शाखा क्र. ९३ येथे आयोजित ‘जनता दरबार’मध्ये नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध. 🚩
वांद्रे पूर्वमधील वाहतूक कोंडी सातत्याने वाढत आहे. सकाळी संध्याकाळी एकेक तास वेस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी होते. बीकेसीतही वाहतूक कोंडी होते. सर्व्हिस रोडवर��ल अतिक्रमण काढून टाकण्याची वारंवार मागणी केली होती. वेस्टर्न एक्सप्रेसवरील ट्राफिक कन्जेक्शनवर लवकरात लवकर सरकारने उपाययोजना कराव्यात. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त करून वनवे पार्किंग करावं.
- वरुण सरदेसाई, आमदार
@SardesaiVarun
वॉर्ड क्र. ९३ मधील शासकीय वसाहत सुयोग मित्र मंडळ इमारत क्र. २०२ ते २११ चौक येथे बालवाडीचे लोकार्पण माझ्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShivsenaUBT#anilparab
स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.
आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झा��ं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्र��प नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.
बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच त��� कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे.
राजकारणात कधीत��ी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.
बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं ज��ज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे 'बाळासाहेब' आणि 'मराठी' या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही.
स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
भारत नगर, वॉर्ड क्र. ९२ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांच्या युतीचे उमेदवार श्री. अरुण कांबळे यां��्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्साहात पार पडली.
या प्रसंगी आमदार श्री. वरुण सरदेसाई यांच्यासह युतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShivsenaUBT #Alliance #WardNo92
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज वांद्रे पूर्व येथील शाखा क्र. ९३ ला भ��ट दिली व शिवसैनिकांशी संवाद साधला. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, तेजस ठाकरे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
भारतात निवडणूक विषयक सुधारणा खरचं करायच्या असतील तर -
1.मुख्य न्यायाधीशांना (CJI) निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून वगळणे योग्य नाही हे समजून घ्यावे लागेल.
2. निवडणूक आयुक्तांना संपूर्ण कायदेशीर संरक्षण देण�� चुकीचे, बेकायदेशीर ठरते याची जाणीव असायला हवी. म्हणजे निवडणूक आयुक्तांनी काहीही बेकायदेशीर केले, पदाचा दुरुपयोग केला तर त्यांच्यावर काहीच कारवाई नाही असा नियम जो 2024 साली करण्यात आला तो बेकायदेशीरतेविरुद्ध दाद मागण्याचा अधिकारच काढून घेण्याचा प्रक आहे. हा गंभीर अन्याय व मोठी असंविधानिकता दूर केली पाहिजे.
3.मतदान केंद्रांवरील CCTV फुटेज 45 दिवसांत नष्ट करण्याची घाई शंकास्पद आहे. सीसीटीव्ही फुटेज सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे कारण तो पारदर्शक निवडणुकांचा एक भाग आहे.
4. 12 वी उत्तीर्ण झाल्यावर जे कुणी कॉलेजमध्ये प्रवेश करतांना 18 वर्षांचे असतील त्यांची विद्यापीठात नोंदणी झाली की थेट त्यांची नोंद निवडणूक आयोगाने मतदार म्हणून करून घ्यावी.
5. कुणाच्या मृत्यूची नोंद झाली की संबंधित विभागाने तसे निवडणूक आयोगाला कळविण्य��ची प्रक्रियाच असावी आणि मृतकाचे नाव मतदार यादीतून रद्द करावे.
(अश्या काही सुधारणांची मागणी नागरिकांनी करावी)
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारयादीत झालेला घोळ त्वरित दूर करावा आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे जी यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, मनसे नेते बाळा नांदगांवकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण तसेच इतर शिवसेना-मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
#ShivsenaUBT #BMC #Elections #mumbai #AnilParab
निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी आज मोठ्या जनसमुदायाने 'सत्याचा मोर्चा'त सहभाग घेतला. बोगस मतदारांच्या विरोधात जागरूक मतदार एकत्र येऊन त्यांनी सत्यासाठी एल्गार पुकारला.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे जी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात जी आदींनी जनसमुदायला मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते श्री. विजय वडेट्टीवार जी, शेकापचे अध्यक्ष श्री. जयंत पाटील जी व सर्व सहयोगी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
#ShivsenaUBT #Mumbai #स��्याचामोर्चा #मुंबई #AnilParab
माझ्या आमदार निधीतून आज कलामंदिर चौक वांद्रे पूर्व येथे ‘क्रांतीची मशाल’ या शिल्पाचे लोकार्पण विभागप्रमुख आमदार अनिल परब साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
वांद्रे पूर्व मतदारसंघात मशालीने क्रांती ह्यापूर्वीच घडवली आहे, आता वेळ आही मुंबई महापालिकेची.
वांद्रे पूर्व विधानसभेतील सर्व नवरात्रौत्सव मंडळ व साऊंड मालक यांच्या वर पोलीस प्रशासनाकडून आलेल्या साऊंड निर्बंधावार तोडगा काढण्यासाठी आज दिनांक १६/०९/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता शिवसेना नेते,आमदार,विभागप्रमुख ॲड. अनिल परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली.
आज SRA कार्यालय येथे SRA CEO महेंद्र कल्याणकर, वरिष्ठ अधिकारी आणि विकासक ह्यांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्व मतदारसंघातील महत्वाच्या विषयांवर बैठक संपन्न झाली.
१) शिवालिक वेनचर्स 3K स्कीम ह्यांचा धीम्या गतीने सुरु असलेला प्रकल्प तसेच आंबेवाडी बुद्धविहार संबंधी स्थानिकांच्या तक्रारी मांडल्या.
२) कनाकिया पॅरि��� ह्यांच्या प्रकल्पातील अनेक तक्रारी स्थानिकांनी मांडल्या. तसेच त्या समोरील मिससिंग लिंक रास्ता पूर्ण तयार असून तो अजून वाहुतुकीकरिता खुला केला नाही.
३) बालाजी शॉपकिपर्स रखडलेल्या प्रकल्पाबाबत तक्रार केली.
तसेच वांद्र्यातील अन्य रखडलेल्या SRA प्रोजेक्ट संदर्भात चर्चा झाली.
भक्ती, उत्साह आणि परंपरेचा जल्लोष! 🚩
वांद्रे येथे आयोजित वांद्र्याची मानाची हंडी २०२५ निमित्त
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्य ठाकरे साहेब
यांनी उपस्थित राहून सर्व ग���विंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार श्री. वरुण सरदेसाई जी, आमदार श्री. सचिन अहिर जी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#वांद्र्याचीमानाचीहंडी #दहीहंडी२०२५ #ShivsenaUBT #BandraFestival #KrishnaJanmashtami #Dahihandi2025 #Mumbai #Bandra #AnilParab