महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ही सत्ताधाऱ्यांना जशी अपेक्षित होती; त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने राबविली होती. अगदी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात वाढविलेला मतांचा टक्का असो अगर अचानक वाढलेली मतदारांची संख्या ! निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष नसल्याचा दावा आम्ही पहिल्या दिवसापासूनच करीत आलो होतो. प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया यांच्यामार्फत आम्ही आमचे म्हणणे मांडतच आलो होतो. शिवाय, निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेल्या निवडणूक आयोगाने त्याकडे लक्षच दिले नव्हते. आता मा. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या दाव्यावर सकारात्मक भाष्य केले आहे.
निवडणूक निर्णयाला आव्हान देणाऱ्या जेवढ्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चिरडण्यासाठी निवडणूक आयोग चक्क इव्हीएममधील मूळ डाटा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. आता मा. सर्वोच्च न्यायालयाने या तक्रारींचे निराकरण न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसारच करण्याचे आदेशित केले आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुका- २०२४ ईव्हीएम मशीनच्या ( C & V ) तपासणी व पडताळणीसाठी आयोजित बैठकीमध्ये आपणास विनंती केली कि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी जनहित याचिका (C) No.434 of 2023 मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना EVM ची Burnt Memory/Microcontroller तपासणी व सत्यापन करण्याचा अधिकार आहे, असे नमूद करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या तरतुद व दिलेले आदेशानुसार EVM ची Burnt Memory/Microcontroller तपासणी करण्याची कोणतीच तरतूद Presentation मध्ये आढळून आली नाही. उलटपक्षी EVM मधील मतदानाच्या काळात टाकलेली मते काढून टाकून नवीन मॉक पोल घेवू नये व उमेदवाराद्वारे उपस्थित केली प्रश्न मा निवडणूक आयोगाच्यासमोर उपस्थित करावे, असे मा. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही निवडणूक आयोगाला बसलेली मोठी चपराक आहे.
या लोकशाही टिकवण्याच्या लढाईला मिळालेले हे पहिले यश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोकशाही पुनःर्जिवीत होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
तत्कालीन समाज व्यवस्थेतील तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा, समाजात जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा ही विचारधारा संत रोहिदास महाराजांची होती. मानवतावादी आणि बंधुत्ववादी विचार संत रोहिदास महाराजांना प्रिय होते. अशा या महान संतांची आज जयंती.
संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
I was the first to visit and expose the unholy nexus of builders, civic officials, police who conspired with the builder to drive out 650 poor families, mostly from the backward class, in Powai’s Jai Bhim Nagar in june 2024. Now, Mumbai Police has booked 10 mostly senior civic and police officials for an illegal monsoon demolition. Justice prevails!
The fight for truth was worth it even though crores were exchanged for the drive.
Justice #Accountability
https://t.co/qMWLXJHHgK
राजीव गांधी यांच्या खुन्यांना फाशी देऊ नका अशी विनंती सोनिया गांधी आणि कुटुंबियांनी, संपूर्णपणे मानवतावादी दृष्टीकोनातून न्यायालयाला केली होती. परंतु ती अमान्य करण्यात आली.
मुद्दा इतकाच की ही प्रथा आहे. दृष्टीकोण दयेचा असो की दबावाचा, न्यायालयीन प्रक्रिया बदलता येत नाही.
मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांना कर्जमाफी, पेंशनवाढ, संजय गांधी निराधार योजना, अशा अनेक लोकहितासाठी विविध योजना राबविणारे, सचिवालयाचे मंत्रालय करण्यापासून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावणारे, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन..!