One year since #OperationSindoor — a defining moment of courage, precision & national resolve.
When the nation was tested, India stood united against terrorism with unwavering purpose and strength.
Salute to the spirit of unity and sacrifice.
#IndiaAgainstTerror
🌍 On World Environment Day, let us reaffirm our commitment to protecting nature and preserving resources for future generations.
Every small action counts towards a greener, cleaner and more sustainable future.
#WorldEnvironmentDay#GoGreen#Goa#MissionLiFE
21 जून रोजी होऊ घातलेल्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर @cbcmhgoa कार्यालयात नाशिकच्या चंद्रकांत गायकवाड यांनी काही हस्त मुद्रा शिकविल्या व काही औषधी वनस्पतींची माहिती दिली.
कार्यालयीन कामकाज करताना करता येणाऱ्या या मुद्रांचा अभ्यास आरोग्य राखण्यास मदत करतात.
#IDY@moayush
Nominations for Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2026 are now open!
Celebrate young achievers in Bravery, Sports, Social Service, Environment, Arts & Culture, and Science & Technology. Apply or nominate now at https://t.co/P1vIwvu5F2 before 31st July 2026.
#PMRBP2026
वरिष्ठ नागरिक JEEVAN ऐप के माध्यम से आवश्यक सेवाओं, सहायता और उपयोगी जानकारी आसानी से प्राप्त कर सकते हैं—आज ही डाउनलोड करने के लिए QR कोड स्कैन करें।
हेल्पलाइन: 14567 (एल्डर लाइन)।
#DigitalIndia
प्रा. जुझेर वासी - पद्मश्री
प्रोफेसर जुझेर वासी हे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मुंबई संकुलाचे एमेरिटस बहुमानप्राप्त प्राध्यापक आहेत.
सेमीकंडक्टर्स आणि नंतरच्या काळातील सौर ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची तंत्रज्ञान विषयक या महत्वाच्या क्षेत्रांना पाठबळ देणारी एक सक्षम परिसंस्था निर्माण करण्यात मोठी मदत झाली आहे.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma @PadmaAwards@MIB_India@PIB_India@ddsahyadrinews@airnews_mumbai
सत्यनारायण नंदलाल नुवाल - पद्मश्री
सत्यनारायण नंदलाल नुवाल हे औद्योगिक स्फोटके आणि उच्च-ऊर्जा सामग्रीच्या निर्मिती आणि निर्यात क्षेत्रातील जागतिक स्तरावर नावाजलेल्या सोलर उद्योग समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत
संरक्षण क्षेत्रातील सज्जतेसाठीची देशाची गरज ओळखून, त्यांनी 2010 मध्ये सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडची स्थापना केली. तोपर्यंत आपला देश अशा उत्पादनांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून होता.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma
श्रीरंग देवबा लाड - पद्मश्री
श्रीरंग देवबा लाड हे एक प्रसिद्ध शेतीतज्ज्ञ असून ग्रामीण विकास, शाश्वत शेती आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या अपवादात्मक योगदानासाठी ते ओळखले जातात.
ते कापूस तंत्रज्ञानाचे जनक, तसेच शेतकरी-केंद्रित कृषी नवोन्मेषाला प्रेरणा देणारे मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधनामुळे विशेषतः कापूस उत्पादनात मोठी वाढ झाली.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma
रघुवीर खेडकर - पद्मश्री
रघुवीर खेडकर हे एक ख्यातनाम आणि ज्येष्ठ तमाशा कलाकार तसेच फडाचे मालक आहेत. ते एक प्रतिभावान सोंगाड्या म्हणून मोठ्या वर्तुळांत ओळखले जातात.
तमाशा या लोककलेचे जतन व संवर्धन करण्याप्रती त्यांची वचनबद्धता दृढ आहे. कोविड-19 महामारीच्या काळात, सार्वजनिक कार्यक्रम बंद असताना अनेक बेरोजगार कलाकारांच्या सोबत ते ठामपणे उभे राहिले.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma
जनार्दन बापूराव बोथे - पद्मश्री
श्रीयुत जनार्दन बापुराव बोथे हे एक प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आहेत. पूज्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या पवित्र गुरुकुंज आश्रमातील 'अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ' चे सरचिटणीस म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सेवा केली आहे.
ग्रामीण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातील समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma
श्री पीयूष पांडे (मरणोत्तर)- पद्मभूषण
श्रीयुत पीयूष पांडे यांनी जाहिरात क्षेत्रात अतिशय परिवर्तनात्मक प्रभाव निर्माण केला. त्यांच्या जाहिरातींनी भारतीय जाहिरात क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले.
पोलिओ निर्मूलनासाठीची “दो बूंद जिंदगी के” आणि "मिले सूर मेरा तुम्हारा" यांसारखी अभियाने केवळ जाहिराती नव्हत्या, तर त्या सांस्कृतिक मानबिंदू होत्या.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma
श्री उदय सुरेशकुमार कोटक - पद्मभूषण
श्री उदय सुरेशकुमार कोटक हे भारतातील एक ज्येष्ठ बँकर आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील अग्रणी उद्योजक म्हणून ओळखले जातात.
भारतातील अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक कोटक महिंद्रा बँक उभारण्यात आणि आधुनिक वित्तीय क्षेत्राला आकार देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma
श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) – पद्मविभूषण
श्री धर्मेंद्र सिंह देओल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार होते. बॉलीवूडचे 'ही-मॅन' म्हणून लोकप्रिय असलेल्या धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
धर्मेंद्र यांनी 2004 ते 2009 या काळात राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत 14 व्या लोकसभेत खासदार म्हणूनही काम केले.
#Padmaawards #PadmaAwards2026 #PeoplesPadma @PadmaAwards@PIB_India@MIB_India@ddsahyadrinews@airnews_mumbai
Protecting biodiversity starts with everyday action. From conserving local ecosystems to sustainable living choices, every small step matters.
This #InternationalDayforBiologicalDiversity, let’s act locally and secure a thriving future for all living beings.
कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी डॉ. गोपाळ जी त्रिवेदी यांना 'Padma Shri' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे! 🌾👇
प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि राजेंद्र कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू Dr. Gopal Ji Trivedi यांना बिहारमधील कृषी विस्तार शिक्षण, शेतकरी सक्षमीकरण, मत्स्यपालन, मका उत्पादकता आणि वैज्ञानिक लीची लागवडीतील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी Padma Shri जाहीर झाला आहे. 🎖️
लोकांमध्ये "Gaon Purush" आणि "Kishan Mitra" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. त्रिवेदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि तळागाळात शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित केले आहे. 🌱
#PeoplesPadma #PadmaAwards2026
@HMOIndia@PadmaAwards