लाईटबिलावरील फक्त नाव बदलायचे असल्यास पुण्यात 2500-3000 लागतात. तशी त्यांची पावती 130/- ची आहे. पण सगळ्यांची पोटे भरल्याशिवाय हे काम होत नाही. नाहीतर अँप्लिकेशन 200% रिजेक्ट केले जाते.
तुमच्याकडे काय रेट चालू आहे?
#महाभ्रष्टवितरण#पुणे
सरत्या दिवसाअखेरीस काळोखाच्या अगणित वाटा चालत आलेला चंद्र अजून जवळचा भासतो,किमान नशिबी शांतता तरी असावी त्याच्या...
परिस्थितीशी संघर्ष करत उद्याच्या सुर्योदयाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या असंख्य जीवांना तो एक दिपस्तंभ भासत असावा...❤
I m Cosmetic Chemist, भारतातल्या मोठ्या ब्रँड्स सोबत काम केलेय, मी लोकांना सतत सांगत असते कॉस्मेटिक्स हा खूप मोठा फ्रॉड आहे, कॉस्मेटिक्स वर लगाम घालणारा कडक कायदा नाही, FD&C ऍक्ट फक्त नावाला आहे, उगाच influence होऊन स्वतःच डोकं लाऊन काहीही उत्पादने वापरू नका +
या उत्पादनांच्या इंग्रेडियंट लिस्ट मध्ये सुद्धा ठराविक ingrd.चा उल्लेख असतो,उगाच आपल्या आरोग्याशी खेळू नका,तज्ज्ञांचा सल्ला घ्या,वरील क्रिमची ing. list tweet सोबत जोडत आहे, कुठेही त्यांनी पाऱ्याचा उल्लेख केला नाही,त्यामुळे हे कोणाच्या लक्षात येत नाही @RahulAsks@Tukaram_IndIAS
अंगणात तुळस नसलेलं घर चालेल तुला..? पहिल्या प्रहरानंतर चिमण्यांचा खिडकीजवळच्या फांदीवरचा गजर नकोय तुला..? खंडेराव , दिवस उगवत राहतील मावळत राहतील.. आपल्याला नेमकं काय पाहिजे याचा शोध या चिमण्या सांगतील.. मंजुळ तुळस ; शांत झोप हे या शोधाचं मूळ आहे.. हेच सांगेल तुला..❤️
#नेमाडपंथी
उदाहरणार्थ आई सगळी तयारी करून ठेवायची..पेन पेन्सिल पट्टी..त्यावेळी परीक्षेला जाताना आईचं ठरलेलं वाक्य असायचं.. 'बाळा, येतं ते अगोदर लिही.'
आलं की, आई मायेनं चेहऱ्यावरून हात फिरवायची..दुधात साखर टाकून प्यायला द्यायची.
मग घर सुटलं आणि परीक्षेचं अप्रूप वाटणं बंद झालं..❤️
#नेमाडपंथी
एक वर्षापूर्वी ११ जुलै २०२५ रोजी युनेस्को ने शिवछत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद केली होती. त्यातील ११ किल्ले महाराष्ट्रात आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्र शासनाने एकही गडकिल्ल्याच्या संवर्धनाच काम चालू केलेले नाही. #शिवराज्याभिषेक_दिन
इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव!
स्वयंपाक असा झाला म्हणून तीला कधी बोलू नये.. आपल्या खाण्यासाठी ती राबत असते.. आत्ता गॅस आले, उदाहरणार्थ चुलीचा धूर खात घरादाराची खळगी भरणाऱ्या स्त्रिया तर 'राबबहाद्दूरच'.. खाणाऱ्याला काय, उचलली जीभ लावली टाळ्याला.. अन्न कसंही असलं तरी पचतं, बोललेले शब्द सहजासहजी पचत नसतात..❤️
#म
आमच्याकडे पण यायचा लहानपणी 'गुरखा' हा शब्द म्हणता येत नसल्याने मुलं मग त्याला 'बुरखा आला' असे म्हणत. रात्री एक वाजता फाटक ठोठवणारा बुरखा किती शूर असेल चोरांनाही घाबरत नाही असं वाटत असतानाच कधीतरी त्याला घराजवळील लोकांकडे 20 rs मागताना पाहून त्याचा शूरपणा मनातून नाहीसा व्हायचा.
आमच्याकडे साडेअकरा-बारा वाजता गुरखा यायचा. अभ्यास करत असताना त्याच्या शिट्टीचा आवाज आला की वाटायचं खूप रात्र झाली. तो एकदाच यायचा, नगरपरिषद त्याला काही पैसे द्यायची वाटत. आणि लोक सुद्धा स्वखुशीने त्याला पैसे द्यायची.
त्याचा जॉब निवांत होता,त्याला दुपारी कुणीच बघितलं नव्हतं.
@arshiet@Akhil17___ Reason for that ' चाल ' instead of 'चल ' in the song,here in Khandesh in some native languages people use this word चाल instead of चल.
The singer and writer sanju rathod of this song is from Khandesh, that's why he used these words in the song.
पाणवठे आणि इतर सार्वजनिक बांधकामे — जी आजही त्यांच्या भव्यतेची साक्ष देतात.
आपली धार्मिकता कोणालाही न घाबरता जपत, प्रशासनावर वचक ठेवत आणि घरंदाजपणा कायम राखत लोकहिताला सर्वोच्च स्थान देणारी स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर. खऱ्या अर्थाने त्या OG Strong Woman होत्या आणि राहतील.
आजच्या काळात ज्या "Strong Independent Woman" ची चर्चा होते, त्याची खरी आणि अस्सल व्याख्या मला अहिल्याबाई होळकरांमध्ये दिसते.
शांत, संयमी आणि दूरदर्शी नेतृत्व, सक्षम राज्यकारभार, लोककल्याणासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवण्याची वृत्ती, देशभर उभारलेली कालातीत मंदिरे, घाट +