सत्याचा आवाज फार मोठा असतो. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो, सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी नेहमी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत
असते एकना एकदिवस विजय हा सत्याचाच होतो...
कोणतीही परिस्थिती फार काळ टिकत नाही तशीच अडचणी व संकटे ही दूर होतात. शांतपणे सामोरे जा सर्व काही ठीक होईल..... तसही काम करणाऱ्या व्यक्तीलाच जास्त त्रास सहन करावा लागतो....
तुमच्या आयुष्यात खरे प्रामाणिक, ईमानदार माणसं असतील तर, त्यांना कधी गमावू नका. कारण या दिखाव्याच्या दुनियेत तुमच्यावर विश्वास सगळेच लोक दाखवतील पण, आतून क्वचीतच लोक तुमच्याशी प्रामाणिक असतील. म्हणून 'आयुष्यात मोजक्यांचीच साथ असावी पण खऱ्यांची साथ असावी....
Good morning...💐🙏
महाराज तुम्ही आमचे दैवत आहे इथली मराठी माणसं देवाच्या अगोदर तुम्हाला मानतात, कारण आमची निष्ठा तुमच्या चरणाशी आहे राजे तुमचे खूप उपकार आहेत आम्हावरती अशा जिवंत व्यक्तिमत्त्वाचे मरण सुद्धा सोहळा होऊन जाते.. शंभू राजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!
💐
#छत्रपती_संभाजी_महाराज
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे ठरलेलेच असतात. उभं रहायचं परिस्थितीसमोर,माणूस हळवा असतोच फक्त त्याच्या हळवेपणाच्या जागा वेगवेगळ्या असतात. माणसापेक्षा संकटं कधीच मोठी नव्हती ना नसतील फक्त माणसाने एकदा ठरवायला हवं आणि त्यावर ठाम राहायला हवं...