वॉ.क्र.१० मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न. उपाध्यक्ष मा.श्री.राजू भाऊ भांदुर्गे, बांधकाम सभापती मा.श्री.राहुलजी तूपसांडे, वॉ.क्र.१० नगरसेविका सौ.माया ताई वाघमारे, वॉ.क्र.८ चे नगरसेवक मा.श्री.सतीशजी वानखेडे व स्थानिक नागरिक उपस्थित.
कर्तव्याची आणि विश्वासाची ६ महिने...
लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाच्या सेवेत आज ६ महिने पूर्ण होत आहेत. या अल्पशा कालावधीत जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा आणि विविध विकासकामांना गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नव्हे, तर विश्वास, एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामूहिक प्रगतीचा भक्कम पाया आहे. ग्रामीण ते शहरी भागापर्यंत शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासात सहकार चळवळीने मोलाचे योगदान दिले आहे.
दि. २ जुलै २०२६ | 📍 वाशिम न्यायालय, वाशिम
"संवादातून विश्वास निर्माण होतो, आणि विश्वासातून जनसेवेची वाट अधिक सक्षम बनते."
आज वाशिम न्यायालय येथे आदरणीय अॅड. परिजात पांडे सर, सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला.
पावसामुळे तुंबलेल्या नाल्यांची आज वॉर्ड क्र.८ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. अडचणींची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित निराकरणासाठी कार्यवाहीचे निर्देश.
अनिल माधवराव केंदळे, नगराध्यक्ष, न.प. वाशिम
जनसेवा, समाजहित आणि विकासाची अखंड तळमळ जपत आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करणारे, समाजकारण आणि लोकसेवेचा आदर्श जपणारे मा. आमदार श्री. बळीरामभाऊ सिरसकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या यशस्वी कारकिर्दीला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
दि. १ जुलै २०२६ | 📍 नगर परिषद, वाशिम
“आजची एक हिरवी सुरुवात… उद्याच्या समृद्ध, सुंदर आणि पर्यावरणपूरक वाशिमची मजबूत पायाभरणी!”
‘कृषी दिन’ आणि वाशिम जिल्हा निर्मितीच्या २९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नगर परिषद, वाशिमच्या वतीने भव्य वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न झाले.
देशाच्या आर्थिक प्रगतीला गती, करप्रणाली पारदर्शक-सक्षम, उद्योगांना आर्थिक मार्गदर्शन व शिस्तीची पायाभरणी या कार्यात CA बंधू-भगिनींचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या ज्ञान, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेमुळे अर्थव्यवस्था सक्षम, विश्वासार्ह व गतिमान होत आहे.
#nationalCAday
शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; त्याच्या परिश्रमाने प्रत्येक घराची अन्नथाळी समृद्ध होते.
आधुनिक शेती, जलसंधारण, पीकविविधीकरण व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दूरदर्शी विचार करणारे MHचे माजी CM, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचे कार्य आजही प्रेरणादायी.
भारतीय टपाल विभाग हा देशाच्या जनजीवनाशी जोडलेला विश्वासाचा मजबूत दुवा आहे. दुर्गम गावांपासून ते शहरांपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पत्रे, पार्सल, आर्थिक सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी टपाल कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात.
#nationalpostmanday
मानवी जीवनाचे रक्षण हेच सर्वोच्च कर्तव्य मानून दिवस-रात्र निःस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणारे डॉक्टर हे समाजाचे खरे जीवनदाते आहेत.
आपल्या ज्ञान, अनुभव, समर्पण आणि सेवाभावाच्या बळावर ते असंख्य रुग्णांना नवजीवन देत समाजात आशा आणि विश्वास निर्माण करतात.
#nationaldoctorsday
संतांची पावन भूमी, समृद्ध सांस्कृतिक वारसा, कृषीप्रधान परंपरा आणि विकासाची नवी वाटचाल अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख लाभलेला वाशीम जिल्हा आज सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
अनिल माधवराव केंदळे
नगराध्यक्ष, नगर परिषद वाशिम
#Maharashtra#washimcityformationday