙏 🚩
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्रजी पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बजरंग बाप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @bajrangsonwane_
“खाशाबा” या चित्रपटात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असुन १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रावरील हा चित्रपट असून यामध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, याचे मला अत्यंत समाधान आहे.
सर्वांनी हा टीजर जास्तीतजास्त प्रसारित करावा व आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहात जाऊन पाहावा.
#khashaba
हा फक्त एक फोटो नाहीये तर प्रत्येक माणसाला अन्यायाविरुद्ध लढायला देणारी ताकद आहे 🔥
मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच लागली की समोरच्याचा बाजार उठवतो मग तो कोणीही असुदे.❤️
#छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩
महाराष्ट्रातील विविध घटकांच्या प्रश्नावर मुद्देसूदपणे आवाज उठवणारा संसदेतील हक्काचा, अभ्यासू आणि आश्वासक चेहरा, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
@supriya_sule
आमच्या गावच्या शाळेत शिकत असतानाची गोष्ट.
एका विद्यार्थ्याने तक्रार केली, "सर, ह्याने मला माय!झया अशी शिवी दिली"
मास्तरांनी त्या शिवी देणाऱ्या पोराला उभे केले आणि विचारले "कुठला रे तू?"
तो म्हणाला, "मालवण"
मास्तर उपहासाने त्या पोराला म्हणाले, "तू बस. . . . तुझ्या तोंडी शिवी
आली यात तुझी काही चूक नाही!" असं म्हणून ते आपल्या
शिकविण्याच्या कामाला लागले.
एका पोराला मास्तरांनी पुस्तकातील एक परिच्छेद वाचायला सांगितला.
त-त-प-प करीत तो परिच्छेद वाचता वाचता त्या पोराची पुरती बोबडी
वळली. वाचताना प्रत्येक शब्दाला अडखळणाऱ्या त्या पोराला
शिक्षकाने विचारले "कोणाचा पोरगा रे तू?"
तो म्हणाला, "नार्वेकरांचा"
मास्तरांनी त्या पोरालाही बसायला सांगितले अन् म्हणाले, "यात तुझी
काही चूक नाही!"
- *सॅबी परेरा*
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
Thank you, Sanjay Raut ji, for your warm wishes.
We will continue to stand shoulder to shoulder in the service of our people, our democracy and our country.