रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी खासदार नारायण राणे साहेब ज्या ताकदीने जिंकून आले, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार १००% जिंकेल, असा विश्वास आहे. #Anganewadi #BharadiAai #Sindhudurg #Ratnagiri #Kokan #BJP #Mahayuti #AaplaRavi
विधानसभा निवडणुकीत महाविजयाचा संकल्प !
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कोकणवासीयांची साथ महायुतीला जशी लोकसभा निवडणुकीत लाभली, तशीच विधानसभेतही लाभावी, असे आवाहन केले.
आपल्या कुडाळमध्ये फक्त आणि फक्त महायुतीच्या उमेदवारालाच विजयी करायचे आहे, असा याप्रसंगी सर्वांनी मिळून संकल्प केला.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार नितेश राणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#AaplaRavi #Kudal #Sindhudurg #Kokan #BJP #Mahayuti
सावंतवाडी मतदारसंघात महायुतीच विजयी होणार !
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #Sawantwadi विधानसभा मतदारसंघातील #Mahayuti च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक घराघरात जाऊन महायुती सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना आणि निर्णयांचा प्रचार करा. तसेच महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी संपूर्ण ताकदीनिशी उभे रहावे, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
यावेळी कणकवली मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नितेश राणे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रसन्ना देसाई, मनिष दळवी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Sindhudurg #Ratnagiri #Kokan #BJP #AaplaRavi
ऑरगॅनिक फार्मिंग हा शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा घटक आहे. आज देशातील २५% फार्मिंग हे आपल्या महाराष्ट्रात होते. महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत महायुती सरकारच्या काळात केवळ एका वर्षात ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये ४००% वाढ झाली आहे.
ऑरगॅनिक फार्मिंगला मिळाली वृध्दी
म्हणूनच झाली महाराष्ट्राची प्रगती !
#MhanunchMahayuti #PunhaMahayuti #OrganicFarming #MahayutiSarkar #Maharashtra
श्री देवी भराडी आईचा उदो उदो !
भराडी देवीच्या चरणी नतमस्तक झालो आणि एका नव्या ऊर्जेने आगामी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. भराडी आई कार्यात यश देईल आणि महायुतीला विजय मिळवून देईल याची खात्री आहेच.
#Anganewadi#BharadiAai#Sindhudurg#Ratnagiri#Kokan#BJP#AaplaRavi
देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री, कुशल संघटक, भारतीय जनता पार्टीचे आधुनिक चाणक्य आदरणीय अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अमितजी, आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना!
#AmitShah#HappyBirthday#Birthday#BJP#BJP4India
काकोरी घटनेतील प्रमुख स्वातंत्र्यसेनानी अमर शहीद अशफाक उल्ला खान यांची आज जयंती ! भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशसत्तेविरुद्ध संघर्ष उभारतानाच त्यांनी सर्वसमावेशकतेचा आदर्श वस्तुपाठ उभारला. त्यांचे चरित्र, त्यांच्या कविता भारतीयांना सदैव प्रेरणादायी राहतील. भारतमातेच्या या थोर सुपुत्रास विनम्र अभिवादन !
#AshfaqullaKhan #FreedomFighter #Bharat
२०१४ साली आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती झाली आहे, त्यामुळे आज देशाच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क उभे राहिले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची गती कायम ठेवायची असेल तर महाराष्ट्राला महायुतीशिवाय पर्याय नाही !
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी
फक्त महायुती !
#MhanunchMahayuti #PunhaMahayuti #InfrastructureDevelopment #MahayutiSarkar #Maharashtra
जागरूकता, शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतिरूप समन्वयाची अनुभूती म्हणजे #KojagiriPaurnima ! #Dombivli पश्चिम येथील मराठा हितवर्धक मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
#AaplaRavi
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली काही विकासकामे -
📌 जयगड निवळी रस्ता
निधी - २१.१७ कोटी रुपये
📌 मिरजोळे वांद्री रस्ता येथे मोठ्या पुलाचे बांधकाम
निधी - ५ कोटी रुपये
📌 जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम
निधी - ९२.१० कोटी रुपये
#Ratnagiri #RatnagiriVidhansabha #RatnagiriDistrict #Road #Bridge #Buildings #Infrastructure #Construction #Development #PWD #Mahayuti #Maharashtra #RavindraChavan
#Ulhasnagar येथे उल्हासनगर जिल्हा भाजपाच्या वतीने #Devabhau माझी लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा आणि स्नेह भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद साधला. या समारंभाला उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजपा उल्हासनगर उपजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांच्यासह उल्हासनगर परिसरातील भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
#AaplaRavi #BJP
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली काही विकासकामे -
📌 रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील इमारतींची दुरूस्ती
निधी - ५.१७ कोटी रुपये
📌 रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय येथे सुधारणा करणे
निधी - ७.६८ कोटी रुपये
📌 शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम
निधी - ४६.२१ कोटी रुपये
#Ratnagiri #RatnagiriVidhansabha #RatnagiriDistrict #Road #Bridge #Buildings #Infrastructure #Construction #Development #PWD #Mahayuti #Maharashtra #RavindraChavan
संपर्क से समर्थन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #Dombivli पूर्व येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये आज ज्येष्ठ नागरिक संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आपले डोंबिवली शहर हे पूर्वीपासूनच #BJP विचारांचा बालेकिल्ला राहिले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने घरोघरी जाऊन आपल्या भाजपा परिवाराची बांधणी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजना समजून घेत त्यांची माहिती घरोघरी पोहोचवा, असे आवाहन यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केले.
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदू) परब यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#AaplaRavi #DombivliVidhansabha #MaharashtraElections2024
आपले महायुती सरकार सत्तेत आल्यावर विविध कारणांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये भरीव वाढ झाली असून त्याचा महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेला खऱ्या अर्थाने लाभ झाला आहे.
सर्वाधिक अनुदान देण्याचा निर्धार,
म्हणूनच महायुती सरकार !
#MhanunchMahayuti#PunhaMahayuti #Subsidies #MahayutiSarkar #Maharashtra
श्री गणेशाच्या आशीर्वादाने डोंबिवलीत कमळच फुलणार !
माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यानंतर डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
डोंबिवलीकर सदैव पाठीशी राहिले आहेत. त्यांचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. हाच विश्वास दाखवत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या डोंबिवली शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वास आहे.
#AaplaRavi #Dombivli #Dombivlikar #BJP #BJP4Dombivli
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डोंबिवली पूर्व शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी महायुतीकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल उपस्थित शिवसैनिकांनी अभिनंदन केले. तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
#AaplaRavi#BJP#Shivsena#NCP #Mahayuti #Dombivli #Dombivlikar
#Dombivli पश्चिम येथील चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा परिसरातील एस. सी. के. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला उपस्थित राहून देशहिताचे विचार मांडले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
#AaplaRavi #Ravidada4Dombivli #Dombivlikar #DombivliVidhansabha #MaharashtraElection2024
मुंबई येथील रोहिदास समाज पंचायत संघाच्या अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली स्थानिक पंचायत संघ, पश्चिम यांच्या वतीने विद्यार्थी कौतुक सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, माता-भगिनींचे हळदी कुंकू समारंभ इ. कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डोंबिवलीकरांचे आशीर्वाद घेतले.
#AaplaRavi #Dombivli #Dombivlikar #DombivliVidhansabha #BJP #BJP4Dombivli
आपल्या कोकणाला लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशीच एक लोककला म्हणजे दशावतारी नाटक!
श्री देव वेतोबा मंडळ आणि एस. जी. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात 'लोहपद विश्पला' हा महान पौराणिक दशावतार प्रयोग संपन्न झाला.
या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून दशावताराचा आनंद अनुभवला. तसेच कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#Dashavtar #Kokan #AaplaRavi #Dombivli #Dombivlikar #FolkArt