महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कष्टकरी, शेतकऱ्यांची मुलं शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीत पुण्यात येतात. पुणे हे देशाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. काल रात्री पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे.
सबंध राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपली गेली पाहिजे. ही पोलीसांची जबाबदारी आहे. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी ही सुरक्षित असणे हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे.
पुण्यात किंवा महाराष्ट्रातील कुठेही विद्यार्थ्यांच्या हितसंबंधात बाधा येईल किंवा विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण होईल अशी कोणतीही कृती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सहन करणार नाही.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस खंबीरपणे या सर्व विद्यार्थ्यी मुले-मुलीं सोबत उभा आहे. विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यीनींना अशी काही परिस्थिती वाटली तर आमच्या कोणत्याही पदाधिकार्यांशी संपर्क करावा.
-
आकाश झांबरे पाटील
#ncp #nsc #pune #mpsc @mahancpspeaks
Deeply saddened by the tragic building collapse in Delhi, where several students are reportedly trapped.
My thoughts and prayers are with the students, their families, and everyone affected by this heartbreaking incident. I sincerely hope that the rescue operations succeed quickly and that every student is brought to safety.
At this difficult hour, I stand in solidarity with the affected families and pray for strength, courage and hope for everyone involved.
Stay strong. Every life matters, and every effort must be made to bring our students home safely.
#Delhi #students #nsc #DelhiBreaking #ncp @mahancpspeaks
अल्पसंख्याक समाजातील तरुणांच्या शिक्षणाला आणि रोजगाराला नवी दिशा!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वंदनीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजातील तरुणांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत.
या निर्णयांबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज पुणे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आकाश झांबरे आणि इतर पदाधिकारी यांच्या समवेत मा. सुनेत्रावहिनी यांची भेट घेतली. हा संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलच्या अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्नं जाणून घेतली.
📍 पुणे
@SunetraA_Pawar@AkashZambareP
अल्पसंख्याक समाजातील तरुणांच्या शिक्षणाला आणि रोजगाराला नवी दिशा!
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आदरणीय अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजातील तरुणांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत.
या निर्णयांबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज पुणे इथं माझी भेट घेतली. यावेळी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्याशी संवाद साधताना शिक्षणाबाबतच्या अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्नं जाणून घेतली.
📍 पुणे
दिल्ली नगर निगम चुनाव के मद्देनज़र आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से एक विशेष चर्चा बैठक आयोजित की गई।
चुनाव की रणनीति को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की इस विशेष बैठक में पार्टी के राष्ट्रीय महासचिव श्री. अविनाश आदिक एवं राष्ट्रीय सचिव श्री. संजय प्रजापति प्रमुख रूप से उपस्थित रहे।
इस अवसर पर पार्टी के कार्यकर्ताओं से संवाद करते हुए संगठन को जमीनी स्तर पर और अधिक मजबूत करने तथा आगामी दिल्ली नगर निगम चुनाव की रणनीति को लेकर विस्तार से चर्चा की गई। साथ ही, सभी कार्यकर्ताओं से एकजुट होकर पार्टी की विचारधारा और संगठन को जन-जन तक पहुंचाने तथा आगामी चुनाव में पूरी ताकत के साथ कार्य करने का आह्वान किया गया।
बैठक के दौरान कार्यकर्ताओं में आगामी चुनाव को लेकर जबरदस्त उत्साह और ऊर्जा देखने को मिली। सभी ने एकजुट होकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को दिल्ली में और अधिक मजबूत बनाने का संकल्प व्यक्त किया।
📍 नई दिल्ली
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मासिक आढावा बैठक पार पडली.
यावेळी, पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने पदवीधर मतदार नोंदणी, SIR मोहीम यावर शहराध्यक्ष मा.आ.सुनील टिंगरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी, पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी आणि आगामी काळातील प्रत्येक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याबाबत एकजुटीने व जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या आढावा बैठकीस पक्षाच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. वैशालीताई नागवडे, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष मा. श्री. आकाश झांबरे, राज्य युवती अध्यक्षा मा. श्रीमती निर्मला नवले, महिला अध्यक्ष मा. श्रीमती हसीना इनामदार, मा. श्रीमती प्रिया गदादे, पुणे महापालिकेचे गट नेते मा. श्री. निलेश निकम, राज्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख मा. श्री. बाबासाहेब पाटील यांच्यासह शहर विभागाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ncpmaharashtra
Mission Olympics 2036 च्या अनुषंगाने संबंधित शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार यांची भेट घेतली.
यावेळी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेतील आवश्यक सुधारणा, खेळाडूंच्या प्रशिक्षण सुविधा, टॅलेंट स्काऊटिंग आणि महाराष्ट्राची ऑलिम्पिक पदक क्षमता वाढविण्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली.
#ncp #maharashtra #sports
@SunetraA_Pawar
काँग्रेसने आज वापरलेला “गुंगी गुडिया” हा शब्द केवळ एका महिला नेत्यावर केलेली टीका नाही, तर सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेचा अपमान आहे. महिला सन्मानाच्या घोषणा देणाऱ्या पक्षाकडून अशी भाषा वापरली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मतभेद ठेवा, टीका करा, पण महिलांचा अवमान करू नका. महाराष्ट्र काँग्रेसने या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.
#गुंगीनाहीउपमुख्यमंत्री #Maharashtra @SunetraA_Pawar@parthajitpawar@mahancpspeaks@INCMaharashtra
पुरुषप्रधान संस्कृतीत स्री शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या सावित्री माईला देखील पुरुषी अहंकाराचा सामना करावा लागला. इंदिरा गांधींनाही सुरवातीला अवहेलना सहन करावी लागली. परंतु याच अहंकारावर पुरून उरुन त्यांना ‘दुर्गा’ संबोधले गेले.
हे कदाचित पुरोगामीत्वाची टिमकी वाजविणारे आणि इंदिराजींचा वारसा सांगणारे काँग्रेसची लोकं विसरली.
ही नेहरू-गांधीची काँग्रेस नाही आणि हा महाराष्ट्र धर्म नाही.
आदरणीय वहिनीसाहेब, हीच लोकं पुढे तुमच्या कर्तृत्वाचे पोवाडे गातील; हाच इतिहास आहे.
- आकाश झांबरे पाटील
#MaharashtraPolitics #maharashtra @SunetraA_Pawar@parthajitpawar #ncp @mahancpspeaks
राज्यात खाजगी क्लासेसची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रचंड प्रमाणात शोषण ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यामुळे शेतकऱ्यांचे होत आहे.
त्या क्लासेसच्या भरमसाठ फीस भरण्यासाठी शेतकरी पालक आपल्या जमिनी गहाण ठेवत आहेत आणि प्रत्यक्षात निकाल मात्र १% सुद्धा लागत नाही.
खोट्या जाहिराती व प्रचार, प्रसार करून अक्षरशः स्वप्ने विकण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. याचे खुप दुरगामी दुष्परिणाम महाराष्ट्रात होणार आहेत.
माझी राज्य सरकारला खुप नम्र विनंती आहे की य खाजगी क्लासेसच्या संदर्भात धोरण व कायदे तयार करून त्यावर नियंत्रण आणावे.
-आकाश झांबरे पाटील
#maharashtra #neet #class
आत्ताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील लोकांच्या पेक्षा काँग्रेस सरकार मधील मंत्री अधिक सक्षम आणि बुद्धिमान होते असे वाटते. त्यांचे ज्ञान इतके होते की त्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता.
त्यामुळे त्यांनी कधीही गाड्या, ताफा वगैरे गोष्टींना फार महत्त्व दिले नाही. पी. चिदंबरम हे एक गाडी घेऊन यायचे व स्वतःही चालवायचे, मला आठवताय एकदा मी संसदेत गेलेलो त्यावेळी ए. के. अँटोनी हे संरक्षण मंत्री होते आणि एक साधी वॅगणार घेऊन आलेले.
बुद्धीप्रामाण्य लोक साधी राहतात आणि देशाचे भले करतात.
मा. मोदींनी केलेल्या अवाहनचा ट्रेंड सुरू झाला आहे व त्या ट्रेंडला प्रसिद्धी देण्यात सर्व यंत्रणा व्यस्त आहेत. परंतु यामुळे मुलभूत प्रश्न मात्र मागे राहत आहेत किंबहुना त्यासाठीच असले ट्रेंड केले जात आहेत की काय असे वाटते.
परंतु या विषयावर आपण व्यक्त झाले पाहिजे असे वाटले.
आज भारतातील लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. पण त्या स्वप्नाच्या मार्गावर NEET ही एकमेव परीक्षा उभी करण्यात आली आहे. प्रश्न असा आहे की, ही परीक्षा खरोखर सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देते का?
भारतीय राज्यघटनेनुसार वैद्यकीय शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत येतो. म्हणजेच केंद्र आणि राज्य — दोघांनाही या विषयावर अधिकार आहेत. परंतु आज वास्तव असे आहे की प्रवेश प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण केंद्र सरकारकडे गेले आहे. राज्यांच्या शैक्षणिक परिस्थिती, स्थानिक भाषा, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमाचा पुरेसा विचार केला जात नाही.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. शहरातील विद्यार्थ्यांकडे महागडे कोचिंग क्लासेस, डिजिटल सुविधा, इंग्रजी माध्यम आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध असते. पण गावातील अनेक विद्यार्थ्यांकडे चांगले इंटरनेटही नसते. अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून येतात. दिवसभर कष्ट करून ते अभ्यास करतात. तरीही त्यांना CBSE आधारित प्रश्नपत्रिकेसमोर उभे केले जाते. ही स्पर्धा समान नाही.
NEET मुळे शिक्षणापेक्षा ‘कोचिंग संस्कृती’ वाढली आहे. या कोचिंग क्लासेस साठी राज्य किंवा केंद्र सरकारने योग्य कायदे करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ‘कोचिंग माफिया’ हा नविन घटक तयार झाला आहे.
याहून गंभीर प्रश्न म्हणजे मानसिक ताण. आज विद्यार्थी फक्त परीक्षेला सामोरे जात नाहीत, तर पालकांचा दबाव, समाजाची अपेक्षा आणि अपयशाची भीती यांनाही सामोरे जातात. ‘डॉक्टरच व्हायचे’ हा दबाव इतका वाढला आहे की अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात. काही दुर्दैवी घटना तर आत्महत्येपर्यंत पोहोचतात. कोणतीही परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा मोठी असू शकत नाही.
म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की NEET परीक्षा राज्यांच्या अधिकारात असावी. प्रत्येक राज्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा, भाषा, अभ्यासक्रम आणि सामाजिक परिस्थितीनुसार प्रवेश पद्धती ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. राज्य सरकारांना स्थानिक विद्यार्थ्यांसाठी न्याय्य आणि संतुलित व्यवस्था निर्माण करता येईल.
आपण गुणवत्ता नाकारत नाही; पण गुणवत्ता मोजण्याची पद्धत न्याय्य असली पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्वप्न, गरीब पालकांची आशा आणि विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य यांचा विचार करून शिक्षण व्यवस्था उभी राहिली पाहिजे.
शिक्षण हे स्पर्धेचे रणांगण नसून संधीचे दार असले पाहिजे.
आणि त्या दारावर प्रत्येक विद्यार्थ्याचा समान हक्क असला पाहिजे.
धन्यवाद!
-आकाश झांबरे पाटील
#NEET #exam #NEETexan
काल कोल्हापूर मध्ये पी. साईनाथ सरांची भेट झाली.
या माणसाचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनंत उपकार आहेत असे मला वाटते. कारण रखरखत्या उन्हात विदर्भात फिरत असताना शेतकरी, कष्टकर्यांसोबत बोलून त्यांचे प्रश्न इतक्या ताकदीने आणि आभ्यासपुर्वक मांडले की तत्कालीन मनमोहन सिंह सरकारला शेतकऱ्यांचे ७२,००० कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करावे लागले.
आपल्या कामा बाबत कमालीचा व्यासंग आणि निष्ठा असणारी खुप कमी लोकं सध्या आपल्याला भेटतात. त्यापैकी पी. साईनाथ सर आहेत. त्यांना ऐकताना त्यांची त्यांच्या कामा प्रती निष्ठा किती असावी याचा प्रत्यय येतो.
बाकी उमेदीच्या काळात पद्मभूषण पुरस्कार नाकारायला सुद्धा वाघाच काळीज लागत!
#Kolhapur #maharashtra
अलिकडे महाराष्ट्रात भोंदू बाबांचे प्रस्थ खूप वाढू लागले आहे. त्या अनुषंगाने मला राज्यातील तमाम नेत्यांना आवाहन करू वाटते की; नेत्यांनी कितीही एखाद्यावर श्रद्धा असली तरी असल्या भोंदुसोबत फोटो काढणे व त्याचे सार्वजनिकिकरण करणे टाळावे.
याचे कारण असे की त्या नेत्यांवर प्रेम करणारे कार्यकर्ते हे नेत्यांच्या कृतीने प्रभावित होत असतात व त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि अश्या भोंदूच्या आहारी जातात.
यावेळी मला माझे नेते वंदनीय अजितदादांची खूप आठवण येते. कारण दादा कधीच असल्या बाबा बुवाच्या नादाला लागले नाही. म्हणून दादा सर्वांपासून वेगळे होते. तीच प्रेरणा आम्हाला मिळाली.
#maharashtra
बागेश्वर बाबा जे काही बोलला ते अनावधानाने बोलला नाही. त्यांची रणनीती नेहमी अशीच राहिली आहे. जाणीवपूर्वक कल्पोकल्पित गोष्टी सांगायच्या आणि आपली लोकं इतिहासात घुसवायची.
यांना शिवाजीने ‘छत्रपती’ होणे मान्य नव्हते, यांना शाहूंनी समतेचा विचार मांडणे व राज्य चालवणे मान्य नव्हते, यांना फुलेंनी बहुजनांना शिक्षण देणे व महात्मा होणे मान्य नव्हते, यांना बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचे शिक्षण घेणे व वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे मान्य नव्हते आणि यांना बहुजनांनी माणूस म्हणून जगणेही मान्य नव्हते!
स्वराज्याची संकल्पना आणि प्रेरणा ही मासाहेब जिजाउंचीच होती.
#maharashtra
कोण कसे भाषण करते, कोण काय करते याचा विचार करण्यापेक्षा काँग्रेसने महाराष्ट्रात आपले राहिलेले अस्तित्व टिकवण्याचा विचार करावा. काल प्रदेश कॉंग्रेसने दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या उद्विग्नतेचे प्रतिक आहे असे मला वाटते.
खर तर ही पोटनिवडणूक आदरणीय वहीनी साहेब किंवा आदरणीय पार्थ दादा किंवा संपुर्ण पवार कुटुंब किंवा आदरणीय दादांवर प्रेम करणारे सर्व मंडळी फार आनंदाने लढत आहेत असा विषय नाही;तर परिस्थितीने या सर्वांवर तशी वेळ आणलेली आहे आणि या वेळे आपण अतिशय दुःखी अंतकरणाने सामोरे जात आहोत. ही गोष्ट काँग्रेसने समजून घेण्याची आवश्यकता होती.
त्यांचे विदर्भा पासून मुंबईपर्यंतचे कोणते नेते कोणा कोणाला कसे कसे सेटल होतात याची यादी काढली तर सपकाळ साहेबांना पळता भुई थोडी होईल.
त्यामुळे माझे त्यांना एवढेच सांगणे आहे की, लोकशाहीच्या गप्पा नंतर मारा आधी थोडी नैतिकता जपा!
- आकाश झांबरे पाटील
#Ncp #politics #maharashtra #ajitdada #congress @INCMaharashtra@parthajitpawar
सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. छत्रपतींनी नेहमी नितीमुल्यांना प्राथमिकता देऊन राज्यकारभार केला व त्याचीच शिकवण व प्रेरणा आपल्याला दिली आहे.
सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. आजही चव्हाण साहेबांचे नाव महाराष्ट्राचे शिल्पकार व आदर्श नेते असेच घेतले जाते.
आजही ‘यशवंत’ विचारांवरच या महाराष्ट्राची वाटचाल होत आहे.
महाराष्ट्राने कधीही इतके द्वेषाचे राजकारण पाहीले नाही. एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इतका उन्माद केला जाणे हे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे.
समृद्ध परंपरा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांनाही ही गोष्ट आवडलेली नाही.
बरोबर- चुक काय हा निराळा मुद्दा आहे पण छत्रपतींचा वरसा सांगणे व वारसा जपणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!
#maharashtra #satara #politics
Within the next 5 to 10 years, the American economy will collapse, and the global economy will operate on a parallel plane—until a new economic superpower emerges.
The attack launched against Iran—at Israel's instigation—will mark the beginning of America's end.
#war#IranWar #usa #superpower #india #power #world
पुढिल ५ ते १० वर्षांत अमेरिका अर्थव्यवस्था कोसाळून जाईल आणि जागतिक अर्थव्यवस्था एका संमांतर पातळी वर काम करेल; नविन आर्थिक महासत्ता तयार होई पर्यंत!
इस्रायलच्या नादाला लागून इराणवर केलेला हल्ला हा अमेरिकेच्या शेवटाची सुरुवात ठरेल!
#war#IranWar#usa#Economy#power#powershift #World