Delighted to attend and interact with visionary leaders, trailblazing entrepreneurs and organizations shaping the future of business through innovation at the ET Now Business Conclave & Awards 2026 - West Edition.
Heartiest congratulations to all the deserving awardees redefining industry standards.
#AshishShelar
भुलेश्वर येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले बृजेश जोशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आमच्यातर्फे जाहीर केलेल्या मदतीचा धनादेश दिला.
#Mumbai#AshishShelar
भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांना आमच्यातर्फे जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
#Mumbai#AshishShelar
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून जतन व संवर्धनाची कामे करण्यात येत आहेत त्याचा सविस्तर आढावा आज घेतला.
जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील १८४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ४४१.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १६१ कामांना ३७२.३४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, १०५.६१ कोटी रुपयांची ५२ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या १८४.६८ कोटी रुपयांची १०८ कामे प्रगतीपथावर आहेत.
विभागीय निधीतूनही १०८ कामांना ६२७.६२ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. यापैकी १६ कामे पूर्ण झाली असून ८६ कामे सुरू आहेत.
#Maharashtra #AshishShelar
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला तसेच काही महत्त्वाचे निर्णय आज आम्ही केले.
•सिंधुदुर्ग येथील नांदोस गढी येथे ‘पुरातत्व स्थळ संग्रहालय’ (Site Museum) उभारणी करुन त्याचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपविणे.
• भगवंत गडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल सर्व्हे करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करणे.
•सिद्धगडाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करणे, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गड परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदा उत्खनन न करणे.
#Maharashtra #AshishShelar
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मजयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्ताने कार्यक्रमांचे नियोजन व आगामी काळातील सांस्कृतिक विभागाचे कार्यक्रम, पुरस्कार वितरण याबाबत आढावा बैठक घेऊन नियोजन केले.
#Maharashtra#AshishShelar
Wishing everyone a joyful and blessed Onam. May the vibrant festival fill every home with prosperity, happiness and togetherness.
Onam Ashamsakal!
#Onam#HappyOnam
वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी यात्रेच्या नियोजनाबाबत आज संयुक्त बैठक घेतली. यात्रेच्या ठिकाणी गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, ट्राफिक नियोजन, बेस्टच्या अतिरिक्त बस गाड्या, पार्किंग, यात्रेतील स्टॉल याबाबत नियोजनाचा आढावा घेऊन सूचना केल्या.
बैठकीला नगरसेविका हेतल गाला, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, महापालिका सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग, संबंधित विभागाचे अधिकारी व माऊंट मेरी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन व पूर्वतयारीबाबत संयुक्त बैठक घेतली. उत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, स्वच्छता, वीजपुरवठा, आपत्कालीन सेवा तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीला भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, नगरसेविका हेतल गाला, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, महापालिका सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग, संबंधित विभागाचे अधिकारी व विविध गणेशमंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
माजी उपमहापौर दिलीप पटेल आणि नगरसेवक संदीप पटेल यांच्या घरी आज कौटुंबिक स्नेह म्हणून भेट दिली. यावेळी दिलीप पटेल यांच्या ९२ वर्षांच्या मातोश्रींसोबत गप्पा मारल्या. खूप मनस्वी आनंद झाला. आमचा पक्ष हे एक आमचे मोठे कुटुंब आहे. त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते असेच एका कौटुंबिक स्नेहाने जोडले गेलो आहोत.
#AshishShelar
भाजपा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेतली. यावेळी आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन आणि संघटनात्मक आढावा घेतला. मार्गदर्शन केले.
यावेळी माजी खासदार किरीट सोमैया, भाजपा मुंबई उपाध्यक्ष अभिजित सामंत, जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, नगरसेवक सुशम सावंत, नगरसेवक नितेश सिंग, राजेश दाभोळकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
@KiritSomaiya@AmeetSatam@VirendraMhatre_
#Maharashtra #BJP4Mumbai #AshishShelar
बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, श्री गंगानगर एक्सप्रेस, अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस आणि जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस या साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ ग्रुपचे पत्रकार संदेश जिमन, तसेच गंगाराम टोपरे, प्रसाद विचारे, मुकुंद सनगरे आणि कमलाकर ब्रीद यांनी पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांचं निवेदन स्वीकारलं.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
Delighted to meet Smt. Tejashri Bhuta Ji and Shri. Shubhendu Bhuta Ji, Trustees of Shree Nagardas D Bhuta Charities (Estd. 1959), today. Had a wonderful interaction with them.
#AshishShelar
न्यायालयाचा नवीन आदेश आला आणि २४ जुलै २०२५ चे निर्देश पुन्हा एकदा चालू ठेवण्याबाबतचा निर्णय दिला. खऱ्या अर्थाने गणेश भक्तांना जो दिलासा मिळाला, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे धन्यवाद आणि गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, समन्वय समिती, महासंघ, उत्सव समिती, मूर्तिकार संघटना या सगळ्यांचे अभिनंदन!
गणेशोत्सवाला बंदीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारे त्यांनाच आम्ही दिमागी नक्षली असं म्हणतो. या दिमागी नक्षल्यांचे कारनामे गणपतीत तर आहेतच..ते दहीकाला उत्सवासाठी सुद्धा आहेत. ते कुंभमेळ्याच्या विरोधात सुद्धा आहेत आणि नागपंचमीला नागाची पूजा थांबवण्यापर्यंत पण आहेत. या दिमागी नक्षल्यांच्या विरोधात उघड बंड भारतीय जनता पक्षाने घेतलंय.
#Maharashtra #AshishShelar
आदित्यजी दिमागी नक्षलींशी तुमची जवळीक तर वाढली नाही ना? या दिमागी नक्षलींशी तुमची काही चर्चा तर होत नाही ना? हा आमचा प्रश्न आहे.
#Maharashtra#AshishShelar
मुंबईतल्या गणेशोत्सवाची जी परंपरा, जे महात्म्य, सार्वजनिक मंडळाचा सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद याला पुरक अशी भूमिका उबाठाची नाही.
#PressConference#Maharashtra#AshishShelar