How are the CJI and Modi related? The lawyer whispered it into the reporter’s ear! lmao! 😂🤣
Another gem! I’ve become a fan of this guy.
The way he speaks so bluntly and fearlessly, without any hesitation, is amazing. Hats off to him!
Hey @IRCTCofficial@RailOneIndia
Please guide how book tickets from your platform. Is there any special tricks so please us know.
Because lot's of time while trying to book tickets thru your above platforms there is always error comes.
काल-परवा दिल्लीहून तज्ज्ञांची टीम नागोठणे येथील नव्या पुलावरील तडे आणि पॅनेलमधील गॅपची पाहणी करण्यासाठी आली होती.
@trip_centre@iitdelhi@iitbombay@IITKgp@MORTHRoadSafety
पण त्यांना कोण सांगणार?
या महामार्गाच्या कामात नेमक्या कुठे त्रुटी राहू शकतात, कोणते धोके निर��माण होऊ शकतात, याबाबत येथील स्थानिक जागरूक तरुणांनी आणि नागरिकांनी काम सुरू असतानाच अनेक वेळा संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते.
दुर्दैव एवढंच की, त्या वेळी ��ागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेतल्या असत्या, तर आज दिल्लीहून तज्ज्ञांची टीम बोलावण्याची वेळ कदाचित आली नसती.@NHAI_Official @MORTHIndia
वेळीच केलेली दुरुस्ती ही नंतरच्या तपासापेक्षा नेहमीच अधिक परिणामकारक असते.
टीप: नागोठणे येथील नव्याने बांधलेला पूल सध्या तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#MumbaiGoaHighway #RoadSafety #PreventionIsBetterThanCure #citizenparticipation #nagothane
@IRCTCofficial please let us know why this errors are occurred during crucial booking time.
Sometimes the payment amount is deducted from the wallet, but the booking process takes a long time to complete. During this delay, a regret/error message is displayed.
Hello @IRCTCofficial
While Tatkal booking why always there connection issue comes while our interent is working properly.
Due to this we are unable to book tickets.
This problem occurs regularly while booking.
सद्यस्थितीला कोकणात भयंकर गोष्टी चालल्यात,
ज्या की लव जिहाद पेक्षाही भयंकर आहेत.
अस्तित्वच राहीलं नाही तर धर्म कसा वाचवाल
त्या म्हणजे “जमीन खरेदी”
परप्रांतातून आलेले असंख्य लोक इथल्या स्थानिकांचा जमिनी अक्षरशः बळकावून घेत आहेत.
भाजपच्या नादी लागून आपण नेहमीप्रमाणे शांतच बसूयात
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा ��ोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।
महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष��ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल.
हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते ति��े पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी.
पण महाराष्ट्रात जेंव्हा अशी सक्ती आली तेंव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार. पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पह��लीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. बरं याचा लेखी आदेश अजून आला आहे का ? तसा तो कुठे आला असेल तरी आम्हाला तो दिसला नाही. कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार हा कागद पण नाचवून दाखवेल. मग आमचा प्रश्न आहे मग तिसरी भाषाच मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय. याला त��म्ही शाळांनी सहकार्य करू नका.
मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे.
सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं ��रण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं ,अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका.
उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिक��� शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.
या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय ��संच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की...
महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे !
बाकी आप��� सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे !
आपला
राज ठाकरे ।
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या *मानाच्या बदलापूर आणि डोंबिवलीतील दहीहंडी रद्द.
- @rajupatilmanase
आमदर
महाराष्ट्र नवनिर्���ाण सेना.
#मनसे
Hey @IRCTCofficial please suggest us what to do to book train ticket less than 1 minute on your online platform & also at ticket counter.
@KonkanRailway.
महावीर जयंतीनिमित्त रविवारी मांस, मटन, मासे यांच्या विक्रीची दुकाने बंद ठेवावीत असं बेकायदेशीर परिपत्रक महापालिकेने काढले आहे.
मराठी एकीकरण समिती या निर्णयाला ठाम विरोध करीत असून मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि लोकहित लक्षात घेता निर्णय त्वरित मागे घ्यावा @VasaiVirarMcorp
🙏एक आवाहन🙏
‘#छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा #चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. चला मत नोंदवूया!
#RepublicDay2024#Tableau
आजपर्यंतच्या जगभरातील लढाया ह्या जमिनीच्या किंवा भूभागाच��या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत आणि मराठी जनांनी जमीन गमावली तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल. शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू झाला, रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. धनदांडग्यांना आपला रायगड जिल्हा हाकेच्या अंतरावर आला. खरंतर रस्ते हे प्रगतीचे वाहक असतात पण महाराष्ट्रात त्या प्रगतीमागून दबक्या पावलांनी येणारी समाजाची अवनती मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालते. म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी जागल्याची भूमिका घ्यावी, जागृत राहावं... लोकांना शहाणं करावं. या भावनेतून मी आज अलिबागमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्या परिसंवादातील महत्वाचे मुद्दे :
• आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड इथे मोठ्या प्रमाणावर कशा जमिनी बळकावल्या जात आहेत ह्याचं पुरेसं भान आपल्याला आलेलं दिसत नाहीये.
• अलिबागच्या परिसरातील अनेक गावातील जमिनी आज विकल्या गेल्या आहेत. मला समजू शकतं की जमीन विकून मिळणारा पैसा प्रत्येकाला हवा आहे पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या ��शात जात आहे, तुम्हाला पुरेसा भाव मिळतोय का ह्याची खात्री करून घेताय का?
• जगाचा इतिहास भूगोलाशिवाय नाही, सगळा खटाटोप जमिनीच्या मालकीसाठीच झाला. आज ट्रान्सहार्बर झालाय ह्यामुळे रायगडमधल्या जमिनी स्थानिक लोकांच्या हातातून जाणार, हे नक्की.
• आज दुबईमध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तिथल्या अरबांना भागीदार करून घ्यावं लागतं तरच तुम्ही तिथे व्यवसाय करू शकता... मग तुम्ही रायगड��ध्ये सुरु होणाऱ्या व्यवसायांत तुम्ही भागीदार का होत नाही ?
• आज जमिनींचे जे रजिस्ट्रेशन सुरु आहे त्यात जमिनी कोण घेत आहे ह्याचा एकदा तपास घ्याच. तुम्हालाही कळेल आपण किती बेसावध आहोत ते.
• एक शिवचरित्रातलं उदाहरण सांगतो की सुरतेवर जेंव्हा स्वारी झाली, तेंव्हा महाराज अनेक व्यापाऱ्यांना पत्र पाठवत होते, तेंव्हा इस्ट इंडिया कंपनीची वखार होती. तिथला प्रमुख होता जॉर्�� ऑक्सेंडेन. त्याच्या हाताखाली ४०० माणसं होती. महाराजांचं पत्र त्याला पण गेलं. त्याने पत्राला उत्तर दिलं की तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाही. त्याचं बघून काही व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं. त्यावेळी इनायत खान म्हणून औरंगजेबाचा माणूस सुरतेत होता. त्याच्या माणसांनी महाराजांवर हल्ला केला म्हणून महाराजांच्या मावळ्यांनी हल्ला करून इनायत खानला पळवून लावलं. औरंगजेबाचा दुसरा खास माणूस होता महाबत खान. जेंव्हा त्याला कळलं की जॉर्ज ऑक्सेंडेनने मुगलांना बळ दिलं तेंव्हा त्याने हिरेमाणक्याने लगडलेली तलवार त्याला भेट दिली. पण जॉर्ज ऑक्सेंडेनटने सांगितलं की जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर इस्ट इंडिया कंपनीला सुरतमध्ये व्यापारात ५०% सवलत द्या. ही झाली खरी निष्ठा.
• साम्राज्य असंच वाढत असतं. जॉर्ज ऑक्सेंडेन जर असा विचार करू शकतो तर मग आपण मराठी माणसं असा का विचार करू शक�� नाही.
• पुण्यात एक काश्मिरी रेस्टोरंट आहे, ज्याचा शेफ काश्मिरी आहे पण मालक दोन मराठी मुलं आहेत, मला असंच चित्र सर्वत्र महाराष्ट्रात हवं आहे. पण बाहेरून येणाऱ्यांना तुम्ही संधी देत राहिलात तर उद्या तुमची भाषा निघून जाईल.
• आज ठाणे जिल्ह्यात ७ महानगरपालिका आहे, हे का झालं ? कारण बाहेरून येणारे लोंढे. हे आक्रमण आहे हे तुम्हाला जाणवतंय का ? एक दिवस असा असेल तुमच्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही.
• तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय, तर हो घाबरवतोय कारण बाकी कुठलाही राजकीय नेता तुम्ह��ला हे सांगणार नाही.
• काश्मीरमध्ये ३७० कलम काढलं, त्याने नक्की काय घडलं हे बाजूला. ३७० कलम होतं तेंव्हा तुम्ही तिकडे बाहेरच्यांना जमीन घ्यायला परवानगी नाही. हिमाचल, उत्तराखंड, आसाममध्ये बाहेरच्यांना जमीन घेता येत नाही मग महाराष्ट्रात का घेऊ दिल्या जात आहेत?
• आज मी अप्पासाहेब धर्माधिकारींना भेटलो होतो. त्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे, मी त्यांना विनंती केली की त्यांनी पण ह्या विषयवार ���ोकांचं प्रबोधन करावं.
• आपण आपली जमीन वाच��ली पाहिजे. आज महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते सर्वबाजूनी बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
• पत्रकार बांधवांनो, आपण गंभीर व्हायला पाहिजे, आजही चर्चांमध्ये माहितीचे दाखले देताना म्हणतात 'मी हि बातमी पत्रकारांकडून ऐकली आहे' म्हणून तुमची जबाबदारी वाढते. तेव्हा तुम्हीही स्थानिकांच प्रबोधन तुम्ही केलं पाहिजे.