मुंबईत एक स्वतःला नेता म्हणवणारा ‘डोनाल्ड डक’ मोकाट सुटलाय,हा डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो, आणि हा Donald duck पाण्यात स्टंट करतो, मिडिया कॅमेऱ्यासमोर पोझ देत नौटंकी करत फिरतो, बावचळलाय अगदी. कृपया महापालिका अधिकाऱ्यांना विनंती आहे, कुठे सापडला तर वीरमाता जिजाऊसाहेब उद्यानात सुरक्षित ठेवावा. कारण ह्याच्या फिरल्याने मुंबईकरांचं मनोरंजन कमी आणि संतापच जास्त होत आहे.
ह्यांना भेटा हे आहेत भाजपचे आमदार अमीत साटम!
वर्ष २०२१ साली BMC ने १०४ % नालेसफाई करुन सुद्धा पाणी साठले म्हणून तत्कालीन आयुक्त चहल आणि सत्ताधारी शिवसेनेवर बोंबलत होते. आज वर्ष २०२६ साली भाजप ची BMC वर सत्ता आहे , देशात आणि राज्यात भाजप आहे. ह्यावर्षी कोरोना नाही, पाऊस सुध्दा उशीरा आला आहे आणि ह्यावर्षी तब्बल १३० % नालेसफाई झाली आहे तरी देखील पाणी साठत आहे.
आता अमीत साटम सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि आयुक्त अश्विनी भिडे ह्यांना काही उपदेश देणार का ? कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या असतात हे अगाध ज्ञान ते द्यायला विसरले असतील का ? #BMC #MUMBAI #Mumbairains
@AmeetSatam
'स्पेशल' मुलांसाठी उभारलेलं स्वप्न... आज १४ वर्षांचं! ❤️
काही निर्णय हे फक्त स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते
अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरतात. अभिनेते अजिंक्य देव
आणि पत्नी आरती देव यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेला असाच एक निर्णय
आज हजारो पालकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
मुंबईतील अंधेरी (पश्चिम), विरा देसाई रोड येथे त्यांनी 'अकादमी ऑफ
लर्निंग अँड डेव्हलपमेंट' या स्पेशल मुलांसाठीच्या शाळेची स्थापना
केली. या संस्थेने नुकतीच आपल्या यशस्वी प्रवासाची १४ वर्षे पूर्ण केली.
या खास टप्प्यानिमित्त देव कुटुंबाने विशेष पूजेचे आयोजन करून या
प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या शाळेच्या स्थापनेमागे एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा
दडलेली आहे. अजिंक्य आणि आरती देव यांना आर्य आणि तनया अशी
दोन अपत्ये आहेत. त्यांची मुलगी तनया ही स्पेशल चाईल्ड असल्याचं
त्यांना ती लहान असतानाच समजलं. अशा परिस्थितीत अनेक पालक
निराश होतात किंवा "हे आपल्या नशिबीच का?" असा प्रश्न विचारतात.
मात्र देव दाम्पत्याने हा विचार न करता तनयाला देवाची खास देणगी
आणि आशीर्वाद मानलं.
तनयाला सर्वोत्तम शिक्षण, प्रेम आणि योग्य वातावरण मिळावं यासाठी
त्यांनी स्वतः प्रयत्न सुरू केले. याच प्रवासात त्यांच्या लक्षात आलं की,
समाजात तनयासारखी अनेक मुलं आहेत आणि त्यांच्या पालकांनाही
योग्य मार्गदर्शन, आधार आणि विश्वासाची गरज आहे. तेव्हाच त्यांनी या
मुलांसाठी स्वतंत्र संस्था उभारण्याचा निर्णय घेतला.
एक छोटा विचार आज मोठ्या चळवळीत रूपांतरित झाला आहे. गेल्या
१४ वर्षांत अनेक स्पेशल मुलांनी या शाळेत शिक्षण घेतलं, आत्मविश्वास
मिळवला, नवीन कौशल्यं आत्मसात केली आणि आपल्या क्षमतांनुसार
आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग शोधला. त्यांच्या पालकांनाही या संस्थेमुळे
आधार, विश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन मिळाला.
या १४ वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलताना अजिंक्य देव म्हणाले, "देवाने
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन
मिळालं आणि त्यामुळेच हा प्रवास शक्य झाला. या संस्थेमुळे अनेक
मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करता आला, याचं समाधान सर्वांत
मोठं आहे."
'अकादमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट' ही केवळ एक शाळा नाही,
तर प्रत्येक स्पेशल मुलामधील क्षमता ओळखून त्यांना आत्मविश्वासाने
जगायला शिकवणारा एक परिवार आहे. गेली १४ वर्षे ही संस्था प्रेम,
समर्पण, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचं
सुंदर उदाहरण ठरत आहे.
या प्रेरणादायी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! पुढील अनेक वर्षे ही संस्था
असंख्य स्पेशल मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश निर्माण करत
राहो,हीच सदिच्छा. @Ajinkyad
खरय @AmeetSatam , खूप पाहणी केली तुम्ही reels बनवण्यासाठी त्यामुळे बहुतेक मुंबईत फक्त पाणीच नाही साचलं , तर नदीचं झाली आहे रस्त्यांवर.
@BJP4Mumbai@BJP4Maharashtra