प्रशासनावर मजबूत पकड आणि विकासाची दूरदृष्टी असलेले नेते अजित दादा पवार आपल्यातून निघून गेले.
स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.
ही हानी कधीही भरून न येणारी आहे.
ईश्वर दादांच्या आत्म्यास चिरशांती देवो. 🙏
📍 पुणे | १० जानेवारी २०२५. 🚩🏹
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रॅली व जाहीर सभांना उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि पुणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.
शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह आणि एकजूट पाहून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला. 🚩
🇮🇳 इतिहासाची नवी पायरी… मालवणकरांसाठी अभिमानाची क्षण! 🚩🙏
आज मालवण तालुक्यातील नांदोस शिवकालीन गढी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित पारंपरिक पुरातत्त्वीय उत्खननाचा शुभारंभ सोहळा सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार साहेब यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य व पुरातत्त्व विभागाने सुरू केलेले हे कार्य मालवणच्या इतिहासाला नवे आयाम देणार आहे. शिवकालीन वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेतलेले हे ऐतिहासिक पाऊल भविष्यातील पिढ्यांना आपल्या मातीचा अभिमान अधिक दृढ करणार आहे.
याप्रसंगी पुरातत्व व वस्तूसंग्रहाचे संचालक डॉ. श्री. तेजसजी गर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, श्री. अतुल काळसेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. संतोष साठविलकर अन्य मान्यवर तसेच नांदोस गावातील ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी अनेक वर्षांपासून सांगत आलोय कोकणातला पाऊस हा एक महत्त्वाचा निकष आहे. विद्युत यंत्रणा ही अनेक वर्षांपासून फक्त दुरुस्ती वर अवलंबून आहे, जोपर्यंत आपण वादळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस हिशोबात घेत नाही तळ कोकणातली ही विद्युत यंत्रणा अशीच निकामी ठरणार आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच या विषयावर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
@meNeeleshNRane गावाला सोडलेल्या वळूप्रमाणे वैभव नाईक हा माणूस आहे, लोकांच्या लग्नात, बारश्याला जाऊन जेवणावर ताव मारायचा एवढंच काय ते त्याच काम, विकास ह्या शब्दाचा आणि वैभव नाईकचा लांब लांब पर्यंत संबंध नाही..
देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सेनेतील १० शहीद सुपुत्रांच्या स्मृती पितर्थ कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथे "रणस्तंभ" उभारण्यात आला आहे, या रणस्तंभाचे उद्घाटन आज करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार श्री. वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, सरपंच सौ. सुनीता शेंडगे, उपसरपंच सौ. महेंद्र राऊळ यांच्यासह अनेक माजी सैनिक प्रतिनिधी व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मोदी सरकारने तहव्वूर राणा ला भारतात आणला, आता सरकार दाऊद इब्राहिमला भारतात कधी आणणार याकडे लक्ष लावून आहे, कारण 26/11 जितका भयानक हल्ला होता तसेच 93 चे बॉम्ब ब्लास्ट पण होते.
मालवण एस.टी. बस आगारास नवीन बसेस मिळाव्या यासाठी महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती, महायुती सरकारच्या मार्फत 5 बसेस मालवण आगाराला उपलब्ध करून दिल्या आणि आता पुन्हा 5 बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण आज मालवण येथे संपन्न झाले.
यावेळी आगारव्यवस्थापक श्री. सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजू परब, माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर,
जिल्हा संघटक श्री. महेश कांदळगांवकर, श्री. दीपक पाटकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ येथे महायुतीच्यावतीने शिमगोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. काका कुडाळकर, श्री. संजय पडते, श्री. संजू परब, श्री. आनंद शिरवलकर, श्री. विकास कुडाळकर, सौ. प्राजक्ता बांदेकर, श्री. दादा साईल, श्री. बबन शिंदे अन्य महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून ''धर्मवीर ज्वाला'' कुडाळ येथे आली होती. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवभक्तांना संबोधित केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत, उपनेते श्री. संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर तसेच शिवप्रेमी मोठ्या उपस्थित होते.
वारकरी संप्रदायातर्फे शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना पहिला 'जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन.