देशाला लाभलेले कणखर नेतृत्व, कुशल संघटक, यशस्वी गृहमंत्री आणि प्रथम सहकारमंत्री श्री. अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! देशहिताला गती देण्यासाठी आपणांस उदंड आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
#AmitShah#HBDayAmitShah
महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांनी इचलकरंजी येथे सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व माझ्या इंदुकला निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या नेमबाजी मिश्र दुहेरी स्पर्धेत मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. भारताने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावलेले हे दुसरं पदक कौतुकास्पद आहे. दोन्ही स्पर्धकांचे अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
कार्यक्षम, दूरदृष्टी नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासक, राज्यातील विकासात्मक व तळागाळातील जनतेच्या अडचणींची जाण असलेले अभ्यासू नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राला लाभलेले व्यासंगी नेतृत्व, कुशल संघटक, मुत्सद्दी राजकारणी, राष्ट्रसमर्पित लोकनेते, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Devendra Fadnavis
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी येथील माझ्या इंदुकला निवासस्थानी सदिच्छा यांनी भेट दिली.
राजमाता जिजाऊ यांच्या आज पुण्यतिथी निमित्त त्यांच्यात असलेल्या गुणांचा परिचय करून घेणे आज काळाची गरज आहे. कारण देशाला जिजाऊंसारख्या आदर्श मातांची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची आज पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
चला तर आपण एक निश्चय करूया, सामाजिक जाणीव ठेवून रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदानाचे महत्व इतरांना पटवून देऊन रक्तदानाची एक सामाजिक चळवळ उभारूया...
जीवनदान देणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सलाम !🫡
जागतिक रक्तदान दिन!🩸
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यालय, कोल्हापूर येथे भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आज जागतिक बाल कामगार विरोधी दिन..
बालकांना कामगार बनवून हिरावू नका त्यांचे आयुष्य..
शिक्षणाने घडवू त्यांचे उद्याचे उज्ज्वल भविष्य..
#जागतिक_बाल_कामगार_विरोधी_दिन