📍गांधीनगर-नळपाडा, ठाणे
माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील गांधीनगर येथील नवजीवन प्राथमिक शाळा-समाज हॉल आणि नळपाडा मधील पृथ्वीराज हिंदी माध्यमिक शाळा येथे भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. तसेच या सर्व बालकांसोबत माझा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा देखील केला.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ.कल्पनाताई हरिश्चंद्र पाटील जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुम्हाला उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हि आई एकविरा चरणी प्रार्थना.
#happybirthday#Mother#nagarsevika#ThaneMunicipalCorporation#thane
📍येऊर, ठाणे
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी आणि माझ्या मित्र परिवाराने येऊर येथील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेतील अनाथ बालकांची भेट घेतली. यावेळी माझा वाढदिवस अनाथ बालकांसोबत साजरा करून त्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. #BirthdayCelebration#socialservices#Children
आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि हृदयाला भिडणाऱ्या संवादांनी कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#नाना_पाटेकर#NanaPatekar
📍कोलशेत,ठाणे
आज कोलशेत येथे पूर्णेकर यांच्या निवास्थानी भेट देत स्व.प्रदीपदादा पूर्णेकर (बाळादादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेऊन त्यांच्याशी आत्मीय संवाद साधला. यावेळी सोबत मा. नगरसेवक मधुकर पावशे जी उपस्थित होते.
एस.के.पाटील फाऊंडेशन आणि माझ्या संकल्पनेतून साकारलेल्या 'ह्रिद मिस आणि मिसेस ठाणे २०२६' या फॅशन शो स्पर्धेचा ऑडिशन राऊंड नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थिती दर्शवली या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. #advvickypatil
ठाणे शहरातील युवा तरुणींना आणि महिलांना आपले स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे,ठाणे शहराचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध व्हावे म्हणून माझ्या आणि एस.के.पाटील फाऊंडेशन तर्फे 'ह्रीदा मिस आणि मिसेस ठाणे' या फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.