तुम्ही मॉलमध्ये जाता तेव्हा ट्रॉली स्वतः ढकलता. सुपरमार्केटमध्ये स्वतः फिरून वस्तू उचलता. पण शेतकऱ्याकडे आला की पहिला प्रश्न असतो...
"होम डिलिव्हरी आहे का?"
आम्ही स्पष्ट सांगतो, आम्ही होम डिलिव्हरी करत नाही. एक स्वतंत्र डिलिव्हरी करणारा मुलगा आहे. तो आमच्याकडून माल विकत घेतो, त्याचा वेळ, पेट्रोल, मेहनत घालवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
पण त्यालाही लोकं पाच-दहा रुपयांवरून घासाघीस करतात.
ढुंगण हलवायचं नाही... पेट्रोल दुसऱ्याचं... वेळ दुसऱ्याचा... पगार दुसऱ्याचा... पण डिलिव्हरी मात्र फुकट हवी!
आमचं पुस्तक विकत घेतानाही अनेकांनी विचारलं...
"दुधाबरोबर पाठवून द्याल का?"
म्हणजे दूध, भाजी, अंडी, पुस्तक... शक्य असेल तर लग्नाचं निमंत्रणही घरपोच!
समस्या होम डिलिव्हरीची नाही. समस्या आहे मेहनतीची किंमत न समजण्याची.
आज शहरात अनेकांना वाटतं की पैसे दिले म्हणजे वस्तू तयार होते.
पण एकदा स्वतःला विचारा...
आलं किसून अर्धं वापरता आणि उरलेलं कचर्यात फेकता. त्या आल्याला तयार व्हायला सुमारे नऊ महिने लागतात.
रोज तुरीची आमटी पिता. त्या तुरीला शेतात उभं राहायला सहा ते सात महिने लागतात.
कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं, पण तो कांदा शेतकऱ्याने किती महिने वाढवला हे माहिती आहे का?
टोमॅटोचा दर वाढला की संताप व्यक्त करता. पण एकदा तरी टोमॅटोच्या रोपाला रोज पाणी देऊन, रोगांपासून वाचवून, योग्य वेळी तोडणी करून पाहिली आहे का?
तुम्ही पाच मिनिटांत जेवण संपवता.
त्या ताटातल्या प्रत्येक घासामागे कुणाचेतरी महिनेभराचे, काही वेळा वर्षभराचे श्रम असतात.
शहरात राहणाऱ्या अनेकांना शेती म्हणजे हिरवळ, फोटो आणि वीकेंड फार्म वाटतो.
प्रत्यक्षात शेती म्हणजे कर्ज, हवामानाचा जुगार, रोगराई, बाजारभावाची अनिश्चितता आणि रोजची धावपळ.
म्हणून पुढच्या वेळी शेतकऱ्याला विचाराल...
"होम डिलिव्हरी आहे का?"
...त्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा.
मी ज्या वस्तूसाठी पैसे देतो, त्या वस्तूमागची मेहनत समजून घेण्याची माझी तयारी आहे का?
कारण पैसे देऊन तुम्ही माल विकत घेऊ शकता.
महिनेभराचा घाम, जोखीम आणि आयुष्याचा तुकडा विकत घेऊ शकत नाही.
पोस्ट साभार - AllGanic Farm
नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून आता ‘फायरब्रॅंड’ IPS अधिकारी अशी ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील हे नागपुरचे नवे पोलीस आयुक्त असतील. गृहविभागाकडून मंगळवारी सायंकाळी यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे शहर व उपराजधानी असलेल्या नागपुरात मागील काही काळापासून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली होती. आता विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून नागपुरकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.
#VishwasNangrePatil
#IPS #Nagpur
This is the reason why an indigenous messaging app can not survive in India. People ask, why can't India build our own AI... Imagine some AI app creates something that "hurts sentiments" and founders have to face legal cases for decades after.
Indian telecom Reliance is sabotaging access to Telegram for millions of users OUTSIDE India (including the UAE) via a rogue method called BGP hijacking.
The sabotage seems intentional, as Reliance has ignored multiple reports.
This may be part of a competitive war, as Reliance is partially owned by Meta — the company behind WhatsApp.
Network operators are advised to reject unauthorized BGP announcements from Reliance (AS18101) to prevent route hijacks and ensure stable Internet access for their users.
Such abuse of global Internet routing is alarming. I wouldn’t be surprised if Reliance/WhatsApp were also behind the recent lobbying effort to ban Telegram in India.