लाचखोर पोलिसानं नोटा तोंडात कोंबल्या;
उत्तर प्रदेशच्या फरिदाबादमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाला दक्षता पथकानं लाच घेताना अटक केली. पकडल्यानंतर उपनिरीक्षकानं पैसे तोंडात टाकले. नोटा गिळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला जमिनीवर आडवं केलं आणि त्याच्या तोंडातून पैसे बाहेर काढले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उल्हासनगरमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कामाची पाहणी करताना वाद होऊन हा हाणामारीचा प्रकार घडला. भररस्त्यात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
: कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील धामणी खोऱ्यात शेतकऱ्यांनी तब्बल ५ ते ६ लाख रूपये खर्च करुन उभारलेला मातीचा बंधारा फुटला आहे. बंधाऱ्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली असून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे यांनी या प्रकारावर टीका केली आहे
ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारात महत्वाचं संशोधन करणाऱ्या टाटा हॉस्पिटलच्या कॅन्सर तज्ञ डॉ शलाका जोशी यांच्याच शब्दात जाणून घेऊ या संशोधनाबद्दल आज, दि 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता a lantern marathi वर