UPSC Civil Services (Prelims) 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
सर्व नागरिकांनी सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी.
#ChhatrapatiSambhajinagarPolice#UPSC2026#PublicNotice
दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..
तुमच्या मेहनतीचे हे सुंदर फळ आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा..
भक्ती आणि शक्तीचा ज्ञान व विज्ञानाचा कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा.
छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र..
#MaharashtraDay#कामगार_दिन#JaiMaharashtra#MaharashtraPolice
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. श्रीमती विजया रहाटकर यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात शहर व ग्रामीण पोलिसांसोबत महिला सुरक्षेबाबत विशेष बैठक घेतली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांना विनम्र अभिवादन.
त्यांच्या ‘रमण इफेक्ट’ या अद्वितीय शोधामुळे भारताने जागतिक विज्ञान क्षेत्रात मानाचा ठसा उमटवला.
#राष्ट्रीयविज्ञानदिन#वैज्ञानिकदृष्टिकोन#Innovation#Research
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
मराठी भाषेचा अतुलनीय गोडवा आणि महान सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शिवजयंतीनिमित्त मा. पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते DPDC निधीतून मंजूर ९ चारचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. 🚓 यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #ShivJayanti#ChhatrapatiSambhajinagar
जवाहरनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.
मेट्रो वाईन शॉप मोंढा नाका जालना रोड येथे काम करणारा कामगारानेच मध्यरात्री मालकाच्याच ऑफिसमध्ये चोरी केली CC TV फुटेजच्या आधारे आरोपीला केले जेरबंद..
पोलीस भरतीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राहण्याची व्यवस्था पुढील ठिकाणी करण्यात आली आहे..शौर्य श्रद्धा लॉन्स, IRB कॅम्पस, धुळे–सोलापूर हायवे रामचंद्र हॉल, बीड बायपास रोड, MIT कॉलेजजवळ