मरणाही आधी राहिलों मरोनी |
मग केले मनीं होते तैसे ||
- संत तुकाराम
आम्ही भारताचे लोक, आमचा विश्वास होता, आमच्या शिकवण्यावर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, आणि परीक्षांवर..
आणि आता…MHT-CET परीक्षा महाघोटाळा…दरवर्षीच…
खोटेपणा कितीही मोठा असला तरी तो एका खऱ्या पुराव्यासमोर टिकू शकत नाही. कायदा आंधळा असतो असे म्हणतात, कारण तो चेहरे पाहत नाही, तो फक्त पुराव्यांची सत्यता तपासतो.
MHT-CET परीक्षेत घोटाळा-
आम्ही प्राध्यापक सुरुवातीला तार्काच्या आधारे सांगत होतो, तो पुराव्याने सिद्ध करून दाखवला !
एकीकडे विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करायचे, पालकांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहायची; तर दुसरीकडे प्रशासकीय गैरकारभार आणि भ्रष्ट नेत्यांनी ही स्वप्न धुळीस मिळवायची. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक अत्यंत गंभीर घोटाळा स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शोधला आहे.
शिक्षणाचा मांडलेला हा बाजार पत्रकार परिषदेतून समोर आणणार असून, अतिशय गंभीर असलेल्या या प्रकरणामुळे एका मोठ्या मंत्र्यालाही राजीनामा द्यावा लागू शकतो. भेटूया उद्या, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे, संध्याकाळी ४ वाजता!
सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध !
सूर्य होता आले नाही,
तरी सूर्यफूल व्हावे मस्तक
त्याच्याकडे असावे,
त्याच्या आलोकात पहावे !
बुद्ध होता आले नाही,
तरी बुद्धफूल व्हावे,
हृदय त्याच्याकडे असावे,
हृदय त्याच्याकडे असावे,
त्याच्या स्फूर्तीत जगावे !
नाशिक कुंभमेळ्यासाठी धरणातील पाणी कमी पडल्यास टँकरने पाणी धरणात सोडण्यात येणार आहे. पण, ध्वजारोहण, शाही स्नान होणार म्हणजे होणारच. शेवटी आमच्या धर्माचं काम आहे. दुष्काळ काय येत जात असतात.!!
जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला तोड सापडले नाही म्हणून त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडविणारी आणि समलैंगिक माथेफिरू आतंकवादी नत्थू गोडसेला बाप बनवून फिरणारी पिलावळ एकच.!!
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर अण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्षातून शिक्षणाची द्वारे खुली झाली…. मात्र परीक्षांमधून (MHT-CET, NEET, MPSC, TET etc) घोटाळे करून हीच द्वारे बंद करून संधी नाकारण्याचे षडयंत्र होत आहे, प्रतिक्रांती चालू आहे….
तुमच्या सामाजिक भेदांचा फायदा घेऊन तुमचे हितशत्रू तुमची एकी होऊ देणार नाहीत. तरी या बाबतीत कुणबी, मराठे, महार, चांभार वगैरे या सर्वांनी शेतकरी तेवढा एक आहे, असे समजून आपल्या हिताच्या आड कोणाला येऊ देऊ नका.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- १ जानेवारी १९३८ (जनता)
मोहनकाका In America "भारत हा बुद्धाचा देश आहे आणि त्यामुळेच शांतता आहे”
“सूर्य होता आले नाही, तरी सूर्यफूल व्हावे !
मस्तक त्याच्याकडे असावे, त्याच्या आलोकात पहावे ! बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे हृदय त्याच्याकडे असावे, त्याच्या स्फूर्तीत जगावे !!”
-डॉ. आ. ह. साळुंखे
भागवत काका अमेरिकेत जाऊन "मुस्लीम नको असे मानणारा हिंदू नाही" असे सांगतात. बाहेर एक बोलायचे आणि इकडे आल्यावर हिंदू -मुस्लिम वाद निर्माण करून त्यात तेल ओतायचं हे बरं नव्हे. त्यांचे शब्द आणि कृतीचा कुठेही मेळ बसत नाही. त्यांचे शब्द खरे मानले तर, भक्तांनी खतना करायला पाहिजे.!!
माझं फार पूर्वीपासून हेच मत आहे की, एखादी व्यक्ती किती गोंगाट शांतपणे सहन करू शकते, हे तिच्या बुद्धिमत्तेच्या अगदी व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे गोंगाट सहन करण्याची क्षमता ही त्याच्या बौद्धिक क्षमतेचा एक चांगला मापदंड मानता येईल.!!
- आर्थर शोपेनहावर
विद्ये विना मती गेली | मती विना नीती गेली ||
नीती विना गती गेली| गती विना वित्त गेले ||
वित्त विना शूद्र खचले | एवढे अनर्थ एका अविद्येने केले ||- महात्मा जोतीराव फुले
कुंभमेळा बजेटच्या पॉईंट वन पर्सेंट सरकारी शाळांवर खर्च केले असते तर या शाळा बंद पडल्या नसत्या.
सुप्रीम कोर्टाचे जज प्रसन्न वराळे यांचे हे वक्तव्य आहे. रेड कार्पेट मिडीया कॉर्प या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत आज रेशीमबागेत मेळावा घेणाऱ्या फडणवीसांना ही चपराक आहे. @saamTVnews
पेपरफुटी ही संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे. यामुळं अहोरात्र कष्ट करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घोर अन्याय होतो. इतकेच नाही, तर अशा गैरमार्गाने यंत्रणेत समाविष्ट होणारे लोक भविष्यात संपूर्ण व्यवस्था अधिक भ्रष्ट आणि खिळखिळी करतात. हा गंभीर प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी, पुण्यात काही विद्यार्थ्यांच्यावतीने #Students_First या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट आणि सविस्तर संवाद साधला, तसेच ही किडलेली व्यवस्था बदलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून कायम सोबत राहण्याचा ठाम विश्वास दिला.
यावेळी माजी सनदी अधिकारी महेश झगडे साहेब यांनी पेपरफुटीवर कठोर भाष्य केलं. पेपरफुटीच्या या गैरप्रकाराला संबंधित विभागाचे सचिव, एमपीएससीचे चेअरमन हेच जबाबदार असून त्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवण्याचं आवाहन केलं. प्रा. अजित खरसडे, प्रा. विकास कदम (लातूर), प्रा. हरिष बुटले, प्रा. नारायण शिनगारे, प्रा. विवेक डोके, युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते सुनील माने, रविकांत वरपे, किशोर कांबळे प्रा. विकास कदम, ॲड. अशोक बेंदरे, वारकरी आघाडीचे दत्ता महाराज दोन्हे पाटील, प्रमोद पाटील, संग्राम नरळे, संदीप मोरे, संकेत कणसे, नितेश सूर्यवंशी, संकेत बारस्कर, अक्षय कांबळे यांच्यासह विद्यार्थी आणि पालकही यावेळी उपस्थित होते.
#StudentsFirst #PaperLeak #MPSC #EducationSystem #StudentsRights #StopPaperLeak #TransparentExams #Accountability #StudentJustice #MPSC #MHTCET