दक्षिण मुंबईतील आझाद मैदान हे आंदोलनांसाठी शासनाने ठरवून दिलेले मुंबईतील एकमेव अधिकृत ठिकाण आहे असे शासन व पोलिस प्रशासन सांगते. मात्र तुम्ही आंदोलनकर्त्यांना संध्याकाळ झाली की
मैदानातून बाहेर काढता, आंदोलकांच्या संख्येवर मर्यादा घालता तसेच आंदोलकांचा आवाज व आंदोलकांचे म्हणणे येणा- जाणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आंदोलनस्थळ अगदी कमी जागेत व बंदिस्त स्वरूपाचे ठेवले आहे आणि वरून आंदोलानाची वेळ,स्वरुप यांवरही तुमचेच नियंत्रण! अशाप्रकारे एकूणच आंदोलन करुन आपला आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचविण्याचा जनतेचा हक्कच हिरावून घेतला गेला आहे. आंदोलनाचे अस्त्र गुळमुळीत, मिळमिळीत व बोथट करण्याचा प्रयत्न अलिकडच्या काळात जाणीवपूर्वक केला जात आहे! जन"आंदोलन" हा खरेतर जनतेच्या समस्या शासनव्यवस्थेने समजून घेण्याचा मार्ग आहे. आणि कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत सरकारला आंदोलनाचीच अशाप्रकारे भिती वाटणे विसंगत व हास्यास्पद आहे. मोठ्या मनाने कोणत्याही आंदोलनास समजून घेण्याची क्षमता व इच्छा शासनव्यवस्थेमध्ये असणे गरजेचे आहे. जे शासन आंदोलनास घाबरते ते शासन कधीच जनतेचा खरा आवाज समजू शकत नाही!
खासगी विकासकासाठी मुंबई महापालिकेने अशा प्रकारे सार्वजनिक हिताला पायदळी तुडवणे दुर्दैवी आहे. केवळ खासगी विकासकाला त्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी मुंबई महापालिका सार्वजनिक रस्त्याची रुंदी कमी करुन ती जागा खासगी विकासकाच्या घशात घातली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा सार्वजनिक रस्ता असा हडप करणे म्हणजे एकप्रकारे महापालिकेसारख्या सार्वजनिक यंत्रणेनेच सार्वजनिक मालमत्तेवर दरोडा टाकण्यासारखे आहे!
विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रणाली यापूर्वी जुन्या MAHADBT पोर्टल वर सुरळीत सुरू असताना,महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक नवीन पोर्टलचा घाट घातला आहे तर काही शिष्यवृत्त्या तिसऱ्याच पोर्टलवर स्थलांतरित केल्या. आधुनिकतेचे अवडंबर माजवून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्याचे हे कारस्थान आहे
देवेंद्र नावाचा एक राक्षस आहे. हल्ली असतात राक्षसांची नावं पण अशी. देवेंद्र नरेंद्र अमित. एकदम माणसासारखी नावं. कुणाला वाटेल माणसं आहेत की काय. तर ह्या राक्षसाचे सुळे वाले दात दिसत नाही बाहेरून पण हिरवीगार झाडं दिसलं की हा राक्षस चवताळून उठतो आणि ते झाड मुळापासून उपटून टाकतो.
तळागाळातील बहुजनांचे जीवन मांडणाऱ्यांतील मला माहित असलेले काही उल्लेखनीय लेखक म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,शरणकुमार लिंबाळे,नामदेवराव ढसाळ,
अण्णाभाऊ साठे,दया पवार,बाबुराव बागुल, व्यंकटेश माडगूळकर इत्यादी. अजून असे बरेच आहेत.आपणास माहित असलेली काही नावे सुचवावीत....
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
Describing expertise in any field, physicist Niels Bohr once said:
"An expert is a person who has made all the mistakes that can be made in a very narrow field!"
It is shameful that trees are being cut down despite strong public opposition. BMC needs to pay more attention to issues like Cleanliness,Health System,Pollution,encroachments, public transport system like BEST etc. Cutting down trees doesn't mean you are doing a great job @mybmc
No lights on pedestrian walkways; stretches of Eastern Express Highway; patchy unsafe city roads but hey let’s create a new hell. And line some pockets while we are at it. Mumbai with it’s triple engine Sarkar.