सध्या सगळीकडे AI ची चर्चा सुरू आहे! पण AI म्हणजे नेमकं काय असतंय? ते कुठं कुठं आणि कशा कशात आलंय? त्यामुळे कुणाला फायदा अन कुणाला नुकसान होतं आहे? मानवी जीवनावर त्याचा काय परिणाम होणार/होतं आहे?
जाणून घेऊया आपल्या भाषेत, आपल्या ब्लॉगवर! लवकरचं! Blog No-4!
I challenge the darkness
~ Jaswant Singh
पंजाबच्या जखमा खूप मोठ्या आहेत! इतिहासातील परकीयांचे आक्रमण असो फाळणीच्या जखमा असो अथवा स्वातंत्र्यानंतर स्वकीयांकडून मिळालेली वागणूक!
सतलज २ तास ४३ मिनिटांच्या चित्रातून सिस्टिमच्या कौर्याला मिळालेला सरकारी आशीर्वाद 'गडद' करतो!
सध्या #SonySub वर हस्तिनापूर के वीर नावाची सिरीयल सुरू आहे!
विषय असा की, दुर्योधनपेक्षा त्याचा बापच जास्त भिकारचोट आहे! भविष्य बघून सगळी तयारी करत असतो!
न्यायाच्या बाबतीत तो पितामह भीष्म आणि विदुर यांचेही तो ऐकत नाही!
#हव्यास
बहुचर्चित #खाशाबा च २.०५ मिनिटांचा टीझर आज लॉंच झाला!
एकदम तगडी स्टारकास्ट टीझरमध्ये पहायला मिळते! नागराज अण्णांचा प्रभाव प्रत्येक फ्रेममध्ये दिसतोय!
अजय-अतुल+नागराज अण्णा = 🔥
@YuvrajSambhaji यांची झलकही दिसते!
खाशाबांच्या भूमिकेत कोण ? अजून गुलदस्त्यात!
#Khashaba
"Ethanol blending initiative is currently an experiment, with results expected next year."
— Government to Supreme Court
थोडक्यात 👇
बघतोस काय रागाने,
अख्या देशाची प्रयोगशाळा केल्या वाघाने! 🔥
अधिकारी आणि राजकारण्यांना जनतेची भिती असली पाहिजे!
पण उलट झालंय!
शाळेत नागरिक शास्त्र विषयाकडे शिकवणाऱ्याने 'पगार मिळतंय' म्हणून आणि शिकणाऱ्याने '15 मार्क मिळतात' म्हणूनच पाहिले!
#AisiTaisiDemocracy
गणित विषय किती सोपा आहे आणि त्याला किती सोपं केलं जाऊ शकतं हे आनंद कुमार यांनी 'Basic Mathematics' या you tube वरील मोफत कार्यक्रमात दाखवलं आहे!
लहान मुलं आणि पालकांसाठी चांगला कार्यक्रम आहे!
How आणि Why या शब्दांत जगाचं रहस्य दडलं आहे!
#Lagaan ला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'Spotify Behind Beats' कार्यक्रमात #लगान च्या टीमसोबत गाण्यांच्या आठवणी जाग्या करण्यात आल्या!
"राधा कैसे ना जले" 81+ million आणि "ओ पालनहारे" 40million वेळा ऐकण्यात आलं आहे!
अतिशयोक्तीचा भाग सोडलं तर वरच 1m मीच ऐकलं असेन! 😀
मिरगाचा हंगाम दाटला की आभाळ फाटायला सुरवात व्हायची! शेतकरी खरीपाची लागवड करायचा!
मृग संपून पुढच्या आठवड्यात 'आद्रा' सुरू होईल! पावसाने अजूनही दांडी मारली आहे!
विकासाच्या नावाखाली 'झाडखाऊ' लोकांनी जंगले रिकामी केली, डोंगर फोडली! त्याचा परिणाम देश भोगत आहे!
लोकांच्या मताला Xट किंमत आहे हे आपले राजकारणी लोकं नेहमी सिद्ध करत असतात!
बिनविरोध निवडणूक करून लोकांचा मताचा अधिकारच संपवला जातो किंवा लोकांनी मतदान करून आपला प्रतिनिधी निवडला तर त्याला फोडून हे सिद्ध करून दाखवलं जातो!
बाकी लोकशाहीचा उत्सव अथवा महान लोकशाही मिरवण्यासाठीच!
आमदार खासदारांसाठी ipl सारखी बोली ठेवली तर निवडणूक प्रक्रियेवर खर्च होणारे देशाचे करोडो रुपये वाचतील! ज्या पक्षाची ऐपत आहे तो विकत घेईल!
लोकांनाही आपण मतदान केलेला महान, थोर, स्वाभिमानी, गोरगरिबांचा श्रावणबाळ, 'समाजसेवक' स्वाभिमानासाठी 'दुसऱ्या' पक्षात गेल्याची सल राहणार नाही!
पावसाने सध्या दांडी मारली आहे आणि सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे! मान्सून, IOD, El Nino, La Nina, कमी-जास्त दाबाचे क्षेत्र, red, yellow, orange अलर्ट!
काय असतंय हे सगळं! त्याचा आपला संबंध काय?
सगळं काही समजावून घेऊ 'आपल्या' भाषेत! 'आपल्या' ब्लॉगवर! पावसाच्या आधी! लवकरच!!