जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान ह्यांची आज जयंती. क्षमा, अहिंसा, समता, त्याग ह्यांचं सर्वोत्तम प्रकटीकरण म्हणजे भगवान महावीर.
भगवान महावीर ह्यांना माझं कोटी कोटी नमन व महावीर जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏
#महावीरजयंती#MahavirJayanti
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती.
आज पक्षाचा १७वा वर्धापनदिन. गेल्या १७ वर्षांत महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड काम केलं. आमच्या कामाचा, आमच्या संघर्षाचा इतिहास, 'आम्ही काय केलं.' ह्या पुस्तिकेतून आपण मांडत आहोत. पुस्तिका जरूर डाउनलोड करा:
https://t.co/spt63RPchZ…
'... मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !'
#मराठीराजभाषादिन#MarathiRajbhashaDin
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा स्मृतिदिन. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, समाजसुधारक, हिंदू संघटक, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे, अशा अनेक रूपात समोर येत राहतात. ह्या महान कृतिशील तत्वज्ञाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार... परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी ह्यांना मातृवियोग झाला. आईचं मायेचं छत्र गमावणं ह्या इतकं मोठं दुःख असूच शकत नाही. ह्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मोदीजींना ईश्वराने देवो हीच प्रार्थना. मोदीजींच्या आईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. @narendramodi
ज्येष्ठ भाजप नेते श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.
#अखंडमहाराष्ट्र