आम आदमी पार्टी मुळे मिरज सिव्हिल मधील अधिष्ठाता कार्यालयाजवळच जैविक कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला....दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे आप करणार तक्रार...
आज आप पक्षाचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मा मा मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली केलेल्या अटकेचा मिरज मधील महाराणा प्रताप चौक येथे निषेध पोस्टर हातात घेऊन जाहीर निषेध केला.यावेळी मोठ्या संख्येने पक्षातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आप पक्षाच्या वतीने गाव लेंगरे खानापूर(विटा)येथे गावातील स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करून संत गाडगेबाबा जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी आप पक्षाचे खानापुर तालुका अध्यक्ष श्री अजित कांडेसर, श्री डॉ. यशवंत सावंत आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
आज संत गाडगेबाबा जयंती निमित्त मालगाव ता. मिरज येथे ग्रामपंचायत मालगाव व आम आदमी पार्टी मिरज तालुका सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी हॉल,मालगाव येथे ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांचा स्वच्छता दूत म्हणून सत्कार करण्यात आला व ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम घेतला.
मिरज मधील महादेव कॉलनी, प्रभाग क्रमांक-४ येथील रहिवाश्यांच्या समस्यांवर कारवाई न केल्यास आम आदमी पार्टी महानगर पालिकेवर मोर्चा आंदोलन काढणार याबाबचे निवेदन देताना
वसीम मुल्ला,युवराज मगदूम, फय्याज सय्यद, ख्वाजासाहेब जमादार,संतोष मगदूम,अमोल पवार तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आप पक्ष मिरजच्या वतीने सर्वधर्मीय सलोखा जपण्यासाठी मिरज दर्गा परिसरात 100 हुन अधिक सर्वधर्मिय नागरिकांनामोफत अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी आप पार्टीचे मा निसार मुल्ला,मा फय्याज सय्यद,सांगली शहरचे मा ख्वाजा जमादार उपस्थित होते
आज आम आदमी पार्टी च्या वतीने सांगली मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती संपन्न झाली.
मा प्रा. कृष्णा अलदार सर, मा नंदकुमार कोळी,मा इम्रान पठाण,मा राम कोकरे व मा महेश सूर्यवंशी सांगली हे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आज आम आदमी पार्टी च्या वतीने मिरज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली.यावेळी मा वसीम मुल्ला सर मा संभाजी मोरे,मा तौफिक हवालदार, मा शिवाजी गायकवाड,मा.रविंद्र बनसोडे,,मा युवराज मगदूम,आणि मा सौ मनीषा माने उपस्थित होते.
*आज योग मराठा वधू वर सूचक केंद्र व आनंदी फौंडेशन सांगली* यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित *राज्यस्तरीय मराठा वधू वर मेळाव्याच्या उदघाटन* प्रसंगी *प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाला.