ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
ठाकरे बंधूंना जाहीर पाठींबा ✌️
होय,आपला मराठी माणूस मजबूत होतोय!
"आपला मराठी माणूस"
संकटात असेल तर आपणच पुढे यायचं, हे मराठी माणसाच्या रक्तातच आहे..💪
सर्व मराठा बंधू-भगिनींनो, मोठ्या संख्येने एकत्र या आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करा..🚩
धन्यवाद @ekikaranmarathi समिती 🙏
निवडणूक आयोगाला साधा प्रश्न ……..
जर XYZ नावाच्या उमेदवाराने त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये व बॅलेट युनिटवर या उमेदवाराचे व NOTA पर्याय म्हणून अस्तित्वात आहे तर मग XYZ बिनविरोध निवडून आला आहे हे कसे म्हणता येईल ? जनतेला पर्याय निवडण्याची मुभा नाकारता कशी येईल ?
#लोकशाहीची_हत्या #NOTA #ElectionCommission
पत्रकार: मुंबईबाहेर जाणाऱ्या मराठी माणसाला जबाबदार कोण?
मतदार: देवेंद्र फडणवीस.
मराठी माणूस जेव्हा आपल्या मूलभूत प्रश्नांवर बोलतो, तेव्हा भाजपचे लोक 'जय श्रीराम'च्या घोषणा देऊन मूळ विषयावरून लक्ष भरकटवतात. जणू काही रामावर यांचीच मक्तेदारी आहे. भाजपने रामाच्या नावावर राजकारण थांबवून जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
कोण किती खोटारडं असू शकतं, हे ह्या निर्लज्जांना पाहून कळतं... कोस्टल रोडचं जसं हे क्रेडिट चोर श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत, तसंच आज होर्डिंग लावलं आहे की वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा पुतळाही ह्या खोटारड्यांनी बसवला.
पुतळ्याची जागा, पुतळ्याचं रुप हे उद्धवसाहेबांनी ठरवलं, तो बसवलाही उद्धवसाहेबांनी आणि फी पण उद्धवसाहेबांनीच दिली!
पण चोर ते चोरच... सरळ होऊच शकत नाहीत...मिंधेंच्या आरश्यात त्यांना चेहरा तरी स्वतःचा दिसतो की तोही चोरलेला?
#CreditChor
या आहेत भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली महानगरपालिकेच्या
नगरसेविका रेणू चौधरी ... त्या म्हणतात ...
अगर इसने एक महीने में हिंदी नहीं सीखी तो इससे पार्क छीन लो ...
इसे आठ महीने हो गए हैं मुझे बताए हुए।
अगर एक महीने में हिंदी नहीं सीखी, यहाँ की "मातृभाषा" नहीं सीखी ...
यहाँ का पैसा खा रहे हो तो मुँह से भी हिंदी बोलना सीखो।
आम्ही महाराष्ट्रात मराठी शिका म्हटले की आम्ही संकुचित ...
महाराष्ट्रात येता इथे पैसे कमवता तर इथली मातृभाषा मराठी यायलाच पाहिजे ... भाजपवाल्यांनो ठीक आहे ना ...
नाशिक २०१२ – २०१७: 'प्रशासक' राज ठाकरे यांचा सुवर्णकाळ! 🚩
नाशिकच्या राजकारणात सध्या अनेक चर्चा सुरू आहेत, पण नाशिकच्या तिजोरीचे नेमकं काय झालं? २०१२ ते २०१७ आणि त्यानंतरचा काळ... यावर नजर टाकणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची गरज आहे.
जेव्हा मनसेची सत्ता आली, तेव्हा नाशिक महानगरपालिका ६५० – ७०० कोटींच्या कर्जाखाली दबलेली होती. राज ठाकरे यांनी पाच वर्षे केवळ एका नेत्याच्या भूमिकेत न राहता, एक 'कडक प्रशासक' म्हणून पावले उचलली:
✅ कर्जमुक्तीचा ध्यास: सत्तेत येताच प्रथम जुने कर्ज फेडण्यावर आणि पालिकेची आर्थिक पत सुधारण्यावर भर दिला.
✅ भ्रष्टाचाराला लगाम: लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांच्या युतीतून होणारी जनतेच्या पैशाची लूट थांबवली.
✅ नागरिक केंद्रबिंदू: "कंत्राटदारांना काय हवे" यापेक्षा "नागरिकांना काय देऊ शकतो", हा विचार करूनच विकासकामे केली.
✅ पारदर्शक कारभार: प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर केला; कचरा उचलणाऱ्या गाड्यांनाही 'GPS' प्रणालीद्वारे नियंत्रित केले.
✅ विनाकर्ज कुंभमेळा: सर्वात मोठे यश म्हणजे, कोणताही अतिरिक्त कर्जाचा बोजा न वाढवता ऐतिहासिक कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडला.
✅ नियोजित विकास: शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सुंदर वाहतूक बेटे उभारली. ५१० किलोमीटरचे दर्जेदार रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामे याच पाच वर्षांत झाली.
पण त्यानंतर काय झाले?
नाशिकला 'दत्तक' घेणारे आले आणि त्यांनी शहराला बकाल करून टाकले. सत्ता बदलली, शहर दत्तक घेण्याच्या घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात काय घडले?
मनसेच्या काळात उभ्या राहिलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांची आज दुरवस्था झाली आहे.जागोजागी खड्डे आणि पावसाळ्यात रस्त्यांवर साठणारे पाणी ही नाशिकची नवी ओळख बनली आहे.
आता प्रश्न पडतो...
आगामी कुंभमेळ्यासाठी सुमारे ८००-९०० कोटींचे कर्ज घेण्याची चर्चा सुरू आहे. जो कुंभमेळा पूर्वी चोख नियोजनातून पार पडला, तो आता कर्ज काढून का करावा लागतोय? हा प्रश्न प्रत्येक नाशिककराने विचारायला हवा.
⚠️ सावधान!
तुम्हीही कर्जाच्या ओझ्याखाली आहात...
केवळ नाशिकच नाही, तर देशाची आर्थिक स्थितीही विचार करण्यासारखी आहे:
२०१४ मध्ये: देशावर दरडोई कर्ज (प्रत्येक नागरिकामागे) सुमारे २२ हजार रुपये होते.
२०२५ मध्ये: हेच कर्ज आता सुमारे १ लाख ४० हजार रुपयांच्या वर गेले आहे!
मतदान करताना डोळे बंद करू नका! 🗳️
विकास हा कर्जाच्या डोंगरावर नव्हे, तर 'सुशासनाच्या' पायावर उभा असावा लागतो. येत्या निवडणुकीत योग्य प्रशासक ठरवण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याकडे शहराचे 'व्हिजन' आहे आणि ज्यांची प्रशासनावर पकड आहे, त्यांनाच साथ द्या.
ही गोष्ट केवळ नाशिकपुरती मर्यादित नाही; राज ठाकरे यांची कल्पकता इतकी मोठी आहे की, ते संपूर्ण महाराष्ट्राला खऱ्या विकासाकडे नेण्याची ताकद ठेवतात.
मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, श्री. दिनकर पाटील यांचं पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबन करण्यात आलं आहे. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
#MNSAdhikrut
मुंबई कोळ्यांची असे म्हटले जाते. ते फक्त म्हटले जाते.
कारण भाजपचे नेते कोळी महोत्सव आला, नारळी पौर्णिमा आली की कोळी टोपी घालून फोटो काढत बसतात. प्रत्यक्षात कोळी समाजाचे हाल बघा!
मुंबई मधील प्रत्येक मच्छी मार्केट हे विकासाच्या नावाखाली मुंबई शहरातून बाहेर फेकले जात आहे. ससून डॉक सारखा मोठा मासळी प्लांट सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार च्या वादात बंद पाडला गेला, आता दादरचे मच्छी मार्केट संपवले जातेय. पण का ! तर तुमच्या ह्या मच्छी चा वास आमच्या हाय प्रोफाइल मतदारांना सहन होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथून गप गार निघून जायचे.
भाजपचे कोळी नेते , आमदार, खासदार, नगरसेवक ह्यावर एक अवाक्षर बोलणार नाहीत कारण त्यांच्या विकासाच्या गप्पांमध्ये तुम्हाला स्थान नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तुमचे कमळाला जाणारे एक मत हे तुम्हाला अजूनच चिखलात ओढणार आहे. आज कोळी आहेत , उद्या कुंभार, लोहार, चांभार सगळे आहेत. ह्यांना केवळ सत्ता आणि त्यासाठी अंबानी अदानी हवे आहेत. वेळीच सावध व्हा.
जय महाराष्ट्र!