एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित���त मनःपूर्वक शुभेच्छा..!
गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत पर्यावरण संवर्धन, आरोग्य, कृषी, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत फोरमने उल्लेखनीय कार्य केले. ही यशस्वी वाटचाल आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सेवा��ाव, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. या समर्पित कार्याला मनापासून सलाम करते आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते.
बारामतीतील विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असलेल्या अनेक सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या फोरमची स्थापना केली. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून २०१० साली सुरू झालेली ही चळवळ आज एक व्यापक सामाजिक आंदोलन बनली आहे.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, विहीर पुनर्भरण, आरोग्य शिबिरे तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक जनजागृती अशा अनेक क्षेत्रांत फोरमने प्रभावी कामगिरी केली आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या बारामती तालुक्यात ‘“प्रकल्प मेघदूत’” च्या माध्यमातून ���ढे रुंदीकरण, सरळीकरण आणि पाणीसाठा अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. या उपक्रमांमुळे संपूर्ण तालुका टँकरमुक्त झाला. या अभियानातून जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आणि जंगलातील मुक्या प्राण्यांसाठीही पाणवठे तयार करण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न, सायकल रॅली, मॅरेथॉन अशा उपक्रमांना चालना देणे, प्लास्टिक कॅरीबॅग मुक्तीसाठी जनजागृती आणि फटाके विरहित दिवाळीचा संदेश देणे, बारामतीतील हॅप्पी स्ट्रीट, मातीतीतल्या खेळांची जत्रा अशी अनेक कामे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आली. तसेच कर्करोग निदान शिबिरे, वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिका जागर अभियान यांसारखे सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमही राबवण्यात आले.
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या या सर्व कामांमध्ये राज्याचे ��िवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची सदैव खंबीर साथ आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि प्रोत्साहनामुळे या चळवळीला अधिक बळ मिळाले. त्यांचे मार्गदर्शन सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या कार्याचा विस्तार पुढील काळात आणखी व्यापक होईल आणि समाजोपयोगी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपण अभिमानास्पद क्षण अनुभवू, असा विश्वास मला आहे.
पुन्हा एकदा सर्वांना एन्व्हॉ��्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आधुनिक महाराष��ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी प्रगत, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. सहकार चळवळ, शिक्षण, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देत त्यांनी राज्याच्या आर्थिक व सामाजिक उभारणीचा पाया मजबूत केला. राष्ट्रहित, लोककल्याण आणि प्रगत विचारांचा वारसा देत त्यांनी महाराष्ट्राला दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिले. त्य��ंच्या कार्यातून घडलेला विकासाचा मार्ग आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#यशवंतराव_चव्हाण
#YashwantraoChavan
आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वयकांची आणि स्टार प्रचारकांची माझ्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची संघटनात्मक बळकटी, स्थानिक राजकीय परिस्थिती, जनसंपर्क अभियान, रणनीती आणि निवडणूक व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन करत स्थानिक प्रश्न, मतदारांच्या अपेक्षा आणि पक्षाची भूमिकाही तपशीलवारपणे मांडली.
याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते तथा पक्षाचे स्टार प्रचारक श्री. सयाजी शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. ��ूपालीताई चाकणकर, पक्षाचे आमदार, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित हो��े.
महाराष्ट्राच्या राजकारण आणि सहकार ���्षेत्राच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे, माजी मुख्यमंत्री तथा सहकारमहर्षी पद्मभूषण स्व. वसंतदादा पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! जनतेच्या कल्याणासाठी अखंड झटणाऱ्या वसंतदादांचे कार्य आणि विचार आजही सहकार चळवळीला नवी दिशा देतात.
आज मुंबईतील वरळी डोम ये��े नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते श्री. सैयद वाजिद सैयद नफीस, श्री. मकसुद शेख गफर खाटिक आणि शिवसेनेचे डॉ. राजेंद्र धनजी पेंढारकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्व���गत केले आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी ��्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी, रणनीती आणि विजयासाठी आवश्यक दिशानिर्देश देत सर्वांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, पक्षाचे संघटन सरचिटणीस आ. श्री. संजय खोडके, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष आ. श्री. शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे वरि���्ठ सहकारी, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@SunilTatkare @ChakankarSpeaks
#NCP #Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित जिल्हानिहाय आढावा बैठकीत कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आलं. या बैठकीदरम्यान कोल्हापुरातील अन्य पक्षांतील काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत असलेला पक्ष आहे. एकजुटीनं आणि जनतेच्या विश्वासानं आम���ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहोत.
📍मुंबई
@mahancpspeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांच्यावर हृदयविषयक शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर संपूर्ण सुधारणा व्हावी व ते नव्या जोमाने आणि उत्साहाने लोकसेवेच्या कार्यात पुन्हा कार्यरत व्हावेत, हीच सदिच्छा!
@ChhaganCBhujbal
माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे एकल महिलांच्या विविध प्रश्न���ंबाबत बैठक संपन्न झाली. राज्यातल्या ग्रामीण भागातील एकल महिलांच्या रोजगार व स्वयंरोजगारासाठी, त्यांचे राहणीमान व जीवनस्तर उंचाव��्यासाठी तसेच एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपायोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
एकल महिलांच्या उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवावे. सर्व एकल महिलांच्या नावे घर व इतर संपत्ती वर्ग करण्यासाठी राजस्व महाअभियान अंतर्गत महसूल प्रक्रिया सुलभ करावी. एकल महिलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी इत्यादी उपायोजनांबाबत माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन जी भुजबळ साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
@ChhaganCBhujbal
मराठी माध्यम क्षेत्रातील अत्यंत विश्वासार्ह नाव असलेल्या "झी २४ तास"च्या वतीने आज "झी २४ तास मराठी सन्मान पुरस्कार" सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रांत मराठीचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला.
अभिनेते श्री. श्रेयस तळपदे, गायक श्री. अभय जोधपूरकर, दिग्दर्शक श्री. संजय जाधव, मॅनकाईंड फार्मा कंपनीचे जॉय चटर्जी यांच्यासह विविध मान���यवरांचा यावेळी माझ्या हस्ते सन्मान केला. आपल्या कर्तृत्वाने मराठी मातीचा नावलौकिक वाढवणारे हे मान्यवर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे वैभव आहे. अशी भावना व्यक्त करत सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. या अनोख्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला दिल्याबद्दल संपादक श्री. कमलेश सुतार यांच्यासह झी २४ तासच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री. आशिषजी शेलार साहेब, अभिनेते श्री.भरत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
@ShelarAshish @zee24taasnews @kamleshsutar
जनतेच्या हक्काचा.. जनता संवाद !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार �� प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार दर बुधवार प्रमाणे आजही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय, मुंबई येथे "जनता संवाद" या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांसोबत संवाद साधला.
यावेळी अनेक नागरिकांनी त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मांडल्या. यापैकी अनेक प्रश्न संबंधित विभागांना सूचना देऊन तात्काळ मार्गी लावले आहेत. उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक सूचना माझ्या कार्यालयाला दिल्या आहेत.
@AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks
आज मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृहात विविध इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी श्री. सदाशिव पाटील, श्री. जितेंद्र फडके, भाई अ��न यांच्यासह विविध इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात स्वागत केले व आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या संघटनात्मक अनुभवाचा आणि जनतेतील जनसंपर्काचा उपयोग पक्षाच्या बळकटीसाठी करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काळात अधिक व्यापक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचून पक्षाची विचारधारा आणि कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबद���री आपल्यावर आहे. मा. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असून, त्यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी श्री. जितेंद्र फडके यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी तर श्री. सदाशिव पाटील यांची अंबरनाथ शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांना दे���ील शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आमदार श्री. शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते श्री. आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस श्री. लतिफ तांबोळी, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर घारे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुर्गुणांवर सद्गुणांच्या विजयाचे प्रतीक असलेला पवित्र उत्सव म्हणजे "दसरा" !
हा उत्सव आपल्यातील दुर्गुणांचा नाश करणारा, आपले जीवन सद्गुणांनी परिपूर्ण करणारा, सर्वांना आनंद व उत्साह देणारा ठरावा याच शुभेच्छा !