हिंजवडी परिसरातील 'ब्लू रिज टाउनशिप'मधील 'द ग्रूव्ह्ज सोसायटी' येथे 'ब्लू रिज पब्लिक स्कूल'च्या अगदी जवळ 'वाइन क्लब' नावाचे दारूचे दुकान सुरू करण्यात येत असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे. शाळा आणि दाट लोकवस्तीच्या निवासी भागात अशा प्रकारे दारूचे दुकान सुरू होणे अत्यंत चुकीचे व चिंताजनक आहे. याच विपरीत परिणाम शाळकरी मुलांच्या मनावर होऊ शकतो. तसेच या परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यासाठी सोसायटी तसेच स्थानिक ग्रामसभेचे आवश्यक असणारे 'ना-हरकत प्रमाणपत्र' देखील घेण्यात आलेले नाही. नियम धाब्यावर बसवून निवासी भागात अशा आस्थापनांना परवानगी देणे अयोग्य आहे. माझी जिल्हाधिकारी, पुणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला विनंती आहे की, कृपया आपण या संवेदनशील विषयाची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी. शाळकरी मुलांचे भविष्य आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व हे दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावेत.
@collectorpune1
Indian cuisine conversations often revolve around Punjabi, South Indian or Bengali food. Odiya cuisine deserves a much bigger place on that table.
What struck me most was its restraint. No overload of cream, butter or chillies. Just balance, mustard, fermentation, texture and freshness.
Dahi Bara Aloo Dum (popular street food), Drumstick-Brinjal Besara, Chhena Tarkari, Chakuli Pitha (like dosa) Aloo Patra Besara… all made at home.