व्यक्त व्हा. योग्य कमेंट बडे मुद्दे कार्यक्रमावेळी दाखवल्या जातील.
आपल्या महाराष्ट्रात अतिशय संतापजनक, किळसवाणा आणि अघोरी प्रकार समोर आलाय. तळपायाची आग मस्तकात जातीय एवढं घृणास्पद आहे हे.
त्यामुळे हा मुद्दा चर्चेला घेतलाय. चर्चा रात्री 8 वा न्यूज एटीन मराठीवर
पोलिसांबद्दल आपल्या मनात कायम एक नकारात्मक भाव असतो पण ही कहाणी ऐकल्यावर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. सव्वा दोनशे पोलिसांच्या बलिदानातून, विकासातून माओवाद्यांच्या दहशतीचा शेवटचा अध्याय लिहिला जातोय. https://t.co/JCCJ7lFExf #news18lokmat@Dev_Fadnavis
मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
निसर्गासारखी वीजही शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखी वागते. दिवसा मिळत नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात पाणी द्यावं लागतं. गेली कित्येक वर्ष वडिलांना रात्रीच्या थंडीत पाणी देताना पाहिलंय. पण सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपामुळे दिवसा शेतीला पाणी देण्याची सोय झालीय.
महाराष्ट्र TVJA EXCELLENCE पुरस्कार २०२५ चा सर्वोत्कृष्ट न्यूज अॅंकर पुरस्कार (प्रथम क्रमांक) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पुरस्कार रूपाने दिसतंय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. 🙏🏻 Thank you #tvja@Dev_Fadnavis
त्यांनी तातडीने आपण अनावधानाने बोलून गेलो असा व्हिडिओतून खुलासा केलाय. पण या सगळ्याचा विनाकारण मनस्ताप झाला. त्यामुळे जबाबदार व्यक्तींनी अतिशय जबाबदारीपूर्वक विधानं करावीत अशी अपेक्षा आहे. Suresh Dhas Devendra Fadnavis
माझ्या हत्येच्या कटात पत्रकारांचा सहभाग आहे असं एका मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी दावा केला. त्यात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. एका जबाबदार व्यक्तीने अतिशय गंभीर आणि खळबळजनक असं हे वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार महोदयांना याबाबतीत विचारणा केली.
अतिशय साधा माणूस, मदतीला धावून जाणारा, एक संवेदनशील पत्रकार, कधीही कुणाला त्रास न देणारा बाॅस अशी त्यांची ओळख कायम राहिली. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. द मिलिंद भागवत सर सॅल्यूट 🙏🏻 💐💐
गेली 25 वर्षं टिव्हीच्या स्क्रीनवर दिसणारा एक लोकप्रिय चेहरा असलेल्या मिलिंद भागवत यांनी News18 लोकमतचा निरोप घेतला. टीव्हीतला प्रवास थांबवून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. 25 वर्षांच्या प्रदीर्घ इनिंगमध्ये 10 वर्षं त्यांच्यासोबत काम करता आलं.