स्वराज्याची अस्मिता जपण्यासाठी, स्वराज्याच्या रक्षणाखातर आपले प्राण पणाला लावणारे आणि असामान्य शौर्य उराशी बाळगणारे धुरंदर राजकारणी, प्रकांड पंडित, शूरवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! मानाचा मुजरा!
छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!
सर्वोत्कृष्ट योद्धा, छत्रपती व पुत्र अशा सर्वच भूमिकेत शंभूराजेंचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी व कार्याने अविरत संघर्षाची प्रेरणा मिळते.
#संभाजी_महाराज#छत्रपती#शंभूराजे#SambhajiMaharaj#Chhatrapati
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येक क्षेत्रात आपल्या क्षमतेचा प्रभाव सिद्ध करणाऱ्या महिलांचा सार्थ अभिमान वाटतो. कुटुंब, समाज आणि वैयक्तिक स्वप्ने यांचा समतोल साधत वाटचाल करण्याचे धाडस आणि ताकद केवळ स्त्रियांमध्येच आहे, याचा नितांत अभिमान वाटतो.
संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!त्यांनी सत्य, समानता आणि प्रेमाची शिकवण दिली. समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन जालन्याच्या विकास कामावर चर्चा केली. याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित होते.
गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. गानकोकिळा, भारतरत्न लता (दिदी) मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐
'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' चा नारा देत भारतीयांच्या मनात अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देणारे थोर क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.!
#netajisubhaschandrabose#नेताजी_सुभाषचंद्र_बोस
छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. शौर्य,नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला. जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी निःपक्ष, निर्भीडपणे सत्य समाजासमोर मांडणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मा,ना ,श्री, खा,रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय रेल्वे,व कोळसा,व खनिकर्म राज्य मंत्री, भारत सरकार ,व मा, ना,श्री, भागवतजी कराड केंद्रीय अर्थमंत्री भारत सरकार यांचे व मान्यवरांचे जालना नगरीत हार्दिक स्वागत🙏🙏