नवी मुंबई:
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष निखिल दादा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे उत्साहात पार पडली @parthajitpawar@SunetraA_Pawar@Jaypawarspeaks
इथे कुठली सिक्युरिटी नाही, कुठला मेटल डिटेक्टर नाही. थेट शेतकऱ्यांना भेटून त्याचं म्हणणं ऐकून, त्यांना दिलासा देणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय @SunetraA_Pawar आदरणीय सुनेत्रा वाहिनी दादांचा वारसा भक्कमपणे चालवत आहेत.
राज्यात पूर परिस्थितीत सर्व नियोजित दौरे रद्द करून दादांची कंट्रोल रूम मधे सकाळी अशी एन्ट्री व्हायची आणि ब्रेकिंग न्यूज लागायची. ही ब्रेकिंग न्यूज लागली की सगळे निश्चिंत राहायचे. दादा पूरबाधित विभागाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सुचना द्यायचे आणि तातडीने मदत पोहोचवायचे.
#अजितदादा
गेल्यावेळी पुणे जिल्हा परिषद राज्यात दोन नंबर ला आली होती आणि ZP CEO गजानन पाटील हे त्यांच्या ZP टीम सोबत अजितदादा यांना भेटायला गेलेले..तेव्हा अजितदादा CEO ना म्हणाले "गजानन पुढच्या वेळी आपला पुणे जिल्हा एक नंबर हवा "
दादा पुणे जिल्हापरिषद राज्यात एक नंबर आलीय.. पण हे पहायला दादा तुम्ही नाहीत..
History made. India lift the T20 World Cup for the third time.
A rock-solid batting display by Abhishek Sharma, Sanju Samson and Ishan Kishan set the tone early and put India firmly in control. Brilliant bowling from Jasprit Bumrah and Axar Patel ensured the pressure never eased the opposition.
A solid performance in all departments led to a convincing victory for the Men in Blue on home soil. A proud moment for every cricket fan as Team India brings the T20 World Cup home once again. 🏆🇮🇳
#TeamIndia #T20WorldCup2026final
#INDvNZ #Champions
आता मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर दादा त्यांच्या अशा स्टाईलमध्ये असे परत कधीच दिसणार नाहीत. आमचा माणूस कर्तृत्ववान, सचोटीचा, जनसेवेचा वसा घेतलेला, चुकीला चूक, बरोबर ला बरोबर म्हणणारा सडेतोड, पारदर्शी, दूरदर्शी, रोखठोक आणि कामाचाच होता त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. Miss you 💔
महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पवित्र जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
दादांनी ज्या तळमळीने आणि वेगाने काम केले, त्याच कार्यपद्धतीने काम करण्याचे ध्येय मनी बाळगल्याची भावना यावेळी व्यक्त केली. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त दादा या कार्यक्रमाला उपस्थित असायचे. शिवनेरीचा जिवंत वारसा जपण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. दादांना अपेक्षित विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्य करताना कुठेही कसूर बाकी राहणार नाही, याची खबरदारी मी घेईन, असे स्पष्ट केले.
दुःखातून पळ काढणं सोपं, पण दुःखातही जबाबदारी स्वीकारणं म्हणजे नेतृत्व.
शोकाला वेळ नसतो; कर्तव्याला मुदत नसते.
सत्तेची हाव नाही—राज्याची जवाबदारी आहे.
टीका करणाऱ्यांना विश्रांती, पण राज्याला नेतृत्व हवं असतं.
वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून काम करणं म्हणजेच सार्वजनिक जीवन.
जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो.
यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर रहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता आणि त्यागाचा तेजस्वी त्रिवेणी संगम. रयतेसाठी न्यायप्रिय व लोकाभिमुख कारभार करताना त्यांनी मानवी मूल्ये आणि लोकनिष्ठा जपली. अपराजित योद्धे, विद्वान कवी, कुशल प्रशासक आणि लोकहितदक्ष राजा म्हणून इतिहासावर अमिट ठसा उमटवणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज
#राज्याभिषेक_दिन
जिथे आम्ही मैदानात ‘कुस्तीचा डाव’ टाकतील समजत होतो त्या ठिकाणी विरोधक ‘रडीचा डाव’ टाकत आहेत. लोकांचा कौल हा राष्ट्रवादीच्या बाजूने आहे, त्यामुळे ही भितीपोटी केलेली कृती आहे. पुणेकरांना दादांनी दिलेला शब्द पूर्ण होऊ नये म्हणून आणलेले हे विघ्न आहे. श्री दगडूशेठ गणेशाच्या कृपेने या विघ्नावर मात करून पुणेकरांना दिलेला शब्द दादांच्या हातून पूर्ण होईल हा पुणेकरांना विश्वास आहे.
राष्ट्रवादीची घोडदौड रोखू पाहणाऱ्यांना 15 जानेवारीला पुणेकर मत रुपी ऊत्तर देतील.
साहेब, आपले योगदान देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.. 💐💐
@PawarSpeaks
तळोदा नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेस संबोधित करताना नगरविकास, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या अडचणी, महिलांसाठी उपयुक्त योजना, युवकांना रोजगारांच्या संधी या मुद्यांवर भाष्य केले व त्याना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आमदार @sanamalikshaikh जी, जिल्हाध्यक्ष्य अभिजीत मोरे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@mahancpspeaks
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. संतोष फकीरा सरोदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
फुरसुंगी-उरुळी देवाची परिसराचा सर्वांगीण विकास हा आमचा निर्धार आहे. पुढील काळात एकजुटीनं, वेगानं आणि प्रामाणिकपणे कामं केली, तर हा परिसर प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाणं शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी निवडणुकीत मतदारराजा विकासाला, कामाला आणि स्थैर्याला पाठिंबा देईल, यात शंका नाही. या भागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, अन्य पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था या सर्व प्राथमिक गरजांवर नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही काम करू. यासोबतच नवीन उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास नागरिकांना दिला.
तुमचा विश्वास, तुमचं सहकार्य आणि तुमची ताकद सोबत असेल, तर फुरसुंगी–उरुळी देवाचीचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही तळमळीनं आणि जबाबदारीनं काम करू, अशी हमी दिली. फुरसुंगी–उरुळी देवाची परिसराच्या विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी आमच्या कार्यक्षम उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना सभेच्या निमित्तानं केलं.
📍जि. पुणे
गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू 'बाळा'ने अजितदादांवर बरळणे म्हणजे 'इतभर लाकूड अन हातभर ढलपी' असा प्रकार आहे.
विजयाचा उन्माद करताना अनगरच्या “बाळानी”उड़ता तीर अंगावर घेतला आहे.
लवकरच …. झुकतील गर्विष्ठ माना!!